आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही देखील लाखोंच्या लोंढ्यासह मुंबईत दाखल होणार आणि आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे. तसेच ओबीसी प्रवर्गात अजून कोणत्याही जातीला आणू नका, असेही त्यांनी पत्रकार परिषदेतून म्हटले आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचं मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. आज आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. मात्र मराठा आंदोलन हाताबाहेर गेलंय. त्यामुळे मुंबई आज (2 सप्टेंबर) दुपारपर्यंत रिकामी करा असे महत्वपूर्ण आदेश हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत. ऐन गणेशोत्सवात मराठा आंदोलनामुळे मुंबईला छावणीचं स्वरुप आलंय. त्यामुळे आंदोलकांना दक्षिण मुंबईत सोडू नका असे निर्देश कोर्टानं दिलेत. तसंच आझाद मैदान सोडून सीएसएमटी,मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि दक्षिण मुंबईतील इतर भागातून आंदोलकांना बाहेर काढण्याचे निर्देश कोर्टानं दिलेत.
विशेष प्रतिनिधी मुंबई : Manoj Jarange : पत्रकारांनी समजून घ्यावे की हुल्लडबाज आंदोलक आहेत की, सरकार आहे. हे समजून घ्या. मीडियाने मुख्यमंत्र्याला बोलले पाहिजे, […]
मुंबईतले मराठा आरक्षण आंदोलन हाताबाहेर गेले. त्या आंदोलनात महिला पत्रकारांची छेड काढली. फक्त आझाद मैदानात 5000 लोकांना आंदोलन करायची परवानगी दिली असताना सगळ्या मुंबईला भेटीला धरले. न्यायमूर्तींच्याही गाड्या अडविल्या. आंदोलनामुळे मुंबईत अराजक निर्माण झाले. त्यामुळे मुंबई पुढच्या 24 तासांत खाली करा आंदोलन फक्त आझाद मैदानापुरते मर्यादित ठेवा, असे स्पष्ट आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर मनोज जरांगे यांच्या वकिलांकडून आंदोलनाची जबाबदारी झटकायला सुरुवात झाली.
मुंबई: High Court : आझाद मैदानात सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरुद्ध गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मनोज जरांगे […]
विशेष प्रतिनिधी सातारा : Uttam Jankar with Eknath Shinde :माळशिरसचे आमदार उत्तम जानकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाढती जवळीक सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा […]
मनोज जरांगे यांच्या आंदोलकांनी मुंबईत अराजक माजवले असून मुंबई हायकोर्टाला घेराव घालण्यापर्यंत आणि न्यायमूर्तींच्या गाड्या अडवून धरण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.
मराठा आरक्षणाच्या चर्चेत ऐतिहासिक पुराव्यांबाबत प्रश्न निर्माण होत असताना, ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी सांगितले की, मराठवाड्यातील सलग 40 वर्षांची ब्रिटिशकालीन जनगणना नोंदी उपलब्ध आहेत आणि त्या नोंदी कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरल्या गेल्या आहेत. मग अशा नोंदींकडे दुर्लक्ष का केले जाते, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
आमचा सुप्रिया सुळे यांना सवाल आहे त्या जरांगेंच्या स्टेजवर गेल्याच कशाला? त्यांच्या वडिलांनी देशात पहिल्यांदा ओबीसी समाजाला मंडल आयोग लागू करून आरक्षण दिले आणि त्याच आज जरांगेना पाठिंबा द्यायला स्टेजवर जातात? याला शरद पवारांचा पाठिंबा आहे का? असा सवाल ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. सुप्रिया सुळे यांनी आज मनोज जरांगे यांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली, यावरून शेंडगे यांनी टीका केली आहे.
विशेष प्रतिनिधी मुंबई : Supriya Sule राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानावर जात भेट घेतली. यावेळी […]
सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना खडसावले आहे. यावेळी बोलताना जरांगे यांनी म्हटले की सन्मान दिला नाही तर नेते आंदोलनस्थळी यायला घाबरतील. सन्मानाने येऊ द्या आणि सन्मानाने पाठवा, ही जबाबदारी तुमच्यावर आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. एकतर विजयी यात्रा नाहीतर माझी अंत्ययात्रा निघेल, असेही यावेळी जरांगे म्हणाले.
दक्षिण मुंबईसारख्या सुरक्षित व प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या भागातसुद्धा महिलांना दिवसाढवळ्या असुरक्षित वाटू शकते, याचे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. लोकप्रिय अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने स्वतःचा भीषण अनुभव इन्स्टाग्राम पोस्टमधून शेअर केला असून, मराठा आंदोलकांकडून गैरवर्तन झाल्याचा आरोप केला आहे.
आझाद मैदानात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मराठा आंदोलकांच्या आंदोलनावर मोठा वादंग उसळला आहे. आंदोलकांच्या वर्तणुकीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यामध्ये गोंधळ घालणे, रस्त्यावर थांबून वाहतूक कोंडी करणे असे प्रकार दिसले. परंतु आता महिला पत्रकारांशी केलेल्या असभ्य वर्तनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून १० टक्के कोटा द्यावा या मागणीने राज्यात पुन्हा एकदा सामाजिक गटांमध्ये तणाव निर्माण केला आहे
मुंबईतील मराठा आंदाेलनाला शह देत ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय पुण्यातील बैठकीत घेण्यात आला. वंशावळ समितीला मुदतवाढ जरांगे यांच्या दबावाखाली दिली गेली, अशी टीका करीत सरकार बेजबाबदार वागत आहे, असा संताप लक्ष्मण हाके यांच्यासह ओबीसी नेत्यांनी व्यक्त झाला.
ऐन गणेशोत्सवात मुंबईकरांना वेठीला धरणारे मराठा आरक्षण आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांना शरद पवार आज भेटायला येणार होते
विशेष प्रतिनिधी मुंबई : Jayakumar Gore on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले […]
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे हत्यार घेऊन मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानात पोहोचले असले आणि त्यांनी जाहीरपणे मराठा आरक्षणाचा एल्गार केला असला तरी जरांगे यांच्या आंदोलनाची वेगवेगळी वळणे आणि वळसे पाहता, तीन टार्गेट्स असल्याचे लक्षात येते. मराठा सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाच्या आवरणाखाली राजकीय आरक्षण साध्य करून घेणे, देवेंद्र फडणवीस नावाच्या ब्राह्मण मुख्यमंत्र्याला हटविणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रवृत्तीच्या हातात संपूर्ण महाराष्ट्र सोपविणे ही तीन टार्गेट्स आहेत. शरद पवारांच्या राजकीय भूमिका बदलांशी अनुकूल ठरणारी टार्गेट्स जरांगेंना त्यांनी दिली आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज विशेष मकोका न्यायाधीश व्यंकटेश पटवदकर यांच्या न्यायालयाने फेटाळला. वाल्मीक कराडवर गंभीर गुन्हा असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. यामुळे वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात गेला असून, त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.
विशेष प्रतिनिधी पुणे: Shashikant Shinde : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनामुळे सत्ताधारी आणि विरोधी […]
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी सरकारवरील दबाव वाढला आहे.
मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनावरून राज्यात राजकीय वातावरण तापलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. मराठा आरक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावर धोरणात्मक बदल करण्याची गरज आहे, असे शरद पवारांनी म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी, ‘ते पुजणीय,आदरणीय, वंदनीय’ असे म्हणत “मला जास्त बोलायला लावू नका,” असा टोला शरद पवारांना लगावला. यामुळे मराठा आरक्षणावरून काका-पुतणे भिडल्याचे पाहायला मिळाले.
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे आणि मुंबई पोलिसांमध्ये आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुंबई पोलिसांनी जरांगे यांना आंदोलनासाठी परवानगी दिली असली, तरी रोज नवीन अर्ज दाखल करण्याची अट घातली आहे. या अटीमुळे संतप्त झालेल्या जरांगे यांनी थेट पोलिसांना परवानगीसाठी अर्ज करताना काही कठोर प्रश्न विचारले आहेत.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र टीका केली आहे. त्यांनी मनोज जरांगेला कायद्यापेक्षा मोठे समजू नये, असे म्हटले आहे. जरांगेचे आंदोलन आटोपते घेऊन त्याला त्याच्या गावी धाडावे, असेही गुणरत्न सदावर्ते म्हणालेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे समितीला चर्चेसाठी पाठवून राज्याच्या राज्य सरकारसह राज्याच्या राजभवनाचा व दोन्ही कायदेमंडळांचा अपमान केल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शनिवारी केला. सरकारने आमच्याशी चर्चा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाला पाठवण्याची गरज होती. पण त्यांनी शिंदे समितीला पाठवले. हे साफ चूक आहे. असे करून फडणवीसांनी राज्याचा अपमान केला, असे ते म्हणाले. दरम्यान, न्या. संदीप शिंदे समितीने यावेळी मराठवाड्यातील मराठा समाज हा कुणबी असल्याचे तत्वतः मान्य केले. हा मराठा समाजासाठी एक मोठा दिलासा असल्याचा दावा केला जात आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App