सरकारने एप्रिलपासून सुरू होणाऱ्या २०२५-२६ च्या रब्बी विपणन हंगामासाठी ३१ दशलक्ष टन गहू खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कृषी मंत्रालयाने २०२४-२५ या पीक वर्षात ११५ दशलक्ष टन गहू उत्पादनाचे विक्रमी लक्ष्य ठेवले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या व्हाईट हाऊस मधील ओव्हल ऑफिस मध्ये झालेल्या खडाजंगी नंतर युरोप मधले राष्ट्रप्रमुख “खुश” होऊन झेलेन्स्की यांना तोंडी पाठिंबा देऊन मोकळे झाले.
साधारणपणे तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये जावे लागते, पण जर तुम्हाला सांगितले गेले की आता तुम्ही घरी बसून तक्रार दाखल करू शकता, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे, आता जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी या दिशेने एक पाऊल उचलले आहे आणि पहिला ई-एफआयआर नोंदवला गेला आहे.
कर्नाटकच्या राजकारणात सध्या गोंधळ सुरू आहे. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यात सर्व काही ठीक नाही. या सगळ्यात भाजप नेत्याने एक मोठा दावा केला आहे.
लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढणार आहेत. लालूंसोबत त्यांचे कुटुंबही सीबीआयच्या कचाट्यात आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) मधील अनियमिततेशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी, मुलगा आणि इतरांवर खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे सीबीआयने शुक्रवारी दिल्लीच्या एका न्यायालयात सांगितले.
तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम सरकारचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी केंद्रातल्या मोदी सरकारच्या त्रिभाषीय शैक्षणिक धोरणाविरुद्ध तामिळनाडूमध्ये रान पेटवले असताना भाजपचे तिथले प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातला आहे.
जुना आखाड्याचे प्रमुख आणि आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज सिग्रा येथील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरमध्ये प्रवचन देण्यासाठी आले. ते म्हणाले – भारतातील जवळजवळ अर्धी लोकसंख्या कुंभमेळ्याला पोहोचली. सर्व जाती, धर्म आणि मतांचे लोक येथे एकत्र आले. जगाने आपली एकता पाहिली. जगाने आपल्या संस्कृतीची आणि सभ्यतेची झलक पाहिली. कुंभमेळ्यात भारताच्या अर्ध्या लोकसंख्येने जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. यावेळी साधू, संत आणि अनुयायांसह सुमारे 1500 लोक उपस्थित होते.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शुक्रवारी आरोग्यसेवेशी संबंधित महालेखापाल (कॅग) यांचा अहवाल विधानसभेत मांडला. पूर्वाश्रमीच्या आम आदमी पार्टी (आप) सरकारच्या कार्यकाळात रुग्णालयात गरजेची औषधी, सुविधांचा तुटवडा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता, उपकरणांचा तुटवडा आणि निधीचा वापर झाला नसल्याने दिल्लीच्या आरोग्यसेवेचा डोलारा कोसळण्याच्या मार्गावर आहे. मोहल्ला क्लिनिकमधील त्रुटीही निदर्शनास आल्या आहेत.
कर्मचारी भविष्य निधी संगठनने (ईपीएफओ) २०२४-२५ वित्त वर्षात कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दर जैसे थे ठेवले आहेत. अर्थात गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षीही देशातील ७ कोटी कर्मचाऱ्यांना ८.२५% व्याज दिले जाणार आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये ईपीएफओने व्याज दर ८.१५% वरून ८.२५% केला होता. यापूर्वी मार्च २०२२ मध्ये व्याजदरात कपात करून ८.५% वरून ८.१% करण्यात आला होता. गेल्या चार दशकातील हा सर्वात कमी व्याज दर होता.
त्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात बद्रीनाथपासून सुमारे ३ किमीवर माणा गावाजवळ शुक्रवारी सकाळी ६.५५ वाजता हिमस्खलन झाले. त्यामुळे बाॅर्डर रोड ऑर्गनायझेशनचे (बीआरओ) ५५ मजूर बर्फात अडकले. घटनेच्या वेळी ते कंटेनरमध्ये झोपलेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असलेल्या बचाव मोहिमेनंतर ३३ मजुरांना बाहेर काढण्यात यश मिळाले. परंतु उशिरा पुन्हा बर्फवृष्टीमुळे बचाव पथकाला मोहीम राबवणे कठीण झाले. काळोख झाल्याने शोधमोहीम जवळपास थांबवावी लागली. बहुतांश मजूर उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीरमधील असल्याचे सांगण्यात आले.
कुप्रसिद्ध टेकलगुडेम नक्षलवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या एका जोडप्यासह सात नक्षलवाद्यांनी शुक्रवारी आत्मसमर्पण केले. त्यांच्यावर एकूण ३२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. २०२१ मध्ये टेकलगुडम नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २२ सैनिक शहीद झाले होते.
प्रसिद्ध अभिनेत्री तथा भाजप खासदार कंगना रनौत व ख्यातनाम गीतकार जावेद अख्तर यांच्यात ५ वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन वादावर अखेर पडदा पडला. कंगनाने जावेद अख्तर यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही माहिती दिली. या दोघांनीही तडजोड करून मानहानीचा खटला मागे घेतला.
बांगलादेशातून भारतीय हद्दीत घुसखोरीच्या घटना सुरूच आहेत. आता सीमा सुरक्षा दलाने म्हणजेच बीएसएफने त्रिपुरामध्ये बांगलादेशातील १५ नागरिकांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका गुप्त माहितीच्या आधारे, बीएसएफने दोन वेगवेगळ्या कारवाईत सात मुलांसह १५ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. यासोबतच तीन भारतीय दलालांनाही अटक करण्यात आली आहे.
सर्वसाधारणपणे राजनैतिक संबंधांमध्ये घडत नाही अशी तुफान खडाजंगी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये झाली. त्यामुळे अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स देखील सामील झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पडसाद उमटले. जगभरातल्या राजनैतिक वर्तुळामध्ये तो खळबळजनक चर्चेचा विषय ठरला.
भारत आणि महाराष्ट्राप्रमाणेच बांगलादेशातही उदभवली नवी NCP!!… भारतात ज्याप्रमाणे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी राजकीय फारकत घेऊन शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी काँग्रेसचेच नेते आणि कार्यकर्ते फोडून 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्थात नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी NCP काढली होती
कर्नाटकात काँग्रेस नेत्यांमध्ये वाद सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते डीके शिवकुमार २६ फेब्रुवारी रोजी ईशा फाउंडेशनने आयोजित केलेल्या महाशिवरात्री कार्यक्रमात पोहोचले. या कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते.
सेवानिवृत्ती निधी संस्था ईपीएफओने २०२४-२५ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर गेल्या वर्षीप्रमाणेच ८.२५ टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला.
वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे अनेक निर्णयांवर परिणाम होत असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. प्रशासनावर परिणाम होतो, विकास थांबतो आणि पैसा वाया जातो. बऱ्याचदा मते मिळविण्यासाठीही निर्णय घ्यावे लागतात. भोपाळमधील एका खाजगी महाविद्यालयात आयोजित ‘एक देश-एक निवडणूक’ कार्यक्रमात शिवराज यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
हिंदी जबरदस्तीने लादल्यामुळे १०० वर्षांत २५ उत्तर भारतीय भाषा नष्ट झाल्याचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी गुरुवारी सांगितले. स्टॅलिन यांनी गुरुवारी एक्स वर पोस्ट केले की, एकाधिकारशाही हिंदी ओळख प्रस्थापित करण्याचा प्रयत्न प्राचीन भाषांना मारत आहे.
45 दिवस चाललेल्या महाकुंभाचा काल (26 फेब्रुवारी) समारोप झाला. मात्र, आजही मेळ्यात भाविकांची गर्दी आहे. लोक स्नानासाठी संगमला पोहोचत आहेत. मेळ्यात दुकानेही लावलेली आहेत.
दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आपच्या आमदारांना विधानसभेत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. यानंतर, विरोधी पक्षनेत्या आतिशी यांच्यासह आमदार विधानसभेच्या बाहेर ‘जय भीम’चे पोस्टर घेऊन निदर्शने करत आहेत. अतिशी म्हणाल्या- देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आमदारांना विधानसभेत जाण्यापासून रोखले जात आहे.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) दिल्ली विधानसभेत दुसरा कॅग अहवाल सादर केला. हा अहवाल आरोग्य क्षेत्राबद्दल आहे. यावर चर्चा करताना भाजप आमदार हरीश खुराणा म्हणाले की, जर आपण २४० पानांचा अहवाल पाहिला तर आर्थिक अनियमितता झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी म्हटले की, भाजप दक्षिणेकडील राज्यांना शांत करण्यासाठी सीमांकनाचा वापर शस्त्र म्हणून करत आहे. गृहमंत्री अमित शहा यांचे विधान विश्वासार्ह नाही. खरं तर, शहा यांनी बुधवारी सांगितले होते की, सीमांकनामुळे दक्षिणेकडील राज्यांमधून एकही संसदीय जागा कमी होणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन २७ फेब्रुवारी रोजी म्हणजे आज दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्या पंतप्रधान मोदींना भेटतील आणि भारत-ईयू व्यवसाय परिषदेत सहभागी होईल. या काळात मुक्त व्यापार करारावरही चर्चा होईल.
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ३५ वर्षीय नीलम शिंदे १४ फेब्रुवारी रोजी अमेरिकेत एका रस्ते अपघाताला बळी पडल्या. कॅलिफोर्नियामध्ये नीलम यांना एका कारने धडक दिली, त्यानंतर त्या कोमात गेल्या. सध्या त्या आयसीयूमध्ये दाखल आहे. या अपघातातील आरोपी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App