या वर्षी 1 जानेवारीपासून अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीत 1.03 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत एलन मस्कनंतर गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीत सर्वाधिक घट झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अदानी 5.8 लाख कोटी रुपयांच्या निव्वळ संपत्तीसह 23 व्या क्रमांकावर आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस इंडियावर थेट परकीय गुंतवणूक (FDI) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ₹3.44 कोटींचा दंड ठोठावला आहे. याव्यतिरिक्त, कंपनीच्या तीन संचालकांवरही कारवाई केली असून, त्यांच्यावर 1.14 कोटी रुपयांहून अधिक दंड ठोठावण्यात आला आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या बंगळुरूतील वाहतूक व्यवस्था सुधारण्याबाबत केलेल्या विधानावर भाजपने गंभीर टीका केली आहे. शिवकुमार यांनी २० फेब्रुवारी रोजी एका कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी म्हटले होते की, “आगामी २-३ वर्षांत देवही बंगळुरूच्या वाहतूक व्यवस्थेला सुधारू शकत नाही.” या विधानावर भाजपने त्यांची कडवट टीका केली आहे.
एकेकाळी मार्क्स, लेनिनवादाचा किल्ला मानली जाणारी देशातील आघाडीची शिक्षण संस्था जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आता हिंदू शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित उच्च शिक्षणाची दारे खुली करत आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एमएची पदवी संपादन करू शकतील. जेएनयूमध्ये एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व केंद्रित अध्ययनाला सुरुवात होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अहिल्यानगर : ‘आरोप झाल्यावर मंत्र्यांनी एक क्षणही पदावर राहणे योग्य नाही. हा त्यांचा दोष आहे. मंत्र्यांचे आचरण, विचार शुद्ध असायला हवेत. जीवन निष्कलंक हवे. अपमान सहन करण्याची शक्ती असेल तरच जनता तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तसे अनुकरण करील,’ असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी व्यक्त केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौहार्दाचे दर्शन घडवून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज सर्वांची मने जिंकली. वयोमानामुळे थकलेल्या शरद पवार यांना शरद पवार यांना खुर्चीवर बसण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत केली. पंतप्रधानांच्या या कृतीला दाद देत सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
बांगलादेशमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यापासून देशभरात भारतविरोधी वातावरण दिसून येत आहे. यास अंतरिम सरकारकडून पाठिंबा मिळत आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार सार्क संघटनेच्या बाजूने वातावरण निर्माण करण्यात व्यस्त आहे.
मराठी माणूस आपल्या विचाराने पुन्हा दिल्ली जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मराठी यांचा दृढ संबंध सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर पुरोगाम्यांना अप्रत्यक्ष टोला हाणला.
रणवीर अलाहाबादिया वादानंतर, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ओटीटी प्लॅटफॉर्मना आचारसंहिता पाळण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारने जारी केलेल्या अॅडव्हायझरीमध्ये, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर कंटेंट प्रकाशित करताना देशाच्या कायद्यांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर काही दिवसांनी मंत्रालयाकडून हा सल्ला देण्यात आला आहे.
जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइनचे संस्थापक जॅक डोर्सी आहेत. हा दावा डी-बँकेडचे मुख्य संपादक सीन मरे यांनी केला आहे. मरे यांच्या मते, बिटकॉइनची वाढ आणि ट्विटरचे संस्थापक डोर्सी यांच्याशी संबंधित सर्व घटनांमध्ये खूप साम्य आहे.
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी राहुल गांधींना सल्ला देताना म्हटले की, लष्कराला राजकारणात ओढू नये. राहुल गांधी म्हणाले होते की, लष्करप्रमुखांनी म्हटले आहे की चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केली आहे. तथापि, राहुल यांचे विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फेटाळून लावले. एएनआय या वृत्तसंस्थेच्या पॉडकास्टमध्ये राहुल गांधी यांच्या याच विधानावर लष्करप्रमुखांना प्रश्न विचारण्यात आला.
काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाच्या नियुक्तीत नवा प्रयोग केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कामाचा धडाका लावला त्यांच्यापासून स्फूर्ती घेत पुणे महापालिका निवडणुकीत काँग्रेसची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी आघाडी घेतली.
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तर मागितले आहे. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 मार्च रोजी निश्चित केली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी गुरुवारी सांगितले की, भाजपने नुकतीच राष्ट्रीय निवडणूक जिंकली आहे, महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्ली विधानसभा देखील जिंकली आहे, आता बिहार निवडणुकीची वेळ आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बिहार निवडणूक लढवू आणि जिंकू. नितीश कुमारांसारखा अनुभवी मुख्यमंत्री कोणाकडेही नाही.
रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर नवीन सरकारमधील मंत्र्यांना विभागांचेही वाटप झाले आहे. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मंत्र्यांना त्यांचे खाते वाटप करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने २०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठी ८ लाख, ८ हजार ७३६ कोटी ६ लाख रुपयांचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी राज्याच्या आर्थिक विकास आणि सामाजिक कल्याणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून अर्थसंकल्प मांडला.
आयएसआयच्या पथकाने बांगलादेशला भेट दिल्याचा दावा करणाऱ्या अलीकडील मीडिया रिपोर्टवर लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या पथकाने सिलिगुडीला लागून असलेल्या भागांना भेट दिली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला ३० दिवस उलटले आहेत. या काळात ट्रम्प यांनी हजारो बेकायदेशीर स्थलांतरितांवर कारवाई केली आहे आणि त्यांना लष्करी विमानाने हद्दपार केले आहे. तथापि, या प्रकरणात ट्रम्प यांचे दुहेरी निकष स्पष्ट आहेत.
रामलीला मैदानावर झालेल्या एका भव्य समारंभात रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दुपारी १२:०५ वाजता शपथविधी सोहळा सुरू झाला.
सोशल मीडियावरील अश्लीलता रोखण्यासाठी विद्यमान माहिती-तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या जागी डिजिटल इंडिया विधेयक लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. नव्या कायद्यात यूट्यूबर, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियाला नियमन करण्याच्या तरतुदींचा समावेश असेल.
रेखा गुप्ता आज (२० फेब्रुवारी) दिल्लीच्या नवव्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. शपथविधी सोहळा रामलीला मैदानावर होणार आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी रेखा गुप्ता यांची निवड करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा मीडियाला “सरप्राईज” दिले तर भाजप मधल्या अनेकांना ते “धक्कातंत्र” वाटले. मीडियाने रेसमध्ये ठेवलेल्या नावांपैकी मोदींनी सगळ्यात वरचा नव्हे, तर खालचा चॉईस निवडला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना म्हैसूर शहरी विकास प्राधिकरण (MUDA) जमीन घोटाळा प्रकरणात लोकायुक्तांकडून क्लीन चिट मिळाली आहे. सिद्धरामय्या आणि त्यांची पत्नी पार्वती यांच्यासह चार आरोपींविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे सापडले नसल्याचे लोकायुक्त पोलिसांनी सांगितले.
तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी यांनी मंगळवारी म्हटले की, हिंदी स्वीकारणारी राज्ये त्यांची मातृभाषा गमावतात. केंद्राने भाषायुद्ध सुरू करू नये. या विधानानंतर, केंद्राच्या त्रिभाषा धोरणाबाबत आणि हिंदी लादण्याबाबत राज्यातील सत्ताधारी द्रमुक आणि भाजपमधील वाद अधिक तीव्र झाला आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App