नाशिक हा एकेकाळी मनसे आणि राज ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र या बालेकिल्ल्याला आता नाराजीने तडे गेले आहेत. दस्तुरखुद्द राज ठाकरे यांच्यावर स्थानिक पातळीवरील पक्षांतर्गत कलह पाहून दौरा आटोपता घेण्याची वेळ आली
मनोज जरांगे हे त्यांचा लढा लढत आहेत, त्यांच्या उपोषणाबद्दल माझ्या मनात सन्मान आहे. संविधानिक चौकटीत बसवून त्यांच्या, कोणाच्याही लढ्याला न्याय मिळावा हीच माझी भूमिका आहे. त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी आंदोलनाला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा जात असताना त्यांना रस्त्यावर एक जखमी दुचाकीस्वार दिसला. एकनाथ शिंदे यांनी ताबडतोब त्यांचा ताफा थांबवला
महायुती सरकारने मराठा समाजाला दिलेले १० टक्के आरक्षण रद्द करण्यासाठी महाविकास आघाडीचे काही लोक कोर्टात गेले, असा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
मस्साजोग प्रकरणात तथ्य असल्यास धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री राजीनामा द्यायला लावतील अशी अपेक्षा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबई कोस्टल रोडला वांद्रे-वरळी सी लिंकशी जोडणाऱ्या पुलाचे उद्घाटन केले आणि हा एक मैलाचा दगड असल्याचे म्हटले
विद्वत शिरोमणी महामहोपाध्याय श्रीमान पंडित देवदत्त पाटील यांना रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने अभिवादन मानपत्र समर्पित करण्यात आले.
दोनच निवडणुकीत पराभूत झाल्यावर काँग्रेस निराशेच्या गर्तेत का गेली??, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा अपमान झाल्यानंतरही काँग्रेस कार्यकर्ते म्हणावे तसे पेटून उठले नसल्याची खंत काँग्रेसचे नेते माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी व्यक्त केली
भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीला गरज नसताना देखील भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सत्तेच्या वळचणीला ओढून घेतले. परंतु असे असतानाही राष्ट्रवादीच्या नेत्यांची सत्तेची हाव संपत नाही.
जीबीएस सिंड्रोम या आजारात मोठे बिल होत आहे – पिंपरी चिंचवड शहरातील वायसीएम हॉस्पिटलमध्ये आणि पुणे शहरातील कमला नेहरू हॉस्पिटलला या रुग्णांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. सुबियांतो म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातून त्यांना खूप काही शिकायला मिळाले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवारांना कफ झाल्यामुळे बोलताना त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे पुढच्या 4 दिवसांमधले त्यांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केली होती बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी भारतरत्न किताबाची मागणी, पण प्रत्यक्षात मोदी सरकारने दिला बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पद्मभूषण सन्मान!!
एकादशीच्या पुण्यपावन पर्वानिमित्त आज महायुतीच्या फडणवीस सरकार मधले ज्येष्ठ मंत्री आणि नासिक येथील कुंभमेळ्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आज रामतीर्थ गोदावरी तीर्थक्षेत्र येथे येऊन रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या महाआरती कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊन प्रचंड बहुमतानिशी भाजप महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या महिना – दीड महिन्यात महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याच्या बातम्यांचे पेव फुटले. या बातम्यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीतून खतपाणी घातले गेले.
विधानसभा निवडणूकी नंतर आत्मपरीक्षणाची गरज आहे, असे म्हणत काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. एखाद्या व्यक्तीने राजीनामा दिल्यानंतर पक्षश्रेष्ठी त्याबाबत निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले.
अकोला आणि अमरावती जिल्हा हे बांग्लादेशींना बोगस नागरिकत्व प्रमाणपत्र मिळण्याचे केंद्र झाल्याचा आरोप भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी केलाय.
सामान्य नागरिकांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळणे आता अधिक सोपे झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता गरजुंचे मुंबईत मंत्रालयात हेलपाटे वाचणार आहेत.
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी आज आर्ट ऑफ लिविंग ब्लॉगर्स असोसिएशन, इस्कॉन यांच्या साहाय्याने रामतीर्थ येथे स्मिता गोदावरी स्वच्छता अभियान राबविले.
दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात १५ लाख ७५ हजार कोटी रुपयांच्या विक्रमी गुंतवणुकीचे ६१ सामंजस्य करार झाले. यातून १६ लाख रोजगार निर्मिती होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) “तब्बल” 10 आमदारांच्या बळावर शरद पवारांनी म्हणे “मोठ्ठा डाव” टाकलाय. पण काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे यांना तो डाव पटतचं नाय!!, अशी अवस्था झाल्याचे बोलले जात आहे.
भंडारा जिल्ह्यातील एका आयुध कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात सुमारे ५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातात इतर कर्मचारी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठा दावा केला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ईडी आणि सीबीआयच्या भीतीमुळे लोक भाजपच्या पाठीशी उभे राहिले आहेत. तुम्हाला दिसेल की महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळेल. हे फक्त शिवसेनेच्या शिंदे गटातूनच होईल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी कोल्हापुरातल्या पत्रकार परिषदेत अमित शाहांवर कोल्हापुरातले “संस्कार” नाहीत असे शरसंधान साधले, त्यानंतर अमित शहा यांनी मालेगावातून पवारांचे पॉलिटिकल मार्केटिंग एक्स्पोज केले!! दोन दिग्गज नेत्यांमधील ही जुगलबंदी आज रंगली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App