मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘राज्यस्तरीय बँकर्स समितीची 167वी बैठक’ संपन्न झाली.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत देशसेवेसाठी किंवा कुठल्या आंदोलनात सहभागी झाले होते, म्हणून तुरुंगात गेले नव्हते तर पत्राचाळ प्रकरणात गैरव्यवहार केला, म्हणून तुरुंगात गेले हाेते, असे हल्लाबाेल विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डाॅ. नीलम गाेऱ्हे यांनी राऊत यांच्यावर केला
ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे ‘नरेडको विदर्भ – चेंज ऑफ गार्ड कार्यक्रम’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की, पॉझिटिव्ह इंटरव्हेन्शन हा नरेडकोचा सर्वात महत्त्वाचा गुण आहे. नरेडको संस्था विकासक, सरकार आणि ग्राहक अशा सर्वांच्या हिताचे रक्षण करण्याकरिता सातत्याने काम करत आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘नरेडको विदर्भ – चेंज ऑफ गार्ड कार्यक्रम’ येथे पदग्रहण केलेल्या, जेन नेक्स्ट आणि वुमन्स विंग या सर्वांचे अभिनंदन केले.
दोन दिवसांपूर्वी परळी तालुक्यात मारहाण झालेल्या शिवराज दिवटे या तरुणाची अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात जाऊन माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी भेट घेत त्याच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच शिवराज व त्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.
“बाल वाङ्मयाच्या” प्रकाशनात शरद पवारांची राजकीय फटकेबाजी; PMLA कायदा रद्द करून भ्रष्टाचारी नेत्यांच्या बचावाची तयारी!!, असा प्रसंग काल मुंबईत घडला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे खोटारड्या लोकांतील हिरो आहेत. शिवसेनेतील उठावापसून आजपर्यंत ते एकही वाक्य खरे बोलले नाहीत, अशी टीका सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे इव्हिनिंग वॉक करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
भारतातील इसीस (ISIS) संलग्न दहशतवादी कारवायांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) मोठे यश मिळाले आहे.
अंदमानमधील ऐतिहासिक सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचा महाराष्ट्र शासनाचा ठाम निर्णय असल्याचे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी जाहीर केले आहे. सावरकरांच्या त्यागमय जीवनाचे स्मरण करून भावी पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या या स्मारकासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कारागृहात असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपमानास्पद भाषा वापरल्याचा गंभीर आरोप मत्स्य व बंदर विकास मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. “तुरुंगात राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना शिव्या दिल्या, त्यांची लायकी काढली आणि हे सगळं इतर कैद्यांच्या समोर बो
भर उन्हाळ्यात एकमेकांना दिलेले व्हॅलेंटाईनचे गुलाब सुकले, पण ठाकरे बंधूंचे ऐक्य चर्चेच्या गुऱ्हाळाच्या चरकातच अडकून पडले!!, अशी अवस्था उद्धव आणि राज ठाकरे यांच्या पक्षांच्या राजकीय ऐक्याची झाली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला. भारताने त्वरित ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला कडक प्रत्युत्तर दिले, मात्र हल्लेखोर दहशतवादी अजूनही फरार आहेत.
भटक्या विमुक्त समाजाच्या वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांकडे अखेर फडणवीस सरकारने सकारात्मक पावले उचलली आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या एका प्रकरणात वांद्रे कोर्टाने गुरुवारी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांना नोटीस बजावली आहे. यामुळे चव्हाण यांच्या अडचणींत भर पडण्याची शक्यता आहे.
बालकांच्या लैंगिक शोषणाच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यातील शाळांसाठी नवा निर्देश जारी केला आहे. या नियमावलीनुसार, शाळांमध्ये सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विलिनीकरणाची मराठी माध्यमांमध्ये जोरदार चर्चा आहे, कारण ती स्वतःच शरद पवारांनी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जालन्यामध्ये एक वेगळेच वक्तव्य करून त्याला राजकीय राजकीय फोडणी दिली.
आता मी तिघे एकत्रित आहोत. आम्ही तिघांनी सुसाट वेगाने आमची विकासाची एक्सप्रेस सुरू केलेली आहे. आता त्यामध्ये कोणीही स्पीडब्रेकर आणू शकत नाही. कोणाला बुस्टर द्यायचा असेल तर वेगळी गोष्ट आहे. मात्र स्पीड ब्रेकरला आता आमच्यात जागा नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. महामुंबई मेट्रो 9 चा चाचणी टप्पा आज पूर्ण झाला. या वेळी ते माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या दाेन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चेने वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरले, वृत्तवाहिन्यांवर चर्चा झाली. साेशल मीडियावर अनेकांनी ज्ञान पाजळले. मात्र, अशा प्रकारची काेणतीही चर्चा नव्याने झालीच नाही, असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेमध्ये तथ्य नसल्याचे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणावर सध्या तरी कोणतीही चर्चा झाली नसल्याचा खुलासा अजित पवार यांनी आमदारांच्या बैठकीत केला.
काका – पुतण्या एकत्र येणार. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या राष्ट्रवादीत विलीन होणार. महाराष्ट्राच्या राजकारणात “नवा भूकंप” होणार. राज्यात अजित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे अशी सत्तेची वाटणी होणार
मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. शरद पवार यांनी देखील याबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील, असे वक्तव्य केल्याने या चर्चेला अधिक जोर आला आहे.
भारतीय सेनेने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर यशस्वीपणे राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर या धाडसी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल भारतीय सेनेचे आभार मानण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईत आज भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानावर या रॅलीचा समारोप झाला.
भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला बाप दाखवण्याचे काम केल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी तिरंगा रॅलीत बोलताना व्यक्त केली. पाकविरोधातील कारवाईनंतर त्याचे राजकारण करणाऱ्यांना जनाची नव्हे तर मनाची लाज वाटली पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने दररोज सायंकाळी रामकुंड येथे संपन्न होणाऱ्या गोदावरी महाआरतीस आज विशेष प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले
भारतीय लष्कराच्या यशस्वी ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. या भाषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया दिली आहे. भारताची परराष्ट्र आणि संरक्षण विषयक भूमिका आता अधिक ठाम, निर्णायक आणि जागतिक स्तरावर प्रभावी झाली असल्याचे फडणवीस म्हणाले. ते आज नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ऑपरेशन सिंदूर आणि राज्याच्या अंतर्गत सुरक्षेबद्दल भाष्य केले. ते म्हणाले की, गेल्या दोन ते अडीच वर्षांत महाराष्ट्राला अशांत करण्याचे सतत प्रयत्न झाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार राज्य सरकारच्या वतीने कृत्रिम वाळू एम-सँड धोरणास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता बांधकामाला लागणारी वाळू उपलब्ध होण्यास सुविधा होईल. तसेच राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवालही राज्य सरकारच्या वतीने स्वीकारण्यात आला आहे. त्यासाठी 80 कोटींचा भार राज्य सरकार स्वीकारणार आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App