१७ वर्षांनंतर विशेष सीबीआय न्यायालयाने शनिवारी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती (निवृत्त) निर्मल यादव आणि इतर चार जणांना न्यायाधीशाच्या दारात सापडलेल्या रोख रकमेच्या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले.
विरोधी पक्षांच्या काही सूचनांचा समावेश केल्यानंतर, सरकारने वक्फ विधेयकातील सुधारणांबाबत संयुक्त संसदीय समितीने केलेल्या सूचना स्वीकारल्या आहेत. त्याच आधारावर, सरकार ईदनंतर मंगळवारी लोकसभेत वक्फ विधेयक सादर करू शकते, असे म्हटले जात आहे. या अधिवेशनात किमान एका सभागृहाने विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. ऑगस्ट २०२४ मध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक जेपीसीकडे पाठवण्यात आले होते.
गृह मंत्रालयाने मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये 6 महिन्यांसाठी सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) लागू केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या देशसेवेचे शतक पूर्ण करत असताना, संघ या महत्त्वाच्या टप्प्याकडे कशा प्रकारे पाहतो याबद्दल देशात आणि सगळ्या जगात कुतूहल आहे.
प्रसिद्ध कथाकार आणि बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी माध्यमांशी बोलताना मुझफ्फरनगरचे नाव बदलून माँ भगवती आदिशक्तीच्या नावावर ठेवण्याबाबत बोलले आहेत.
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोवर आयकर विभागाने मोठा दंड ठोठावला आहे. प्राप्तिकर विभागाने इंडिगोला ९४४.२० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील गडवा गावात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची वडिलोपार्जित जमिन फसवणूक करून हडप केल्याप्रकरणी तीन आरोपींना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या नागपूर दौऱ्यात माधव नेत्रालय प्रीमियर सेंटरची पायाभरणी केली. यानंतर, पंतप्रधान मोदींनी तिथे एका जाहीर सभेलाही संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, चैत्र शुक्ल प्रतिपदेचा हा दिवस खूप खास आहे. गुढीपाडवा साजरा केला जात आहेत.
तप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूरच्या रेशीम बागेमध्ये डॉ. हेडगेवार स्मृती स्थळावर जाऊन संघ प्रेरणेच्या गोष्टी सांगितल्या
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी वक्फ मालमत्तांचे संरक्षण करण्याचे आश्वासन दिले आहे. २७ मार्च रोजी विजयवाडा येथे राज्य सरकारच्या इफ्तार पार्टीत बोलताना नायडू म्हणाले की, तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) नेहमीच मुस्लिमांना न्याय दिला आहे, आम्ही वंचित मुस्लिम कुटुंबांच्या उन्नतीसाठी वचनबद्ध आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरच्या रेशीम बागेत संघ स्मृतीस्थळी भेट दिली. संघस्थळावर येणारे ते पहिले पंतप्रधान ठरले. संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून मोदींनी ध्येयपथ पर चल रहे है!! याची जाणीव देशावासीयांना करून दिली.
देशाचे पंतप्रधान प्रथमच संघाच्या जन्मभूमीत हेडगेवार स्मृतीस्थळी आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना अभिवादन केले.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ म्हणाले की, देशातील नद्यांची स्थिती पाहून काळजी वाटते. ते घाणीने भरलेले आहेत. जेव्हा मी या नद्यांच्या काठाकडे पाहतो, तेव्हा मला जुन्या गोष्टी आठवतात. हे पाणी एकेकाळी खूप जिवंत आणि शुद्ध होते. आपण त्यांचा अभिमान वाचवू शकत नाही, ही चिंतेची बाब आहे.
चालू आर्थिक वर्षात दिल्ली सरकारने दारूवरील करातून ५,०६८.९२ कोटी रुपये कमावले आहेत, तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधून फक्त २०९.९ कोटी रुपये मिळाले आहेत. भाजप आमदार अभय वर्मा यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सरकारने ही माहिती दिली.
केंद्रातल्या मोदी सरकारने आणलेल्या Waqf सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावर सुरुवातीपासूनच बॅकफूटवर गेलेल्या मुस्लिम संघटनांनी आता सत्ताधारी NDA आघाडीतच सेंधमारी करायची तयारी चालवली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात शनिवारी सकाळी सुरक्षा कर्मचारी आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत आतापर्यंत १६ नक्षलवादी ठार झाले आहेत. INSAS आणि SLR सह मोठ्याप्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते. एका वर्षात आतापर्यंत ४१० नक्षलवादी मारले गेले आहेत.
भारत आणि रशियाने शुक्रवारी चेन्नई किनाऱ्याजवळ सहा दिवसांचा नौदल सराव सुरू केला. या लष्करी सराव इंद्रमध्ये रशियन नौदल जहाजे – पेचांगा, रेझकी आणि अल्दार त्स्यदेन्झापोव्ह सहभागी होत आहेत. या सरावात, नौदलाने त्यांच्या युद्धनौका राणा, कुठार आणि सागरी गस्त विमान P81 तैनात केले आहेत.
भूकंपग्रस्त म्यानमारला मदत करण्यासाठी भारत पुढे आला आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी देशाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) ८० कर्मचाऱ्यांची एक टीम म्यानमारला पाठवली आहे. यामध्ये स्निफर डॉग्सचाही समावेश आहे.
भारतीय जनता पक्ष केंद्रात किमान तीस वर्षे सत्तेत राहील. असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की लोकशाहीमध्ये कोणत्याही पक्षाचा विजय त्याच्या कठोर परिश्रमावर अवलंबून असतो. जर तुम्ही स्वतःसाठी नाही तर देशासाठी जगलात तर तुमचा विजय निश्चित असेल.
रेस्टॉरंट्स आता अन्न बिलांमध्ये अनिवार्य सेवा शुल्क आकारू शकत नाहीत. दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी (२८ मार्च) २०२२ मध्ये केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन काव्य करून मुंबईतून पळून गेलेल्या कुणाल कामराविरुद्ध खार पोलिसांनी आणखी तीन गुन्हे दाखल केले.
राम मंदिर एडिशनचे घड्याळ घातल्याबद्दल उत्तर प्रदेशातील मौलाना अभिनेता सलमान खानवर संतापले आहेत. बरेलीतील अखिल भारतीय मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी म्हणाले- सलमानने राम मंदिराचे घड्याळ घालणे बेकायदेशीर आणि हराम आहे. तो शरियाचा गुन्हेगार आहे. मुस्लिम असूनही गैर-इस्लामी काम केले. पश्चात्ताप केला पाहिजे.
ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉनचे संस्थापक आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती जेफ बेझोस (६०) हे त्यांची प्रेयसी लॉरेन सांचेझ (५५) हिच्याशी लग्न करणार आहेत. न्यूयॉर्क पोस्टनुसार, हे लग्न २६ जून ते २९ जून दरम्यान इटलीच्या व्हेनिसमध्ये होईल.
28 मार्च 2025 या दिवशी भारतातील न्यायव्यवस्था “स्वतंत्र” झाली. त्यामुळे काँग्रेसचे राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी़ आणि कॉमेडीयन कुणाल कामरा यांनी खुशी जाहीर करून टाकली.
प्रयागराजच्या कुंभमेळा तब्बल 67 कोटी भाविकांच्या त्रिवेणी संगम स्नानाने गाजला. त्याला जागतिक कीर्ती लाभली. योगी आदित्यनाथ सरकारने उत्तम नियोजन करून प्रयागराज आणि उत्तर प्रदेशचा चेहरा मोहरा बदलला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App