Gen Z आणि महिलांचा ज्येष्ठ नेत्यांवर विश्वास; बाता मारणाऱ्या चिरतरुण नेत्यांना चपराक!!, हे खरं म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे खरे फलित आहे.
दिल्ली बॉम्बस्फोटांचा तपास करणाऱ्या एजन्सींना एक मोठा सुगावा लागला आहे. पोलिस सूत्रांचा हवाला देत वृत्तसंस्था पीटीआयने वृत्त दिले आहे की, अटक केलेल्या संशयितांचे तुर्कीची राजधानी अंकारा येथील एका परदेशी हँडलरशी थेट संबंध होते.
१४,५९९ कोटींच्या कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने रिअल इस्टेट कंपनी जेपी इन्फ्राटेक लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक मनोज गौर यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची ईडी काेठडी सुनावली. जेपी समुहातील कंपन्या जेएएल, जेआयएल यांनी घर खरेदीदारांकडून १४,५९९ कोटी रुपये वसूल केले. यातील मोठी रक्कम बांधकामाऐवजी जेपी सेवा संस्थान ट्रस्ट, जेपी हेल्थकेअर लिमिटेड व जेपी स्पोर्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड सारख्या इतर समूह कंपन्या आणि ट्रस्टमध्ये वळवण्यात आली. मनोज गौर हे जेएसएसचे व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. यामुळे अपूर्ण प्रकल्प आणि गुंतवणूकदारांचे नुकसान झाले.
बुधवारी लडाखमधील न्योमा येथील मुध हवाई तळावर ऑपरेशन्स सुरू झाले. भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी काल त्याचे उद्घाटन केले. त्यांनी नोएडा येथील हिंडन हवाई तळावरून सी-१३०जे सुपर हरक्यूलिस विमान उडवले आणि ते न्योमा हवाई तळावर पोहोचले.
बिहार विधानसभेच्या निवडणुकीत विनोद तावडे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे मराठी नेते चमकले, पण एकटे अजित पवार घसरले, असे राजकीय चित्र आज निकालाच्या दिवशी समोर आले.
कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेते मुकुल रॉय यांचे पश्चिम बंगाल विधानसभा सदस्यत्व पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत रद्द केले. न्यायमूर्ती देबांशू बसक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी आणि भाजप आमदार अंबिका रॉय यांनी दाखल केलेल्या याचिकांवर निकाल देताना रॉय यांना राज्य विधानसभेतून अपात्र ठरवले.
बिहारच्या निवडणुकीशी सुतराम संबंध नाही; पण तरीही प्रतिक्रिया देण्याची संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंना घाई!!, असे चित्र बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात दिसले.
मूडीज रेटिंग्जने असा अंदाज वर्तवला आहे की पुढील दोन वर्षांसाठी भारत जी-२० देशांमध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील. मूडीजच्या मते, २०२७ पर्यंत भारताचा जीडीपी विकास सरासरी ६.५% राहण्याचा अंदाज आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले त्या राज्यात राजकीय भूकंप झाला. तिथले जातीय मुस्लिम + यादव (M+Y) समीकरण उद्ध्वस्त झाले
इलेक्ट्रिक वाहनांना (EVs) प्रोत्साहन देणाऱ्या धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका जनहित याचिकेवर (PIL) सुनावणी केली. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने सरकारला राष्ट्रीय इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन (NEMMP) २०२० चा आढावा घेण्याचा तोंडी सल्ला दिला.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात प्रचंड उलटफेर झाला असून सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) प्रचंड विजयाच्या दिशेने पुढे सरकली, तर काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल महागठबंधन यांची मोठी घसरण झाली.
बिहार विधानसभा निवडणुकीचे भरमसाठ आकडे वेगवेगळ्या वृत्तवाहिनी दाखवत असल्या तरी प्रत्यक्षात निवडणूक आयोगाने सकाळी 11.45 पर्यंत जे कल जाहीर केले, त्यामध्ये भाजप 84, जेडीयू 75, आरजेडी 36, लोक जनशक्ती 23 आणि काँग्रेस 7, कम्युनिस्ट 6 जागांवर आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे निवडणूक आयोगाने दिलेले कल लक्षात घेता बिहारमध्ये तेजस्वीचे तेज फिके, कन्हैयाची बासरी फुटली आणि राहुलची vote chori फसली, अशाच शब्दांनी वर्णन करावे लागेल.
बिहार विधानसभा निवडणुकीचे भरमसाठ आकडे वेगवेगळ्या वृत्तवाहिनी दाखवत असल्या तरी प्रत्यक्षात निवडणूक आयोगाने सकाळी साडेनऊ पर्यंत जे कल जाहीर केले
दिल्ली बॉम्बस्फोटांनंतर, फरीदाबादमधील धौज या मुस्लिम बहुल गावात स्थापन झालेल्या अल फलाह विद्यापीठावर दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित डॉक्टरांच्या अटकेनंतर चौकशी सुरू आहे. केंद्र सरकारने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) विद्यापीठाच्या निधीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
१० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासात गुरुवारी एक मोठा खुलासा झाला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर रोजी म्हणजेच बाबरी मशीद पाडण्याच्या वर्धापनदिनानिमित्त दिल्लीसह अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा दहशतवाद्यांचा हेतू होता.
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या 14 नोव्हेंबरला लागणार आहेत पण ते निकाल येण्याच्या दिवशीच बिहारमध्ये “नेपाळ” आणि “बांगलादेश” घडवायची लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाने तयारी केली. तशी धमकीच राष्ट्रीय जनता दलाचे नेते सुनील सिंह यांनी दिली. त्यामुळे बिहार पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध FIR दाखल केला.
मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. यानंतर वाराणसी विमानतळावर (लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ) विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली.
कंगना रणौतविरुद्ध आग्रा येथे देशद्रोह आणि शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा खटला दाखल केला जाणार आहे. बुधवारी विशेष न्यायाधीश, MP-MLA लोकेश कुमार यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने कंगनाविरुद्ध दाखल केलेली पुनर्विचार याचिका स्वीकारली.
१० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या गुरुग्राम आणि फरीदाबाद पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. हरियाणाच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवादी मॉड्यूलचा २०० हून अधिक शक्तिशाली आयईडी तयार करण्याचा हेतू होता. म्हणून, २९०० किलो स्फोटके, टायमर आणि इतर बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणण्यात आले.
वृत्तसंस्था न्यूयॉर्क : New York Mumbai न्यूयॉर्क शहरातील एक प्रमुख रिअल इस्टेट अब्जाधीश बॅरी स्टर्नलिच्ट यांनी चिंता व्यक्त केली आहे की ममदानी यांच्या नेतृत्वाखाली शहराची […]
सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन (SCBA) ने, अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड प्रज्ञा बघेल यांच्यामार्फत, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे ज्यामध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, देशाच्या अनेक भागांमध्ये, मासिक पाळीच्या काळात महिलांची प्रतिष्ठा, शारीरिक स्वायत्तता आणि गोपनीयतेचे उल्लंघन केले जात आहे.
देशातील सर्व मोठ्या आणि लहान निर्यातदारांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने क्रेडिट गॅरंटी स्कीम (CGSE) ला मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने आज (१२ नोव्हेंबर) हा निर्णय घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संध्याकाळी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक बोलावली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील उपस्थित होते. दिल्ली लाल किल्ल्यावर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर मोदींनी ही बैठक बोलावली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App