निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात पुढे ढकलण्यात आली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने सांगितले की वेळेअभावी या प्रकरणाची सुनावणी होळीच्या सुट्टीनंतर होईल.
गाझा युद्धबंदी कराराच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी करण्याची तयारी हमासने दर्शविली. पॅलेस्टिनी गटाने गाझा रिकामे करण्याच्या इस्रायली मागणीलाही नकार दिला. हमासचे प्रवक्ते हाझेम कासेम यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, मध्यस्थांच्या विनंतीनुसार सोडण्यात येणाऱ्या इस्रायली बंधकांची संख्या दुप्पट करण्यास पॅलेस्टिनी गट सहमत झाला आहे, जे करारात ठरल्यानुसारच आहे.
रेखा गुप्तांच्या रूपाने दिल्ली राज्याला भाजपने चौथ्या महिला मुख्यमंत्र्याचा लाभ दिला. शालीमार बाग मतदारसंघातून दिल्ली विधानसभेवर निवडून आलेल्या रेखा गुप्ता यांची भाजपने विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली. त्या उद्या रामलीला मैदानावर दुपारी 12:30 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मतदारांना संदेशही दिला. त्यांनी त्यांच्या संदेशात लिहिले की, ‘मतदान हे राष्ट्रसेवेच्या दिशेने पहिले पाऊल आहे
देशाच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने कर्नाटक आणि केरळमधून ३ जणांना अटक केली आहे. एनआयएला संशय आहे की हे तिघेही आरोपी पाकिस्तानच्या आयएसआयशी जुडलेल्या विशाखापट्टणम हेरगिरी प्रकरणात सहभागी आहेत.
मौत का सौदागर” ते “मृत्यू कुंभ”; विनाशकाले विपरीत बुद्धीनेच घडणार राजकीय अंत!!… 2007 मधल्या गुजरातच्या इतिहासाची पुनरावृत्ती 2026 मध्ये पश्चिम बंगाल मध्ये घडण्याची शक्यता आहे
ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, त्यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या भेटीबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले की, सुनक हे भारताचे चांगले मित्र आहेत. या भेटीदरम्यान सुनक यांचे कुटुंबही उपस्थित होते.
तेलंगणा नंतर आता आंध्र प्रदेश सरकारनेही सर्व मुस्लिम सरकारी कर्मचाऱ्यांना रमजान महिन्यात नमाज अदा करण्यासाठी कार्यालयातून लवकर निघण्याची परवानगी दिली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तेलंगणा सरकारने घेतलेल्या अशाच एका पावलानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. माहितीनुसार, रमजानमध्ये मुस्लिम कर्मचाऱ्यांना लवकर कार्यालय सोडण्याची पद्धत तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात अनेक वर्षांपासून सुरू आहे.
युक्रेन युद्धाच्या तोडग्यासाठी सौदी अरेबियामध्ये रशिया आणि अमेरिकेतील उच्चस्तरीय बैठक संपली आहे. रशियन प्रतिनिधी मंडळातील एका सदस्याने सांगितले की चर्चा “वाईट नव्हती”, परंतु दोन्ही बाजूंचे हितसंबंध समान आहेत की नाही हे सध्या सांगणे कठीण आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ गुरुवार २० फेब्रवारी रोजी होणार आहे. पंतप्रधान मोदींसह अनेक मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
दिल्लीतील पराभवानंतर, आम आदमी पक्षासाठी पहिल्यांदाच एक छोटीशी आनंदाची बातमी आली आहे. गुजरातच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने दहा पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत.
1988च्या बॅचचे आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार यांनी बुधवारी देशाचे २६ वे मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) म्हणून पदभार स्वीकारला. नवीन कायद्यांतर्गत नियुक्त झालेले ते पहिले सीईसी आहेत. त्यांचा कार्यकाळ २६ जानेवारी २०२९ पर्यंत राहील. यापूर्वी, मुख्य निवडणूक आयुक्तपद भूषवणारे राजीव कुमार १८ फेब्रुवारी रोजी निवृत्त झाले.
दिल्लीत मुख्यमंत्री पदाच्या निवडणुकीसाठी भाजपने माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि ओमप्रकाश धनखड यांची आज दुपारी निरीक्षक पदी नियुक्ती केली.
शिवजयंती दिनी वाहिली श्रद्धांजली; याला म्हणतात “राहुल गांधी”!! एरवी आपल्या विचित्र वक्तव्यांसाठी सु आणि कु प्रसिद्ध झालेल्या राहुल गांधींनी आजच्या शिवजयंतीच्या दिवशी वेगळाच “पराक्रम” केला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाकुंभाला मृत्युकुंभ म्हटले आहे, त्यावर संत समुदायाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि त्यांचे विधान सनातन धर्माचा अपमान असल्याचे म्हटले आहे. संतांनी ममता बॅनर्जी यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. श्री पंचायती आखाडा महानिर्वाणीचे राष्ट्रीय सचिव महंत जमुना पुरी म्हणाले की,
केंद्र सरकारचे म्हणणे आहे की भारताची कापड निर्यात ३ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यासोबतच, देशांतर्गत उत्पादन मजबूत करून आणि जागतिक पोहोच वाढवून, २०३० पर्यंत ते तिप्पट करून ९ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
प्रयागराजमध्ये लवकरच सुमारे १२ कोटी रुपये खर्चून एक साहित्यिक तीर्थक्षेत्र बांधले जाणार आहे. योगी सरकारने यासाठी मान्यता दिली आहे. हा प्रकल्प प्रयागराज महानगरपालिकेने प्रस्तावित केला होता. शहराच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन करण्यासाठी हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. साहित्य तीर्थ क्षेत्र (साहित्य उद्यान) बांधण्याची जबाबदारी सी अँड डी कडे सोपवण्यात आली आहे. यासाठी सरकारकडून डीपीआर मागवण्यात आला आहे.
15 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेबाबत आरपीएफचा एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की प्रयागराजला जाणाऱ्या कुंभ स्पेशल ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलण्याच्या घोषणेमुळे हा अपघात झाला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी जमीन व्यवहार घोटाळ्यात मनी लाँड्रिंग केल्याबद्दल आप नेते सत्येंद्र जैन यांच्यावर खटला चालवण्यास परवानगी दिली. १४ फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने या प्रकरणात राष्ट्रपतींकडून मंजुरी मागितली होती.
१७ फेब्रुवारी रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने भारताचे इंग्रजी नाव इंडिया वरून भारत किंवा हिंदुस्तान असे बदलण्याच्या याचिकेवर सुनावणी केली. न्यायमूर्ती सचिन दत्ता यांनी केंद्र सरकारला याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी वेळ वाढवून दिला. ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीत केंद्राने उत्तर दाखल करण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे, महाराजे नसून ते आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत, शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी नमन केले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी विकीपीडियावर वादग्रस्त व चुकीची माहिती देण्यात आली आहे. यामुळे शिवप्रेमींचे मने दुखावली गेली आहेत. तसेच तो वादग्रस्त व चुकीचा मजकूर विकीपीडियावरून काढून टाकण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विकीपीडियाला माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिले जाते, मात्र त्यांनीच अशी चुकीची माहिती दिल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
केरळमधील पलक्कड जिल्ह्यात आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात हमासच्या वरिष्ठ नेत्यांचे पोस्टर्स लावल्याची घटना समोर आली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने राज्यात देशविरोधी कट रचल्याचा आरोप केला आहे.
समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या यूट्यूब शोमध्ये केलेल्या कथित अश्लील टिप्पण्यांबद्दल त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या अनेक एफआयआर एकत्रित करण्याची मागणी करणाऱ्या रणवीर अलाहाबादियाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे.
रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने एक मोठा निर्णय घेतला. याअंतर्गत, संपूर्ण रमजान महिन्यात राज्यातील सर्व मुस्लिम सरकारी कर्मचारी, शिक्षक, कंत्राटी कर्मचारी, आउटसोर्सिंग आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना विशेष सूट देण्यात आली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App