जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ येथे घुसखोरीचा मोठा प्रयत्न भारतीय सैन्याने पूर्णपणे हाणून पाडला.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज म्हणजेच गुरुवारी छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी मोदी सरकारचा दुसरा पूर्ण अर्थसंकल्प मांडत असताना कर रचनेसंदर्भात अर्थतज्ज्ञ आणि बड्या कंपन्यांच्या बड्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये वैयक्तिक कर कमी करा
उत्तर प्रदेशातील सीतापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस खासदार राकेश राठोड यांना पोलिसांनी अटक केली आहे. राकेश राठोडवर बलात्काराचा आरोप आहे. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर, पोलिसांनी राकेश राठोड यांना लोहारबाग येथील त्यांच्या घरी पत्रकार परिषद घेत असताना अटक केली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी (३० जानेवारी २०२५) दिल्लीतील रोहिणी येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले,
आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार, सरकारने बुधवारी एमएसएमई क्षेत्रासाठी १०० कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी एक नवीन क्रेडिट हमी योजना सुरू केली. अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSME) सुरू करण्यात आलेल्या म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी स्कीम (MCGY-MSME) चा उद्देश उपकरणे खरेदी करण्यासाठी पात्र उद्योगांना १०० कोटी रुपयांपर्यंत कर्ज सुविधा प्रदान करणे आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी, पंजाब भवनाजवळील कोपर्निकस मार्गावर पंजाब नंबर प्लेट असलेली एक गाडी आढळून आली ज्यावर पंजाब सरकार लिहिलेले होते. वाहनाची झडती घेतली असता त्यातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, दारूच्या बाटल्या आणि आम आदमी पक्षाचे (आप) निवडणूक पत्रके जप्त करण्यात आली. भाजपने यासाठी आम आदमी पक्षाला जबाबदार धरले आहे.
दिल्लीच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचा पैसे वाटपाचा खेळ, तर आम्ही मजबुतीनेच निवडणूक लढवतोय असे सांगायची काँग्रेसवर वेळ!! हा आजच्या दिवसभरातले दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले.
प्रयागराजला जाणाऱ्या विमानांसाठी खूप जास्त भाडे आकारल्याच्या तक्रारी आल्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाने कारवाई केली. मंत्रालयाने विमान कंपन्यांना वाजवी तिकिटांचे दर राखण्यास स्पष्टपणे सांगितले आहे. प्रयागराजला जाणाऱ्या विमानांसाठी विमान कंपन्या प्रवाशांकडून जास्त भाडे आकारत असल्याच्या तक्रारी सतत येत होत्या.
बीड मधल्या संतोष देशमुख प्रकरणांमध्ये चोहोबाजूंनी अडचणीत आल्यानंतर धनंजय मुंडे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते.
महाकुंभातील मौनी अमावस्येच्या अमृत स्नानापूर्वी बुधवारी सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री योगी यांनी अपघाताची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय न्यायिक आयोगाचे आदेश दिले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री योगी यांनी प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर INDI आघाडीत महत्वपूर्ण घडामोडी घडली. आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांची मते फुटली. त्यामुळे पंजाब मधल्या चंडीगडची महापौर निवडणूक भाजपने जिंकली.
अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांना अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांना परत आणण्याचे काम दिले आहे. हे दोन्ही शास्त्रज्ञ गेल्या वर्षी जूनपासून अवकाशात अडकले होते.
भारत अमेरिकेतून आयात होणाऱ्या काही महागड्या वस्तूंवर शुल्क कमी करू शकतो. NDTV च्या रिपोर्टनुसार, निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करताना याची घोषणा करू शकतात. स्टील, महागड्या मोटारसायकल, इलेक्ट्रॉनिक वस्तू या यादीत आहेत, ज्यांचे दर कमी केले जाऊ शकतात.
मोदी सरकारचे संपूर्ण लक्ष देशाच्या सैन्याला बळकट करण्यावर आहे. सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने (CCS) बुधवारी राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.
चांगले प्रशासन, भ्रष्टाचार मुक्त कारभार वगैरे मुद्द्यांवर सुरू झालेली दिल्लीची निवडणूक अखेर यमुनेच्या पाण्यात बुडाली. किंबहुना ती सत्ताधाऱ्यांनीच बुडवली.
वक्फ बाबतची बैठक संपली आहे. वक्फ जेपीसीने १४ विरुद्ध ११ मतांनी विधेयक मंजूर केले. विरोधी पक्षाच्या सदस्यांना आज दुपारी ४ वाजेपर्यंत त्यांचे असहमतीपत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका सुरू आहे. दरम्यान, आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. या वर्षीच्या टी-२० क्रमवारीत अनेक बदल दिसून येत आहेत. विशेषतः टीम इंडियाचा स्टार फलंदाज तिलक वर्माने इतिहास रचला आहे. त्याने एका स्थानाची झेप घेतली आहे आणि आता तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याच्या प्रकरणात आजचा दिवस महत्त्वाचा आहे. या प्रकरणातील आरोपी शरीफुल शहजादला वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले आहे. जिथे न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आणि पोलिसांनी आरोपी शरीफुक इस्लामचा चेहरा ओळखण्यासाठी नमुना एफएसएलकडे पाठवला आहे.
अमेरिकेतील बायडेन प्रशासन गेल्यानंतर आणि ट्रम्प यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर बांगलादेशात अचानक काय घडू लागले आहे? … शेख हसीना पुन्हा बांगलादेशात परतू शकतील का? … मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार स्थापन होऊ शकेल का
महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते अशोक धोडी ९ दिवसांपासून अद्याप बेपत्ता आहेत. पालघर पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून अशोक धोडींचा शोध घेत आहेत, परंतु अद्याप त्यांच्याबद्दल कोणताही सुगावा लागलेला नाही.
श्रीलंकेच्या नौदलाने मंगळवारी सकाळी 13 भारतीय मच्छिमारांवर गोळीबार केला. यामध्ये 5 मच्छिमार जखमी झाले. हे सर्वजण डेल्फ्ट आयलंडजवळ मासेमारीसाठी गेले होते. ही बेटे श्रीलंकेच्या ताब्यात आहेत. या मच्छिमारांवर श्रीलंकेतील जाफना टीचिंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत सतत होणाऱ्या वक्तव्यांमुळे निवडणुकीचे वातावरण तापले आहे. दरम्यान, आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल त्यांच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले दिसत आहेत. खरंतर त्यांनी आरोप केला होता की हरियाणा सरकारने यमुनेचे पाणी विषारी बनवले आहे. यावर निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली आहे.
महाकुंभ दरम्यान संगम नाक्यावर प्रचंड गर्दीमुळे बुधवारी सकाळी चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले. मौनी अमावस्येमुळे, देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक आज महाकुंभातील अमृत स्नानासाठी प्रयागराजला पोहोचले आहेत. दरम्यान, रात्री १ ते २ वाजण्याच्या दरम्यान संगम नाक्यावर गर्दीचा दाब वाढला. त्यामुळे तिथे चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीत अनेक लोक जखमी झाले. अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असले तरी, अद्याप कोणीही अधिकृतपणे मृतांच्या संख्येला दुजोरा दिलेला नाही
महाकुंभमेळ्यात आज पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘महाकुंभमेळ्यात झालेल्या दुर्दैवी अपघाताने मला खूप दुःख झाले आहे. या अपघातात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. देव त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. प्रशासन जखमींना रुग्णालयात उपचार देत आहे. मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्कात आहे.A
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App