लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की मोदीजी जात जनगणना करण्यास घाबरतात. ते कधीच असे करणार नाहीत, पण लोकसभा-राज्यसभेतील 50 टक्के आरक्षणाची भिंत आम्ही पाडू. कोणीही आम्हाला थांबवू शकणार नाही. आम्ही आधी काँग्रेसशासित राज्यांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण देऊ. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर कायदा करून ही भिंत पाडू.
लोकसभा आणि विविध राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर भाजपशासित राज्यांनी आपापल्या राज्यांमध्ये परकीय गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे चित्र दिसू लागले, त्या उलट निवडणुका संपून देखील काँग्रेसच मात्र अद्याप जुनेच मुद्दे उगाळण्यापासून मागे हटायला तयार नसल्याचे चित्र समोर आले.
कर्नाटक उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांना पाठवलेल्या ईडीच्या नोटीसला स्थगिती दिली आहे. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MUDA) जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने पार्वती यांना नोटीस बजावली होती. पुरावे आणि रेकॉर्ड सादर करण्यासाठी त्यांना 28 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता ईडीच्या बंगळुरू कार्यालयात बोलावण्यात आले.
प्रयागराज मध्ये सनातन धर्म संसदेत सर्व संत महतांनी एकत्र येऊन संमत केलेल्या सनातन हिंदू बोर्डाला काँग्रेसने विरोध केला आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी सनातन हिंदू बोर्ड अधिनियम राज्यघटनेच्या विरोधात असल्याचा दावा केला, पण याच काँग्रेसने मुस्लिम वक्फ बोर्डाच्या कट्टरतेला मात्र घटनात्मक वैधता प्राप्त करून दिली आणि वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याला विरोध केला.
समान नागरी कायदा (यूसीसी) लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. सोमवारी मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी ucc.uk.gov.in हे पोर्टल लाँच केले.
भारत आणि चीनने सोमवारी कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंध ‘स्थिर आणि पुनर्संचयित’ करण्यासाठी काही लोककेंद्रित पावले उचलण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बीजिंगमध्ये त्यांचे चिनी समकक्ष सन वेइडोंग यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली.
संयुक्त संसदीय समिती वक्फने वक्फ (दुरुस्ती) विधेयकावरील सत्ताधारी रालोआच्या दुरुस्तीला मंजुरी दिली. समितीने भाजप सदस्यांच्या प्रस्तावित सर्व शिफारशी स्वीकारल्या. विरोधी पक्षाच्या शिफारशी मात्र फेटाळल्या गेल्या. विरोधी पक्षाने सर्व ४४ तरतुदींवर दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला होता.
काँग्रेसवर भांडवलदारांनी हजार कोटी रुपयांच्या देणग्यांचा वर्षाव केला तरीही पक्षाच्या नेतृत्वाने भांडवलदारांविरुद्धचा आवाज मोठा ठेवला.
महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्ष वेगवेगळे लढणार असल्याची चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता नवा फॉर्मुला मांडला आहे. मुंबईत स्वबळावर पण महाराष्ट्रात इतरत्र आघाडी करून महापालिका निवडणूक लढणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांच्या ऐतिहासिक दुसऱ्या कार्यकाळाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. दोन्ही नेत्यांमधील ही चर्चा द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याच्या आणि जागतिक मुद्द्यांवर सहकार्य वाढविण्याच्या संदर्भात झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ‘एक देश, एक निवडणूक’ या विषयावर देशात सुरू असलेल्या चर्चेचे वर्णन भारताच्या लोकशाही प्रक्रियेसाठी ‘महत्वाचे’ आणि तरुणांच्या भविष्याशी संबंधित मुद्द्याचे केले आणि त्यांना सक्रियपणे सहभागी होण्याचे आणि त्यात प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.
मध्य प्रदेशातील महू येथे एका रॅलीला संबोधित करताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप नेत्यांच्या महाकुंभ स्नानाबाबत वादग्रस्त विधान केले.
देशात मुसलमानांसाठी जर वक्फ बोर्ड कायदा लागू असेल, तर केंद्रातील मोदी सरकारने सनातनी हिंदूंसाठी सनातन हिंदू बोर्ड अधिनियम आणला पाहिजे
त्तराखंड मध्ये समान नागरी कायदा UCC आजपासून लागू झाला. त्यामुळे भारतीय कायद्यानुसार विवाह नोंदणी, लिव्ह इन रिलेशन नोंदणी अत्यावश्यक होईल.
Waqf JPC अर्थात संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीमध्ये वक्फ बोर्ड कायद्यात केंद्रातील मोदी सरकारने सुचविलेल्या सगळ्या 44 सुधारणांवर सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये सर्व सदस्यांनी फेर सुधारणा सूचविल्या.
देशातल्या शिक्षण व्यवस्थेच्या प्रायव्हेटायझेशनवर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज हल्लाबोल केला. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी मध्य प्रदेशातील महू येथे जय गांधी, जय भीम, जय संविधान महा रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी शिक्षण व्यवस्थेच्या प्रायव्हेटायझेशन वर घसरले. त्यांनी मोदी सरकारला त्याबद्दल धारेवर धरले.
अर्थ मंत्रालयाने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या नवीन अध्यक्षांचा शोध सुरू केला आहे. कारण सध्याच्या नियामक प्रमुख माधबी पुरी बुच यांचा कार्यकाळ २८ फेब्रुवारी रोजी संपत आहे.
सनातन धर्म हा भारताचा राष्ट्रधर्म आहे. प्रयागराज या ठिकाणी सुरु असलेला कुंभ मेळा हा विशिष्ट जात किंव धर्मासाठी नाही तर प्रत्येकासाठी आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.Yogi Adityanath
दिल्लीतील जंगपुरा येथे झालेल्या जाहीर सभेदरम्यान आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, येणाऱ्या दिल्ली सरकारमध्ये मनीष सिसोदिया यांची दिल्लीचे उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली जाईल. यावेळी केजरीवाल म्हणाले, “सर्वजण म्हणत आहेत की दिल्लीत आम आदमी पार्टी सरकार स्थापन करेल आणि मनीष सिसोदिया आमच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असतील.
भिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यातील संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या तरूणाचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. पोलिसांकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर, आकाश कनोजियाने आरोप केला आहे की मुंबई पोलिसांच्या एका चुकीमुळे त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काल भाजपने संकल्प पत्र जाहीर केल्याबरोबर आज अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने 15 गॅरंटीचे कार्ड जारी केले. यामध्ये महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना केजरीवाल यांनी रिपीट केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दिल्लीतील नरेला येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी अमित शहा यांनी आम आदमी पक्षाला ‘बेकायदेशीर उत्पन्न असणार पक्ष’ म्हटले. गृहमंत्री अमित शहा यांनी आरोप केला की पक्ष मते मिळविण्यासाठी खोटे बोलतो आणि त्यांच्या १० वर्षांच्या सत्तेत अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराशिवाय काहीही केले नाही.
Waqf सुधारणा कायद्याचा अंतिम मसुदा तयार करून तो संसदेला सादर करायची वेळ आली असताना Waqfjpc मधल्या विरोधी सदस्यांनी बैठकांमध्ये गदारोळ करून समितीचे कामकाज लांबवायचा प्रयत्न चालवला.
महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या एका विधानावरून महाराष्ट्रात एक नवीन वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री झालेले झिरवळ यांनी हिंगोलीचे वर्णन ‘गरीब जिल्हा’ असे केले आहे
भारताने रविवारी ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. यानिमित्ताने कर्तव्य पथ येथे आयोजित समारंभात देशाच्या लष्करी सामर्थ्याची, कला, संस्कृतीची, विविधतेची आणि सरकारी योजनांच्या यशाची झलक पाहायला मिळाली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App