दिल्ली विधानसभा निवडणुकीतील सकाळपासून येणाऱ्या सुरुवातीच्या ट्रेंड्स पाहता, आम आदमी पक्षाचे सर्व मोठे नेते सध्या मौन बाळगत आहेत. सोशल मीडियावर किंवा कोणत्याही माध्यमांसमोर कोणतेही विधान आलेले नाही.
केंद्रीय पातळीवर Indi आघाडीत एकत्र असलेले दोन पक्ष काँग्रेस आणि आम आदमी पार्टी आपापसात लढले. त्यामुळे त्या दोघांच्या नौका यमुनेत बुडाल्या. दिल्लीतली आम आदमी पार्टीची सत्ता गेली आणि ती काँग्रेसलाही मिळाली नाही दोन्ही पक्ष वेगवेगळे लढल्याने दिल्लीत भाजपची सत्ता आली.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक्झिट पोल मधला निष्कर्ष खरा ठरताना दिसतोय. दिल्लीत अरविंद केजरीवालांची सत्ता जाऊन तिथे भाजप सत्तेवर येताना दिसतोय.
: अमेरिकेने भारतात हद्दपार करण्यासाठी 487 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांची ओळख पटवली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले. यापैकी 298 लोकांची माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत अनियमितता झाली असल्याचा आरोप लोकसभेतील काँग्रेसची विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला आहे. या संदर्भात राहुल गांधी, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली.
शुक्रवारी कोलकाता हायकोर्टात आरजी कर बलात्कार-हत्या प्रकरणाशी संबंधित खटल्याची सुनावणी झाली. न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारची याचिका फेटाळून लावली आणि सीबीआयची याचिका स्वीकारली.
ट्रम्प प्रशासनाने गुरुवारी यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (USAID) च्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना जाहीर केली. यानुसार, यूएसएआयडीमध्ये फक्त 300 कर्मचारी ठेवले जातील.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने व्याजदर ६.५% वरून ६.२५% पर्यंत कमी केले आहेत. म्हणजेच, कर्ज स्वस्त होईल आणि तुमचा ईएमआय देखील कमी होईल. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सकाळी १० वाजता चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) मध्ये घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल, संजय सिंह आणि मुकेश अहलावत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भ्रष्टाचार विरोधी शाखेचे (एसीबी) पथक अरविंद केजरीवाल, पक्षाचे खासदार संजय सिंह आणि मुकेश अहलावत यांच्या घरी चौकशीसाठी पोहोचले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसीबीचे पथक मुकेश अहलावत, अरविंद केजरीवाल आणि संजय सिंह यांच्या घरांवर चौकशीसाठी रवाना झाले होते
अमेरिकेतील १०४ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन जाणारे अमेरिकन लष्करी विमान अमृतसरमध्ये उतरताच, विरोधकांनी संसदेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी या घटनेवर परराष्ट्रमंत्र्यांकडे उत्तर देण्याची मागणी केली, त्यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात उत्तर दिले. जयशंकर यांनी गुरुवारी सांगितले की अमेरिकेची ही कृती नवीन नव्हती, त्यानंतर त्यांनी १५ वर्षांचा डेटा शेअर केला.
लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज केला. त्यांनी मतदार यादीत अनियमितता असल्याचा आरोप केला आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात ७ लाख मतदार वाढल्याचा दावा त्यांनी केला.
भविष्य निर्वाह निधी क्लेम सेटलमेंटच्या बाबतीत ईपीएफओने इतिहास रचला आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ५ कोटींहून अधिक दावे निकाली काढले आहेत जो एक विक्रम आहे. कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली आहे.
म्यानमारसह चार ईशान्येकडील राज्यांच्या १,६४३ किमी लांबीच्या सीमेवर काटेरी तारांचे कुंपण उभारण्याच्या प्रकल्पाला विरोध सुरू झाला आहे. या कारणास्तव, ४ पैकी ३ राज्यांमध्ये अद्याप काम सुरू झालेले नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात फ्रान्सला भेट देणार आहेत. जिथे ते ११ फेब्रुवारी रोजी पॅरिसमध्ये होणाऱ्या एआय समिट २०२५ चे सह-अध्यक्षपद भूषवतील. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स, चीनचे उपपंतप्रधान आणि इतर अनेक जण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राजनैतिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी या काळात अनेक फ्रेंच कंपन्यांच्या प्रमुखांना भेटतील आणि त्यांच्याशी चर्चा करतील.
प्रयागराजमधील महाकुंभ चेंगराचेंगरीच्या प्रकरणाचा तपास आता कटाकडे वळत आहे. उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारच्या एजन्सी याचा तपास अपघात नसून कट म्हणून करत आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर सातत्याने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात EVM वर आरोपांच्या बंदुकांच्या फैरी झाडणार्या विरोधकांनी आता त्या मशीन वरची बंदूक हटवली आणि ती मतदार यादी कडे वळवली.
अमेरिकेने मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिकांचे डिपोर्टेशन केल्यानंतर त्यांचे पुढे काय होईल? हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. भारतात काही खटला चालेल का? ते पुन्हा अमेरिकेला जाऊ शकतील का? याची पोलिस चौकशी होईल का? म्हणूनच आजच्या द फोकस एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया अशाच काही प्रश्नांची उत्तरे.
आंध्र प्रदेश भाजपने गुरुवारी आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) मधील 1,000 बिगर-हिंदू कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची मागणी केली. आंध्र प्रदेश भाजपचे प्रवक्ते आणि टीटीडी सदस्य भानू प्रकाश रेड्डी म्हणाले की, बोर्डाचे प्रतिनिधी 14 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतील आणि त्यांना मंदिरातील सेवांमधून बिगर-हिंदूंना काढून टाकण्याची विनंती करतील.
अमेरिकेतून येणाऱ्या बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांच्या मुद्द्यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी संसदेत उत्तर दिले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितले की, ‘जर कोणताही नागरिक परदेशात बेकायदेशीरपणे राहत असेल तर त्याला परत बोलावणे ही प्रत्येक देशाची जबाबदारी आहे.’
दिल्लीचे एक्झिट पोल खोटे ठरण्याची आशा; अरविंद केजरीवालांनी घेतला सगळ्या 70 उमेदवारांचा मेळावा!!, असे आज दिल्लीत घडले. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे उद्या निकाल आहेत, या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वाचा ठरला.
चीनच्या ताब्यात असणाऱ्या तिबेटमधील भागात कैलास मानसरोवर यात्रेची तयारी सुरू झाली आहे. २०१९ पासून ही यात्रा बंद होती. यात्रेसाठी भारतीयांचा पहिला जथ्था जूनच्या पहिल्या आठवड्यात रवाना होऊ शकतो.
डिस्कव्हरीने लोकांना दाखवलेल्या आसारामच्या ‘कल्ट ऑफ फिअर’ची कहाणी खुद्द कर्मचारीच अनुभवत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्कव्हरी प्लसचे कर्मचारी आसाराम समर्थकांच्या दहशतीमुळे भीतीखाली वावरत आहेत. भीतीदेखील अशी की १०० हून अधिक कर्मचारी कार्यालयात येत नाहीत आणि ते त्यांच्या घरातच बंदिस्त आहेत.
प्रयागराज मध्ये भरलेल्या महाकुंभ मेळ्याची पॉप्युलरिटी सगळ्यात जगभरात पोहोचल्यानंतर तिथल्या व्यवस्थेची देखील सगळीकडे वाखाणणी झाली.
भारतीय सैन्याची अग्निशक्ती वाढवण्याच्या उद्देशाने ‘पिनाका मल्टिपल लाँच रॉकेट सिस्टीम’ साठी एरिया डिनायल ऑर्डनन्स टाइप-१ आणि हाय एक्सप्लोसिव्ह कॅपॅबिलिटी रॉकेट्स खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी संरक्षण कंपन्यांसोबत १०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे करार केले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App