पाकिस्तानने मोठ्या संख्येने सब्स्क्रायबर्स असलेल्या यूट्यूबरना हेरगिरीसाठी वापरले असल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे.पंजाब पोलिसांनी एक मोठं हेरगिरीचे जाळे (espionage network) उघडकीस आणले असून, या जाळ्याचे धागेदोरे थेट पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांपर्यंत पोहोचत असल्याचे स्पष्ट झालं आहे.
मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत, २०२७ सालापासून देशभरात जनगणना राबवण्याची घोषणा केली आहे. यंदा पहिल्यांदाच जातनिहाय गणना अधिकृत जनगणनेचा भाग असणार असून, ही जनगणना पूर्णपणे डिजिटल माध्यमातून व दोन टप्प्यांत घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे, लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसारख्या हवामानदृष्ट्या कठीण भागांत ही प्रक्रिया इतर भागांपेक्षा लवकर म्हणजे ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार आहे.
केंद्रीयमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी बुधवारी बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल दुःख व्यक्त केले. आरसीबीच्या पहिल्या आयपीएल विजयानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेले चाहते स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली.
पहिल्यांदा आयपीएल विजेता ठरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) चा उत्सव बुधवारी मोठ्या अपघातात बदलला.
अभिनेता कमल हसन यांनी कन्नड भाषेवरील केलेल्या टिप्पणीवरील वाद अद्याप संपलेला नाही. एकीकडे त्यांनी या वादावर माफी मागण्यास नकार दिला आहे, तर पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे तामिळ भाषेसाठी खूप काही सांगायचे आहे, परंतु ते आता ते बोलणार नाहीत.
खासदार चंद्रशेखर आझाद आधारित महिलांच्या इज्जतीशी खेळला. तो दलित आंदोलनाला कलंक आहे. त्याचा शेवट वाईट झाल्याशिवाय राहणार नाही
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीयमंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी न्यायाधीशांच्या नियुक्तीवर एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती करताना सरकारने सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांना दोनदा दुर्लक्षित केले, त्यावेळी न्यायाधीशांच्या नियुक्तीचा अंतिम निर्णय सरकारचा होता.
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील ‘पोस्ट’मध्ये नड्डा म्हणाले, ‘राहुल गांधी, तुम्ही शरणागती पत्करली असेल, तुमच्या पक्षाने ते केले असेल, तुमच्या नेत्यांनी शरणागती पत्करली असेल कारण तुमचा इतिहास असाच आहे, पण भारत कधीही शरणागती पत्करत नाही. शरणागती तुमच्या काँग्रेस पक्षाच्या शब्दकोशात आहे, ती तुमच्या डीएनएमध्ये आहे.
तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या सूडबुद्धीच्या स्वभावाबद्दल बोलताना इम्रान खान म्हणाले की त्यांना इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) च्या महासंचालक पदावरून काढून टाकण्यात आले होते. यानंतर ते त्यांच्या पत्नी बुशरा बीबीच्या विरोधात गेले.
ज्योती मल्होत्रा नंतर आणखी एक युट्यूबरला देशद्रोह केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा संशय आहे. पोलिसांनी त्याला पंजाबमधील रूपनगर येथून अटक केली आहे.
वर्ग बांधकाम घोटाळा प्रकरणात आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे त्रास कमी होताना दिसत नाही. आता एसीबीने सत्येंद्र जैन यांना ६ तारखेला आणि मनीष सिसोदिया यांना ९ जूनला चौकशीसाठी बोलावले आहे.
रशिया आणि भारत यांच्या संबंधांवरून आणि BRICS राष्ट्रसमुहाच्या मुद्द्यावरून अमेरिकेने भारताविरुद्ध थयथयाट चालविला. ट्रम्प प्रशासनातले व्यापार मंत्री हावर्ड ल्युटनिक यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखीच उथळ भाषा वापरून भारतावर दुगाण्या झाडल्या. तुम्ही रशियाकडून शस्त्रे विकत घ्या. “ब्रिक्स” देशांच्या समूहात सामील राहा.
याला म्हणतात, तंगडी वर; पाकिस्तानी लष्कराची लघुशंका अमेरिका, चीन आणि तुर्कांवर!!, असे म्हणायची वेळ पाकिस्तानी सैन्य दलांच्या प्रमुखाच्या मुलाखतीने आणली. भारत अशी लढाई करताना पाकिस्तानने कुठल्याही आपल्या देशाची मदत घेतली नाही, असा अजब दावा पाकिस्तानी सैन्य दलांचा प्रमुख जनरल साहीर शमशाद मिर्झा याने बीबीसी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला. ही मुलाखत पाकिस्तानी माध्यमांनी ठळकपणे छापली.
अंमलबजावणी संचालनालयाच्या मुंबई विभागीय कार्यालयाने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, २००२ (पीएमएलए कायदा) अंतर्गत सुधांशू द्विवेदी यांना अटक केली. त्याची अटक ही एका मोठ्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणातील सुरू असलेल्या तपासाचा एक भाग आहे.
हलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमध्ये असा काही विनाश घडवला, जो पाकिस्तान शतकानुशतके विसरू शकणार नाही. भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी तळं, लष्करी छावण्या आणि अनेक हवाई तळं उद्ध्वस्त केली. आता ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी हवाई दलाचे एकूण किती नुकसान झाले याचे मूल्यांकन करण्यात आले आहे.
भारतात विविध धर्मांचे लोक एकत्र राहतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मूलभूत अधिकार असले, तरी त्याचा गैरवापर करून दुसऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावणे मान्य नाही, असे स्पष्ट करत कोलकाता उच्च न्यायालयाने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शर्मिष्ठा पनोली हिला अंतरिम जामीन नाकारला.
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल मधल्या विषयाने रॉयल्स चॅलेंजर बेंगलोरचा 18 वर्षांचा उपवास सुटला. दिग्गज क्रिकेटपटू फोटो विराट कोहली याला काल शांत झोप लागली. या भावना त्याने स्वतः बोलून दाखवल्या.
पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने जलद आणि प्रभावी कारवाई करत पाकिस्तानला कठोर प्रत्युत्तर दिले. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून ४८ तासांत भारताला शरणागती पत्करण्यास भाग पाडू, अशी वल्गना करण्यात आली होती.
भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर केले यशस्वी; पण काँग्रेस आणि भाजप यांनी मात्र शाब्दिक खेळत अडकवली लढाई!! असला प्रकार राहुल गांधींच्या भाषणानंतर आज घडला.
न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी सापडलेल्या रोख रकमेच्या प्रकरणात बॉम्बे लॉयर्स असोसिएशनने (बीएलए) सीजेआय बीआर गवई यांना पत्र लिहिले. या पत्रात, न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू करण्यास मान्यता मागितली आहे. पत्रात, बीएलएने म्हटले आहे की, इन-हाऊस पॅनेलच्या अहवालातून न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील आरोपांची पुष्टी झाली आहे.
उत्तराखंड सरकारने हरिद्वारचे जिल्हा दंडाधिकारी कर्मेंद्र सिंह आणि हरिद्वार महानगरपालिका महानगरपालिका आयुक्त वरुण चौधरी यांना निलंबित केले आहे. याशिवाय पीसीएस अधिकारी अजय वीर यांनाही निलंबित करण्यात आले आहे
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानची २० नव्हे तर २८ ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत. विशेष म्हणजे हा खुलासा खुद्द पाकिस्तानकडूनच आपल्या कागदपत्राद्वारे केला गेला आहे.
सध्या भारतातील अनेक नेते ऑपरेशन सिंदूर का आवश्यक होते हे सांगण्यासाठी आणि याबरोबहरच पाकिस्तानच्या दहशतवादाचा पर्दाफाश करण्यासाठी अनेक देशांमध्ये गेलेले आहेत. दरम्यान, ऑपरेशन सिंदूर नंतर भारताच्या संपर्क कार्यक्रमाचा भाग म्हणून स्पेनला गेलेल्या एका भारतीय शिष्टमंडळाच नेतृत्व द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी करत आहेत.
Operation Sindoor मध्ये भारतीय सैन्याची कारवाई एवढी अचूक आणि प्रखर होती, की भारताने 48 तासांची लढाई आठ तासांमध्ये संपवली होती.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App