जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन म्हणाले आहेत की मणिपूरबद्दल गोंधळ पसरवला जात आहे, तेथील एनडीए सरकारला पाठिंबा कायम राहील, मणिपूर जेडीयूच्या अध्यक्षांना अनुशासनहीनतेच्या आरोपाखाली काढून टाकण्यात आले आहे.
1984 च्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्ट 31 जानेवारीला निकाल देणार आहे. हे प्रकरण काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांच्याशी संबंधित आहे. दंगलीत पिता-पुत्राची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
सूरतचे कथाकार प्रदीप मिश्रा यांनी लव्ह जिहादबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. अर्धवट घरे आणि खऱ्या व्यक्तीला ओळखा. चुकीच्या व्यक्तीच्या बंगल्याला पाहून भुललात तर फ्रिजमध्ये तुकडे मिळतील, त्यासाठी देखील तयार रहावे, असा सल्ला त्यांनी तरुणींना दिला आहे.
जीव वाचवण्यासाठी लोकांनी इमारतीच्या छतावरून उड्या मारल्या विशेष प्रतिनिधी Turkey तुर्कीमधील एका स्की रिसॉर्ट हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत किमान ६६ जणांचा मृत्यू झाला आणि ५० हून […]
कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला इंटर्नवरील बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालय आज पुन्हा सुनावणी करणार आहे. न्यायालयाच्या वेबसाइटनुसार, मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांचे खंडपीठ या खटल्याची सुनावणी करेल.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ‘एक राष्ट्र-एक विधान मंच’ ही संकल्पना मांडली आणि २०२५ पर्यंत सर्व राज्य सभागृहे एकाच व्यवस्थेखाली आणण्याबद्दल ते बोलले.
पटना येथे पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करताना, बिर्ला यांनी विश्वास व्यक्त केला की २०२५ मध्ये देशातील नागरिकांना अशा व्यासपीठावर प्रवेश मिळेल जिथे ते केवळ कीवर्ड, मेटा डेटा आणि सुधारित एआयद्वारे कोणत्याही विषयावरील संसदेच्या अहवालाचा केवळ शोध घेऊ शकणार नाहीत. तर संसदेच्या अहवालाचे निकाल , चर्चा अन् कायदेमंडळांमधील वादविवादही बघू शकतील.
अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत याचे लग्न पुढील महिन्यात ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. हे लग्न साध्या पद्धतीने होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या लग्नात कोणत्याही सेलिब्रिटीला आमंत्रित केले जाणार नाही.
देशात समान नगरी कायदा लागू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. भारतीय जनता पक्षाने आश्वासनही दिले आहे. पण, समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे भारतातलं पहिलं राज्य ठरलं आहे.
सीआयआयने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना नायडू यांनी हे विधान केलं. विशेष प्रतिनिधी हैदराबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर महाराष्ट्रात बांगलादेशींची घरोघरी जाऊन झडती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या अल्पसंख्याक आयोगाने असे म्हटले आहे. महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी सांगितले आहे की, अल्पसंख्याक आयोग महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये २५/२५ लोकांच्या समित्या स्थापन करत आहे. ही समिती पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने घरोघरी जाऊन बांगलादेशींचा शोध घेईल आणि त्यांना शिक्षा करेल
भाजपने संकल्प पत्राचा दुसरा भाग प्रसिद्ध केला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, ‘आप’च्या सर्व घोटाळ्यांची चौकशी केली जाईल. आम्ही जे बोलतो ते करतो. दिल्लीत प्रत्येक हमी पूर्ण केली जाईल अशी हमी मोदी देतात.
इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआरएन नारायण मूर्ती यांनी म्हटले आहे, की कोणालाही जास्त वेळ काम करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. पण, प्रत्येकाने स्वतः विचार केला पाहिजे आणि त्याची गरज समजून घेतली पाहिजे.
हरियाणा-पंजाबच्या शंभू सीमेवरील शेतकरी उद्या दिल्लीला जाणार नाहीत. सोमवारी किसान मजदूर मोर्चाचे (केएमएम) निमंत्रक सर्वनसिंग पंढेर यांनी शंभू सीमेवर पत्रकार परिषद घेतली आणि सांगितले की दिल्लीकडे जाणारा मोर्चा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे.
आयआयटी मद्रास (चेन्नई) चे संचालक प्रा. व्ही कामकोटी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ते गोमूत्रात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असल्याचा दावा करताना दिसत आहेत. हे IBS किंवा इरिटेबल बोवेल सिंड्रोमसह अनेक रोग बरे करू शकते.
प्रजासत्ताक दिनाची तयारी जोरात सुरू आहे. दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत परेड आयोजित केली जाते. यावेळी, २६ जानेवारीच्या परेडमध्ये सामरिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रलय आणि अँटी-गाइडेड क्षेपणास्त्र नाग हे दोन्ही दिसतील. दोन्ही स्वदेशी आहेत आणि फक्त भारतीय सैन्यासाठी बनवले गेले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मणिपूर, मेघालय आणि त्रिपुराच्या जनतेला त्यांच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशाच्या विकासात मणिपूर, मेघालय आणि त्रिपुराच्या जनतेच्या योगदानाचे कौतुक केले.
दिल्ली दंगलीतील आरोपी ताहिर हुसैनच्या जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले की, तुरुंगात असलेल्या सर्व लोकांना निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात यावी. हे प्रकरण सोमवारी न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते, परंतु सुनावणी होऊ शकली नाही
राज्यांमध्ये रस्ता सुरक्षा उपाय आणि मोटार वाहन कायदा (MV Act) च्या नियमांची अंमलबजावणी करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. न्यायालयाने 23 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांना इलेक्ट्रॉनिक देखरेख आणि रस्ता सुरक्षा उपायांशी संबंधित कायदेशीर तरतुदी आणि नियमांचे अनुपालन अहवाल दाखल करण्याचे निर्देश दिले
केरळच्या तिरुवनंतपुरमच्या जिल्हा न्यायालयाने सोमवारी एका 24 वर्षीय तरुणीला फाशीची शिक्षा सुनावली. ऑक्टोबर 2022 मध्ये तरुणीने आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष मिसळून प्रियकराची हत्या केली होती.
बदलापूरच्या शाळेत चिमुकलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर केला होता. या एन्काउंटर प्रकरणात 5 पोलिस जबाबदार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या संजय रॉयला सोमवारी १६४ दिवसांनंतर सियालदाह न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने म्हटले, ‘हा दुर्मिळातील दुर्मिळ खटला नाही.’ त्यामुळे मृत्युदंड देता येणार नाही.
मुंबईत बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी दिल्ली पोलिस आयुक्तांना राष्ट्रीय राजधानीत राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्या “घुसखोरांना” ओळखण्यासाठी “विशेष मोहीम” सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. राजभवनच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली.
ममता बॅनर्जी आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णलायतील बलात्कार व हत्या प्रकरणात सियालदाह न्यायालयाच्या निर्णयावर समाधानी नाहीत, असे त्या म्हणाल्या आहेत. त्यांनी म्हटले होते की आरोपीला मृत्युदंडाची मागणी केली होती, पण ती शिक्षा जन्मठेपेची झाली. आता, त्यांनी म्हटले आहे की त्या गुन्हेगाराला मृत्युदंडाची शिक्षा देण्यासाठी उच्च न्यायालयात अपील करतील
डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी त्यांना पदाची शपथ दिली. त्यांच्यासोबत जेडी वेंस यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली.
नवी दिल्ली मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार परवेश वर्मा यांनी आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध निवडणूक आयोग आणि दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. प्रवेश वर्मा यांनी नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवाल आणि आप कार्यकर्त्यांवर आदर्श आचारसंहिता (एमसीसी) भंग केल्याचा आरोप केला आहे
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App