१ मेपासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला अधिक शुल्क भरावे लागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने एटीएममधून पैसे काढण्याच्या शुल्कात वाढ जाहीर करणारी अधिसूचना जारी केली आहे.
सुप्रीम कोर्टाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याला लोकशाहीचा महत्त्वाचा घटक मानत काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढींविरुद्ध गुजरातेत दाखल एफआयआर रद्द केला. कोर्टाने म्हटले, “जरी मोठ्या संख्येने लोकांना कुणाचे विचार आवडत नसले तरी त्यांच्या विचार मांडण्याच्या अधिकाराचा सन्मान व संरक्षण व्हावे. ”
पत्नीशी जोरदार भांडण झाल्यानंतर तिचा खून करून मृतदेह बंगळुरूहून कारने मुंबईला नेताना टेक इंजिनिअर पती राकेश राजेंद्र खेडकर (३५) याला सातारा जिल्ह्यात शिरवळ येथे अटक करण्यात आली. पत्नीचा खून केल्यामुळे तणावात असलेल्या राकेशने महाराष्ट्रात कागल गावात आल्यानंतर कीटकनाशक प्राशन केले.
भारतात जन्मलेले आणि ३० वर्षांपासून ब्रिटनमध्ये वास्तव्याला असलेले दिग्गज स्टील उद्योजक लक्ष्मी मित्तल ब्रिटन सोडण्याच्या तयारीत आहेत. तेथील नॉन-डोमिसाइलची कररचना संपुष्टात आणल्याने त्यांनी हे पाऊल उचलले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिबली या सोशल मीडिया ट्रेंडमध्ये भाग घेतला आहे. भारत सरकारच्या अधिकृत X हँडलने AI च्या मदतीने जिबली स्टुडिओच्या थीमवर बनवलेले पंतप्रधान मोदींचे फोटो शेअर केले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २३ मार्च रोजी झालेल्या भेटीनंतर २०२७ मध्ये महाराष्ट्रातील नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला आहे, परंतु या कुंभमेळ्याच्या नावावरून सध्या मतभेद निर्माण झाल्याचे दिसत आहेत.
भारताच्या शेजारील देश अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपामुळे लोकांना घराबाहेर पडावे लागले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या म्हणण्यानुसार, शनिवारी पहाटे ५:१६ वाजता अफगाणिस्तानात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.७ इतकी नोंदवण्यात आली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी लंडन दौऱ्यादरम्यान देशाच्या अर्थव्यवस्थेवर केलेल्या एका टिप्पणीमुळे भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर टीका होत आहे.
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) गुरुग्राम क्षेत्रीय कार्यालयाने २९ लाख रुपयांच्या खंडणीच्या गुन्ह्यातील संपत्ती (पीओसी) तात्पुरती जप्त केली आहे
मोहालीच्या POCSO न्यायालयाने २०१८ च्या झिरकपूर लैंगिक अत्याचार आणि बलात्कार प्रकरणात स्वयंघोषित ख्रिश्चन धर्मोपदेशक पास्टर बजिंदर सिंग यांना दोषी ठरवले आहे. या प्रकरणात ७ जणांना आरोपी करण्यात आले होते,
दिल्ली विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये प्रचंड गोंधळ झाला. सभागृहात एका प्रश्नाच्या उत्तरात मंत्री प्रवेश वर्मा म्हणाले की, आज विरोधी पक्षाचे आमदार आमच्याकडे येत आहेत आणि सांगत आहेत
केंद्रीय मंत्रिमंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे. या वाढीमुळे लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळेल. या निर्णयामुळे, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनधारकांचा महागाई मदत (DR) 53टक्केवरून ५५ टक्क्यांपर्यंत वाढेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हॉट इंडिया थिंक्स टुडे (WITT) शिखर परिषदेत देशाच्या प्रगती, भ्रष्टाचाराविरुद्ध उचललेली पावले आणि सरकारच्या धोरणांबद्दल सविस्तर भाष्य केले. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कामकाजाचा उल्लेख करताना ते म्हणाले
बांगलादेश बॉर्डर वरचे कुंपण ममता बॅनर्जींच्या सरकारने अडवले मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी राष्ट्रीय सुरक्षेशी खेळले!! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जींचे डाव एक्सपोज केले. इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल 2025 गुरुवारी लोकसभेने मंजूर केले. या विधेयकावरील चर्चेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परखड उत्तर दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या भूकंपामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, या घडीला भारत दोन्ही देशांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.
पश्चिम बंगाल वर एकेकाळी निर्विवाद सत्ता गाजवलेला कम्युनिस्ट पक्ष गेल्या कित्येक वर्षात झोपी गेला होता. तो आता विद्यार्थ्यांच्या रूपाने “जागा” झाला. डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया DYFI या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी सिलिगुडी मध्ये मोठे आंदोलन केले, पण ममता बॅनर्जी यांच्या पोलिसांनी ते आंदोलन मोडून काढताना आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना झोडपून काढले
सार्वजनिक मालमत्ता कायद्याच्या कथित उल्लंघनाबाबतच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल केला
ओडिशामध्ये, काँग्रेसने गुरुवारी त्यांच्या सर्व १४ आमदारांच्या निलंबनाविरुद्ध निषेध केला. कार्यकर्ते विधानसभेला घेराव घालण्यासाठी त्या दिशेने जात होते. यादरम्यान त्याची पोलिसांशी झटापट झाली.
हातात लाल संविधान घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर “गद्दार” विडंबन काव्य करून मुंबई बाहेर पळून गेलेल्या लाल संविधानी कुणाल कामराची फाटली
जिंदाल स्टेनलेस लिमिटेड महाराष्ट्रात ४२ हजार ८८६ कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचा प्रकल्प उभा करणार आहे.
जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले आणि दोन दहशतवादी ठार झाले. याशिवाय तीन दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
केंद्र सरकार २०२६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर) बाजारातून ८ लाख कोटी रुपये कर्ज घेईल. हे संपूर्ण वर्षाच्या कर्ज लक्ष्याच्या (₹१४.८२ लाख कोटी) ५४% आहे.
गुरुवारी लोकसभेत इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल २०२५ मंजूर करण्यात आले. विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, “रोहिंग्या असोत किंवा बांगलादेशी, जर ते भारताला हानी पोहोचवण्याच्या मानसिकतेसह आले तर त्यांच्यावर अतिशय कठोर कारवाई केली जाईल.”
केरळच्या कलिकत विद्यापीठात काळे फुगे, सावरकर विरोधात SFI ची निदर्शने; राज्यपालांनी धू धू धुतले!!
मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १७ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे, शिवाजीनगर पोलिस स्टेशन आणि सीआरपीएफ पथकाने त्यांना पकडले आहे. पकडलेल्यांपैकी कोणीही भारतीय असल्याचा पुरावा देऊ शकत नव्हता. सध्या पोलिस सर्वांची चौकशी करण्यात व्यस्त आहेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App