शनिवारी सकाळी तेलंगणातील नागरकुरनूल जिल्ह्यात एसएलबीसी (श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनाल) बोगदा प्रकल्पाचा एक भाग कोसळला. ज्यामध्ये 6 मजूर अडकले. बोगद्याच्या प्रवेशद्वाराच्या आत 14 किमी अंतरावर हा अपघात झाला.
देशभरातील आपल्या अनेक मोठ्या नेत्यांसह सतत जनाधार कमी होत चाललेल्या काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा अडचणी येऊ शकतात. यावेळी काँग्रेस हायकमांडला केरळमधून झटका बसण्याचे संकेत मिळाले आहेत. पक्षाचे खासदार शशी थरूर यांनी असे विधान केले आहे की, आता त्यांनी आरपारचा निर्णय घेतला आहे असे दिसते.
झोमॅटो आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या बेंचमार्क निर्देशांकात प्रवेश करणार आहेत. येत्या अर्धवार्षिक बदलांमध्ये निफ्टी-50 निर्देशांकात झोमॅटो आणि जिओ फायनान्शियलची ही एंट्री असेल.
ज्यावेळी बिल क्लिंटन आणि टोनी ब्लेअर यांनी 1990 च्या दशकामध्ये लिफ्ट लिबरल नेटवर्क तयार केले त्यावेळी त्यांना “मोठ्ठे मुत्सद्दी” म्हणून गौरवले गेले. पण डोनाल्ड ट्रम्प + मोदी आणि मी नुसते बोललो तरी लगेच लोकशाहीला धोका उत्पन्न असल्याचा डांगोरा पिटला जातो.
शुक्रवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) निव्वळ विक्रेते बनले. त्याच वेळी, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजेच DII निव्वळ खरेदीदार राहिले. तात्पुरत्या आकडेवारीनुसार, 21 फेब्रुवारी रोजी, एफआयआयनी 3,450 कोटी रुपयांचे शेअर्स विकले, तर डीआयआयनी 2,885 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(रविवार) देशवासीयांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. मन की बातचा हा ११९ वा भाग होता. हा २०२५ या वर्षामधील दुसरा भाग आहे. या आधी पंतप्रधान मोदींनी १९ जानेवारी रोजी देशवासीयांशी मन की बात मधून संवाद साधला होता.
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याच्या 42व्या दिवशी भाविकांची गर्दी प्रचंड वाढली असून, वाहतूक व्यवस्थेवर ताण आला आहे. जत्रेच्या बाहेरील भागात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, यमुना नदीवरील पुलाकडे जाणारा मार्ग तब्बल 7 तासांपासून जाम आहे.
ज्याचे मंत्री, त्याचे निर्णय ही भाजप महायुतीने पॉलिसी स्वीकारली, पण बदनामी मात्र फडणवीस सरकारची होत चालली. असे सध्या दिसून येत आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधान मोदींचे प्रधान सचिव-2 म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कॅबिनेट नियुक्ती समितीने शनिवारी ही नियुक्ती केली. समितीचे सचिव मनीष सक्सेना यांनी नियुक्तीबद्दल माहिती दिली.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना मोदी सरकारने मोठी जबाबदारी सोपवली आहे. शक्तिकांत दास यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सचिव-२ नियुक्त करण्यात आलं आहे. त्यांचा कार्यकाळ पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळासोबतच संपेल.
दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रयत्नाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्रासाठी 20 लाख नवीन घरे मंजूर केली होती.
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते बालेवाडी, पुणे येथे झालेल्या ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण व 10 लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण’ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी २ महिन्यांपूर्वी ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत २० लाख घरांच्या मंजुरीचे पत्र वितरण आणि १० लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याचे वितरण यासाठी १०० दिवसांचे लक्ष्य निश्चित केले होते. मात्र हे लक्ष्य महाराष्ट्राने केवळ ४५ दिवसांत पूर्ण केले. राज्याच्या ग्रामविकास विभागाने हा नवा विक्रम केला.
राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते मदन राठोड यांची पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाली आहे. विशेष म्हणजे या पदासाठी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर, मदन राठोड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, निवडणूक अधिकारी आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बागेश्वर धामला भेट देणार आहेत. बुंदेलखंड महोत्सवाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच २३ फेब्रुवारी रविवारी, पंतप्रधान मोदी बागेश्वर धाम इन्स्टिट्यूट रिसर्च सेंटर आणि कॅन्सर हॉस्पिटलची पायाभरणी करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बागेश्वर धाम भेटीची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, 20 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजताच्या सुमारास कोरमंगला परिसरातील एका हॉटेलमध्ये चार तरुणांनी ही लज्जास्पद घटना घडवली.
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या तक्रारीनंतर विमान कंपनी एअर इंडियाने माफी मागितली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी सोशल मीडियावर विमान कंपनीविरुद्ध नाराजी व्यक्त केली होती. शिवराजसिंह चौहान यांनी एअर इंडियावर विमान प्रवासादरम्यान तुटलेली सीट दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर विमान कंपनीला केंद्रीय मंत्र्यांची माफी मागावी लागली
अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच, सरकार बदलल्यानंतर, अमेरिकन सैन्यातील सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्याला बडतर्फ करण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २१ फेब्रुवारी रोजी लष्कराच्या सर्वोच्च लष्करी जनरलला पदावरून काढून टाकले. बडतर्फ केलेल्या अधिकाऱ्याचे नाव- जनरल चार्ल्स क्यू. ब्राउन ज्युनियर आहे. ते जॉइंट चीफ्स चेअरमॅन म्हणून काम करत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की संघामुळेच मी मराठी भाषा शिकलो आणि संस्कृतीशी जोडण्याची संधी मिळाली.
मराठी माध्यमांनी निर्माण केला न्यूनगंड; पंतप्रधान मोदींनी लावला त्याला सुरुंग!! असे काल दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात घडले. पण ते कुठल्याच मराठी माध्यमांच्या लक्षात आले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांनी याची घोषणा केली आहे. रामगुलाम यांनी हे दोन्ही देशांमधील जवळच्या द्विपक्षीय संबंधांचा पुरावा असल्याचे वर्णन केले.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी त्रिभाषा वादावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांना पत्र लिहिले. राज्यात होत असलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) विरोधात होणाऱ्या निदर्शनांवर त्यांनी टीका केली.
भारतातल्या मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासाठी USAID मधून 21 मिलियन डॉलर्स दिल्याच्या आरोपावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ठाम राहिले. त्यांनी त्या आरोपाचा तिसऱ्यांदा पुनरुच्चार केला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय निवडणुकीत अमेरिकन निधीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राजकीय वक्तृत्व सुरू झाले आहे. भाजपने आरोप केला की राहुल गांधी भारतविरोधी शक्तीचा भाग बनले आहेत आणि ते भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी आहेत.
केंद्र सरकारने अधिवक्ता अधिनियम १९६१ मध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यासाठी अधिवक्ता दुरुस्ती विधेयक २०२५ तयार केले आहे. या विधेयकाच्या मसुद्यावर सार्वजनिक चर्चा सुरू झाली असून, देशभरातील वकील याला विरोध करत आहेत. बार काउंसिल ऑफ इंडिया (बीसीआय) चे चेअरमन मनन मिश्रा यांनी केंद्र सरकारकडे हे विधेयक मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, हे विधेयक वकिलांच्या स्वातंत्र्यावर थेट आघात करेल.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App