हलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमध्ये असा काही विनाश घडवला, जो पाकिस्तान शतकानुशतके विसरू शकणार नाही. भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी तळं, लष्करी छावण्या आणि अनेक हवाई तळं उद्ध्वस्त केली. आता ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी हवाई दलाचे एकूण किती नुकसान झाले याचे मूल्यांकन करण्यात आले आहे.
भारतात विविध धर्मांचे लोक एकत्र राहतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मूलभूत अधिकार असले, तरी त्याचा गैरवापर करून दुसऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावणे मान्य नाही, असे स्पष्ट करत कोलकाता उच्च न्यायालयाने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शर्मिष्ठा पनोली हिला अंतरिम जामीन नाकारला.
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल मधल्या विषयाने रॉयल्स चॅलेंजर बेंगलोरचा 18 वर्षांचा उपवास सुटला. दिग्गज क्रिकेटपटू फोटो विराट कोहली याला काल शांत झोप लागली. या भावना त्याने स्वतः बोलून दाखवल्या.
पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने जलद आणि प्रभावी कारवाई करत पाकिस्तानला कठोर प्रत्युत्तर दिले. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून ४८ तासांत भारताला शरणागती पत्करण्यास भाग पाडू, अशी वल्गना करण्यात आली होती.
भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर केले यशस्वी; पण काँग्रेस आणि भाजप यांनी मात्र शाब्दिक खेळत अडकवली लढाई!! असला प्रकार राहुल गांधींच्या भाषणानंतर आज घडला.
न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी सापडलेल्या रोख रकमेच्या प्रकरणात बॉम्बे लॉयर्स असोसिएशनने (बीएलए) सीजेआय बीआर गवई यांना पत्र लिहिले. या पत्रात, न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू करण्यास मान्यता मागितली आहे. पत्रात, बीएलएने म्हटले आहे की, इन-हाऊस पॅनेलच्या अहवालातून न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील आरोपांची पुष्टी झाली आहे.
उत्तराखंड सरकारने हरिद्वारचे जिल्हा दंडाधिकारी कर्मेंद्र सिंह आणि हरिद्वार महानगरपालिका महानगरपालिका आयुक्त वरुण चौधरी यांना निलंबित केले आहे. याशिवाय पीसीएस अधिकारी अजय वीर यांनाही निलंबित करण्यात आले आहे
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानची २० नव्हे तर २८ ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत. विशेष म्हणजे हा खुलासा खुद्द पाकिस्तानकडूनच आपल्या कागदपत्राद्वारे केला गेला आहे.
सध्या भारतातील अनेक नेते ऑपरेशन सिंदूर का आवश्यक होते हे सांगण्यासाठी आणि याबरोबहरच पाकिस्तानच्या दहशतवादाचा पर्दाफाश करण्यासाठी अनेक देशांमध्ये गेलेले आहेत. दरम्यान, ऑपरेशन सिंदूर नंतर भारताच्या संपर्क कार्यक्रमाचा भाग म्हणून स्पेनला गेलेल्या एका भारतीय शिष्टमंडळाच नेतृत्व द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी करत आहेत.
Operation Sindoor मध्ये भारतीय सैन्याची कारवाई एवढी अचूक आणि प्रखर होती, की भारताने 48 तासांची लढाई आठ तासांमध्ये संपवली होती.
पंतप्रधान मोदी चिनाब रेल्वे पुलावरून काश्मीरला जोडणाऱ्या रेल्वेला ६ जून रोजी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर चिनाब रेल्वे पुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
जागतिक पातळीवरील सुप्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांचे वडील एरॉल मस्क सध्या भारत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगातील सर्वोत्तम नेता म्हणून त्यांनी कौतुक केले आहे. मोदी नेहमी दूरदृष्टीने विचार करतात आणि भारताला ‘विश्वगुरू’ बनवण्याच्या दिशेने नेत आहेत,” असे मस्क म्हणाले.
सामान्य माणसाला लवकरच अधिक दिलासा मिळू शकेल. आरबीआय चलनविषयक धोरण समिती (MPC) या महिन्यात ४ ते ६ जून दरम्यान बैठक होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, यावेळीही रेपो दर ०.२५% असण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व प्रकारची कर्जे घेणे स्वस्त होईल.
काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी सोमवारी X पोस्टमध्ये लिहिले – भारत जगभरात दहशतवादाविरुद्ध आपला संदेश पोहोचवण्याच्या मोहिमेवर असताना, देशातील लोक राजकीय निष्ठेचे मूल्यांकन करत आहेत. हे दुःखद आहे. देशभक्त असणे इतके कठीण आहे का?
अयोध्येतील रामलल्ला मंदिराच्या शिखरावर सोन्याने मढवलेला कलश स्थापित करण्यात आला आहे. तो दूरवरून चमकत आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने रविवारी मंदिराच्या भव्य आणि चमकदार सोन्याने मढवलेल्या शिखराचे फोटो प्रसिद्ध केले. ५ जून रोजी मंदिरात राम दरबार स्थापन होईल. यासाठीचे विधी ३ जूनपासून सुरू होतील.
डोंबिवली मधल्या एका पंधरा वर्षाच्या मुलीला ऊस लावून तिच्यावर वारंवार बलात्कार केला तिला डांबून ठेवले आणि नंतर वेश्याव्यवसायात ढकलले. या सगळ्या प्रकरणात तब्बल 33 आरोपी असल्याचे पोलिसांना आढळून आले.
राहुल गांधी आणि जयराम रमेश यांना संघाचे दिसले “कुसळ”, पण दिसले नाही काँग्रेसच्याच आशीर्वादाने कम्युनिस्टांनी सरकारी संस्थांमध्ये घुसवलेले “मुसळ”, असे म्हणायची वेळ जयराम रमेश यांच्या वक्तव्याने आली.
भारताने पाकिस्तानात वाहणारे सिंधू नदीचे पाणी रोखले, तर चीन ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी रोखेल आणि भारताची कोंडी करेल, अशी धमकी पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी दिली
आज (२ जून) आयएटीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक क्षेत्रातील प्रतिनिधींना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हा कार्यक्रम चार दशकांनंतर भारतात होत आहे. या चार दशकांत भारतात बरेच काही बदलले आहे. आजचा भारत पूर्वीपेक्षा जास्त आत्मविश्वासू आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी (३१ मे २०२५) २००७ बॅचचे वरिष्ठ आयआरएस अधिकारी अमित कुमार सिंगल आणि एका खासगी व्यक्ती हर्ष कोटक यांना लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली. असा आरोप आहे
आता आयपीएल २०२५च्या अंतिम सामन्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. ३ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज एकमेकांसमोर येणार आहेत. हे असे दोन संघ आहेत ज्यांनी यापूर्वी कधीही इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकलेले नाही. क्वालिफायर-२ सामनाही त्याच मैदानावर खेळवण्यात आला होता, ज्यामध्ये मुसळधार पावसामुळे सामना सुमारे २ तास उशिरा सुरू झाला. आता येथे जाणून घ्या अंतिम सामन्याच्या दिवशी पाऊस पडला तर कोणते नियम लागू केले जाऊ शकतात.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) देशभर पसरलेल्या गुप्तहेर नेटवर्कवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत आठ राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले आहेत आणि आणखी अनेक राज्यांमध्ये छापे टाकले जाण्याची अपेक्षा आहे.
ऑपरेशन सिंदूर नंतर, पंतप्रधान मोदी उद्या म्हणजेच बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतील. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.
बिहार निवडणुकीत केजरीवाल यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस अन् राजदचं वाढलं टेन्शन Aam Aadmi Party
केंद्रीयमंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे (राम विलास) प्रमुख चिराग पासवान या वर्षी बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लढतील की नाही? चिराग पासवान कोणत्या जागेवरून निवडणूक लढवतील? चिराग पासवान यांना बिहारचे मुख्यमंत्री बनवले जाईल का? असे सर्व प्रश्न सध्या केवळ सोशल मीडियावरच नाही तर राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरत आहेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App