भाजपचे राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी काँग्रेस पक्षावर जातीवर आधारित संघर्षाला खतपाणी घालण्याचा आरोप केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, ‘’पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. जारी केलेल्या अधिसूचनेत स्पष्टपणे म्हटले आहे की, स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच जनगणनेसोबतच सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण आणि जातीवर आधारित जनगणना देखील केली जाईल. यामागील आमचे उद्दिष्ट सर्व जातींची ओळख, सर्व जातींचा आदर आणि शेवटच्या टोकाला उभ्या असलेल्या जातींचे उत्थान आहे. परंतु इंडि आघाडी आणि काँग्रेस फक्त त्यांच्या कुटुंबाच्या उन्नतीचा विचार करतात.’’
विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले..अधिक माहितीनुसार, इंडिगोचे विमान ६ई २७०६ कोचीहून दिल्लीला निघाले होते. दरम्यान विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर विमानाचे नागपुरात आपत्कालीन लँडिंग करावे लागले. पोलिस आणि अग्निशमन दल विमानाची कसून तपासणी करत आहेत. विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले आहे. विमानातून आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
झारखंड मुक्ती मोर्चाचे सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय जनता दलाबद्दल मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की बिहार निवडणुकीत आरजेडीने युती धर्माचे पालन करावे. बिहारमधील महाआघाडीच्या बैठकीला ‘झामुमो’ला आमंत्रित न केल्याबद्दल सुप्रियो भट्टाचार्य यांनी हे विधान केले आहे.
इस्रायलसोबत सलग चौथ्या दिवशी सुरू असलेल्या संघर्षादरम्यान इराणने सोमवारी परदेशी नागरिकांना देश सोडण्याची परवानगी दिली. सूत्रांनी दिव्य मराठीला सांगितले की, भारताने इराणमधील आर्मेनियाच्या राजदूताशी त्यांच्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी बोलले आहे.
दहशतवाद्यांच्या निधीवर लक्ष ठेवणारी संघटना फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) ने सोमवारी म्हटले की, पहलगाम दहशतवादी हल्ला दहशतवाद्यांच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकला नसता. यामध्ये दहशतवाद्यांना निधी देण्यात आला आहे.
मे महिन्यात घाऊक महागाई दर ०.३९% पर्यंत खाली आला आहे. हा १४ महिन्यांतील सर्वात कमी स्तर आहे. मार्च २०२४ च्या सुरुवातीला घाऊक महागाई दर ०.२६% होता. दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणि अन्नपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई कमी झाली आहे.
१६ जून २०२५ पासून भारतीय डिजिटल पेमेंट प्रणालीत एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI व्यवहार जलद आणि विश्वासार्ह करण्यासाठी काही महत्त्वाचे बदल आजपासून लागू केले आहेत. यामुळे आता UPI व्यवहार पूर्वीपेक्षा ५०% जलद होतील. पूर्वी जे पेमेंट पूर्ण होण्यास ३० सेकंद लागत होते, ते आता केवळ १५ सेकंदात पूर्ण होणार आहेत.
इराण – इजराइल संघर्षाचे कारण सांगून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी G7 ही बैठक अर्ध्यावर टाकून कॅनडातून अमेरिकेत प्रस्थान ठेवले. पण त्याचवेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणेही टाळले.
जात जनगणनेबाबत गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांचे एक मोठे विधान समोर आले आहे. गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ‘२०२७ च्या जनगणनेत जात जनगणना देखील समाविष्ट केली जाईल.’
सक्तवसुली संचालनालयाने उद्योगपती आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत भारताच्या विमान अपघात अन्वेषण ब्युरो (एएआयबी) ला मदत करण्यासाठी उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक तपासनीस आणि बोईंग प्रतिनिधी अहमदाबादला पोहोचले आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. २३ वर्षांत सायप्रसला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांनी ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III प्रदान केले. पंतप्रधान मोदी रविवारी या भूमध्यसागरीय बेट देशात पोहोचले जिथे राष्ट्रपती निकोस यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिड्स यांनी संयुक्तपणे माध्यमांना संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी सीमापार दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढाईत सायप्रसच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यासोबतच, दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाबद्दलही चिंता व्यक्त केली.
केंद्र सरकारने सोमवारी जनगणनेसाठी अधिसूचना जारी केली आहे. राजपत्रात असे सांगण्यात आले आहे की जनगणना प्रक्रिया दोन टप्प्यात पूर्ण होईल.
जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थिती असताना आणि जागतिक अर्थव्यवस्था मंदीचे हेलकावे खात असताना इतर मोठ्या देशांच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था स्थिर आणि सकारात्मक आहे, याचे प्रत्यंतर आज समोर आले.
:प्रेमाला धर्माची चौकट घालता येत नाही. दोन वेगवेगळ्या धर्मातील व्यक्तींमध्ये प्रेम होतं, म्हणजे ते लव्ह जिहादचं नाव घेतलं जावं का? असा सवाल प्रसिद्ध अभिनेते आमिर खान याने केला .’आप की अदालत’ या कार्यक्रमात आमिर खानला लव्ह जिहादला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपांबाबत विचारण्यात आलं असता, त्याने स्पष्ट शब्दांत आपली बाजू मांडली.
रविवारी पहाटे ५:२० वाजता केदारनाथजवळील गौरीकुंड येथे हेलिकॉप्टर कोसळले. यामध्ये पायलटसह सर्व ७ प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील एका २ वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे.
मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त शोध मोहिमेत, ३२८ शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. यामध्ये सेल्फ लोडिंग रायफल्स (SLR) आणि INSAS सारख्या रायफल्सचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सायप्रसला पोहोचले आहेत. सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिड्स यांनी रविवारी विमानतळावर लाल गालिचा अंथरूण त्यांचे स्वागत केले. अध्यक्ष निकोस पंतप्रधान मोदींचा हात धरून चालत गेले.
ऑपरेशन सिंदूरनंतर काही आठवड्यांनंतर हवाई दलाच्या ताफ्यात एक नवीन विमान सामील होणार आहे. या महिन्याच्या अखेरीस हवाई दलाला स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमान तेजस Mk 1A हे पुढील पिढीचे विमान मिळेल. उड्डाण चाचण्यांची अंतिम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे लढाऊ विमान ताफ्यात सामील होईल.
अहमदाबाद विमान अपघातात प्राण गमावलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे डीएनए जुळले आहेत. त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात येईल आणि राजकोटमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली होती आणि त्यांना शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तथापि, नंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
पुढच्या पाच वर्षांमध्ये जागतिक पातळीवर मोठ्या उलथापालथी घडून भारताची सीमा सध्याच्या पाकिस्तानच्या आतमध्ये 150 किलोमीटर पर्यंत खोलवर घुसेल, असे खळबळजनक आणि गंभीर भाकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी शिमला मधल्या पत्रकार परिषदेत केले. संघाच्या वरिष्ठ नेत्याने एवढे थेट भाकीत केल्याने आंतरराष्ट्रीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटलेत.
हिज्बुत-तहरीर (एचयूटी) या दहशतवादी संघटनेच्या नेटवर्कबाबत राष्ट्रीय तपास संस्थेची (एनआयए) चौकशी तीव्र झाली आहे.
बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी एनडीए सोडून एलजेपी (रामविलास) विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App