राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या तक्रारीनंतर भुजबळांच्या मालकीच्या बेनामी संपत्तीची चौकशी पुन्हा सुरू करण्याचे आदेश विशेष सत्र न्यायालयाने दिले आहेत. यापूर्वी ही चौकशी तांत्रिक कारणामुळे थांबवण्यात आली होती, ती आता नव्याने सुरू होणार आहे.
राज्य शासनाने मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅझेटियरबाबत काढलेला अध्यादेश रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी सकल ओबीसी समााजाच्या वतीने बुधवारी कळमनुरीत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी मराठवाड्यातून ओबोसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण केले होते. त्यानंतर राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या 8 मागण्यांपैकी 6 मागण्या मान्य करत हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जीआर काढला. हा मराठा समाजासाठी मोठा विजय मानला जात आहे. तसेच राज्यात लवकरच सातारा गॅझेट देखील लागू होण्याची शक्यता आहे. आता मनोज जरांगे यांनी राजधानी दिल्लीत जाणार असल्याची घोषणा केली आहे.
शरद पवार + सुरेश कलमाडी भेटीने (न मिळालेल्या) पंतप्रधान पदाच्या चर्चेला उजाळा; दोन्ही नेत्यांमध्ये nostalgic चर्चा!!, ही राजकीय घडामोडी आज पुण्यात घडली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच खरे ब्रँड होते. त्यामुळे तुम्ही उगाचच दावा करू नका. केवळ नाव लावून ब्रँड तयार होत नसतो, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव व राज ठाकरेंना लगावला. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून, मुंबईत आयोजित केलेल्या ‘विजय संकल्प मेळाव्या’तून भाजपने मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
सोने आणि चांदीच्या किमती आज म्हणजेच १६ सप्टेंबर रोजी सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, २४ कॅरेट सोन्याचे १० ग्रॅम १,०२९ रुपयांनी वाढून १,१०,५४० रुपयांवर पोहोचले आहे.
विशेष प्रतिनिधी धाराशिव : Pratap Sarnaik : सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली कला केंद्रांमध्ये अवैध व्यवसाय आणि शेतकऱ्यांच्या मुलांची आर्थिक पिळवणूक होत असल्यास अशा केंद्रांचे परवाने तातडीने […]
विशेष प्रतिनिधी बीड : Beed railways : उद्या, 17 सप्टेंबर 2025, हा दिवस बीड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने बीड […]
विशेष प्रतिनिधी मुंबई: Chhagan Bhujbal : महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्याप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई […]
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे शेतकऱ्यांच्या अश्रूंवर राजकारण करत असल्याची तिखट टीका भाजपने केली आहे. शरद पवार आता शेतकऱ्यांच्या अश्रूंवर राजकारण करत आहेत. पण इतिहासात डोकावले, तर त्यांच्या सत्तेच्या काळात आत्महत्या केलेल्या अनेक शेतकऱ्यांचे आत्मे त्यांना प्रश्न विचारताना दिसतील, असे भाजपने म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी हैदराबाद गॅझेटमधील नोंदींच्या आधारावर बंजारा समाजाला एसटी अर्थात अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी केली आहे. इतर जातींना हैदराबाद गॅझेटमधील नोंदींनुसार न्याय मिळत असेल, तर आमच्या बंजारा समाजालाही एसटीचे आरक्षण देण्याचा राज्य सरकारला विचार करावा लागेल, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी वंजारा व बंजारा एकच असल्याचा दावाही केला. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. धनंजय मुंडे यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हणत हरिभाऊ राठोड यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
महाराष्ट्रात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला राज्य सरकारने मंजूरी दिल्यानंतर इतर समाजाने विरोध करत हैदराबाद गॅझेट प्रमाणे आम्हालाही या प्रवर्गात घेऊन आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट प्रमाणे आरक्षण दिले जाणार आहे, परंतु या गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख आदिवासी असा आहे, त्यामुळे आता बंजारा समाज देखील आक्रमक झाला आहे, आमचा समावेश हा आदिवासींमध्ये अर्थात एसटी प्रवर्गात करावा अशी मागणी या समाजाची आहे, तर दुसरीकडे आदिवासी समाजामधून मात्र या मागणीला जोरदार विरोध होत आहे.
विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांना लाभ देण्यासाठी आजच्या बैठकीत फडणवीस मंत्रिमंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
विशेष प्रतिनिधी ठाणे : Parashuram Economic Development Corporation : राज्य मंत्रिमंडळात आणखी एका मंत्रिपदाची भर पडली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हे वाढीव मंत्रिपद […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : Supreme Court : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मुहूर्त लागतच नाही, असे दिसत आहे. न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आता लवकरच निवडणुका होतील, […]
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील उपचारांची संख्या 1356 वरून 2399 पर्यंत वाढविण्यात येणार आहे.
महाराष्ट्राचा “नेपाळ” करणे पवारांसारख्या घराणेशाही चालाविणाऱ्या नेत्यांना परवडेल का??, असे विचारायची वेळ खुद्द शरद पवारांच्याच इशाऱ्यामुळे आली आहे.
मुद्दा ओल्या दुष्काळाचा आणि कर्जमाफीचा, पण शरद पवारांचा राष्ट्रवादी “स्वप्न” पाहते आहे, महाराष्ट्राचा “नेपाळ” करायचा!!, हे राजकीय सत्य आज खुद्द शरद पवारांच्या तोंडूनच बाहेर पडले.
विशेष प्रतिनिधी बीड : Ajit Pawar : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष लक्ष दिले आहे. […]
विशेष प्रतिनिधी नाशिक : Sharad Pawar : नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे […]
साहेब खडे तो सरकारसे बडे, एकाच दिवसात पवारांच्या घोषणेला हरताळ फासे!!, असं म्हणायचे वेळ नाशिक मधल्या असं म्हणायची वेळ नाशिक मधल्या आजच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी आक्रोश मोर्चामुळे आली.
विशेष प्रतिनिधी नाशिक : Kumbh Mela in Nashik : पुढील वर्षी नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. दर बारा वर्षांनी भरणाऱ्या या कुंभमेळ्याला […]
विशेष प्रतिनिधी जालना: Manoj Jarange : बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारे अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झाला आहे. […]
भारत–पाक सामन्याविरोधात आंदोलन करायचे असेल तर आधी आपल्या पक्षातील मिलिंद नार्वेकरांना क्रिकेट समितीतून पायउतार करा. राष्ट्रवाद दाखवायचा असेल तर सुरुवात घरापासून करा. पण उद्धव ठाकरेंमध्ये ती हिंमत नाही. ते स्वतःच्या लोकांवर बोट ठेवणार नाहीत आणि ढोंगी आंदोलन करणार आहेत, असे म्हणत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वाद सुरू आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर जारी केला. मात्र, याला ओबीसी संघटनांचा तीव्र विरोध आहे. यामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल, असा दावा ओबीसी संघटनांकडून करण्यात येत आहे. आता या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने एका जातीची समिती न करता, सर्वसमावेशक समिती तयार करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. “सरकार कोणत्याही एका जाती-धर्माचे नाही, ते सर्वांचे असायला हवे,” असेही शरद पवार म्हणालेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App