देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्याच्या मागील महाविकास आघाडी (MVA) सरकारने रचलेल्या कथित कटाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले.
भाजपला 2014 मध्ये 122 त्यानंतर 2019 मध्ये 105 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांना 132 जागा मिळाल्या हे समजू शकतो. मात्र अजित पवार यांना 42 जागा कशा मिळाल्या? यावर कोणाचा तरी विश्वास बसू शकतो का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला. स्वत:च्या घरात झालेल्या पराभवाचा शॉक त्यांना दीड महिन्यांनी बसला, असे म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांसारखे पहाटे 5 वाजल्यापासून कामाला लागले पाहिजे, असा सल्ला देखील अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना दिला.
विधानसभेतील दारुण पराभवानंतर गुरुवारी, 30 जानेवारी रोजी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. २०१९च्या लोकसभा निकालानंतर त्यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता. त्याची पुनरावृत्ती त्यांनी या संवादात केली. त्यांनी भाजपच्या वेळोवेळी बदललेल्या भूमिका तपशिलासह सांगितल्या
उद्धव ठाकरे आणि भाजप यांची परस्पर घडवली युती, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढली माध्यमांचीच पिसे!!, असे आज घडले.
सिद्धिविनायक मंदिराने भाविकांसाठी एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, ३० जानेवारीपासून मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केला जाईल. या नवीन व्यवस्थेनुसार, मंदिरात स्कर्ट, फाटलेले कपडे आणि उघडे कपडे घालून प्रवेश दिला जाणार नाही.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कालच धनंजय मुंडे + वाल्मीक कराड + संतोष देशमुख प्रकरणामध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना “नैतिकता” शिकवली. आज अजितदादांनी बीडमध्ये जाऊन कार्यकर्त्यांना चारित्र्य टिकवण्याची दमबाजी केली. पण खरंतर आधी पोसली राष्ट्रवादीतली खलप्रवृत्ती, नंतर केली चारित्र्य टिकवण्याची दमबाजी असेच या गोष्टीचे स्वरूप राहिले.
कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी गेल्या सहा वर्षांपासून अटकेत असलेल्या ६ आरोपींना उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. आरोपी सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित डेगवेकर, भारत कुराणे, अमित बड्डी आणि वासुदेव सूर्यवंशी बऱ्याच काळापासून अटकेत असल्याच्या कारणास्तव त्यांना जामीन मंजूर केला जात असल्याचे हायकोर्टाच्या एकलपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी म्हटले आहे.
सातत्याने हिंदुत्वावर आक्रमक भूमिका घेणारे नितेश राणे यांनी एकदा मुस्लिम विद्यार्थ्यांसंदर्भात राज्य सरकारकडे मागणी केली आहे. इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्यात यावी,
धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री असताना कोट्यवधी रुपयांची बोगस बिले उचलली, असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. परळी आणि अंबाजोगाई मतदारसंघात 1 रुपयाचेही काम न करता 73 कोटी 70 लाख रुपये उचलण्यात आले, असा दावा सुरेश धस यांनी केला. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
मराठा अरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिल आहे. या प्रकरणाची सुनावणी आता पुन्हा नव्याने सुरू होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुरुवातीपासून पुन्हा सुनावणी होणार आहे.
मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते. मात्र, आता त्यांनी हे उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाचा खरा मारेकरी कोण आहे हे आता समोर आले आहे, मराठा समाजाचे डोळे उघडले आहेत, असे म्हणत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील फरार आरोपी अनमोल बिश्नोईविरुद्ध बुधवारी मुंबईतील विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले.
महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून विनंती केली आहे, की बुरखा परिधान करणाऱ्या विद्यार्थिनींना दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा केंद्रांमध्ये प्रवेश देऊ नये.
Nitesh Rane’s letter to Education Minister should not be allowed to appear in exams wearing burqa; But Congress opposes Rane’s letter!!
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा शिगेला पोचला असताना काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पार्टी या तिन्ही पक्षांचे बडे नेते हिरीरीने मैदानात उतरलेत. पण त्या पलीकडे जाऊन दिल्ली दंगलीतले दोन आरोपी उमेदवार कोर्टाकडून जामीन मिळवून प्रचाराच्या मैदानात आल्याने आम आदमी पार्टीला राजकीय धोका उत्पन्न झाला आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीने संस्कार घडविलेल्या नेत्यालाच नैतिकता शिकवायची वेळ अखेर खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आली. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एका व्यक्तीमुळे 50 दिवस हेडलाईन मध्ये राहिली, याची तथाकथित खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
सुप्रिया सुळे यांच्या कार्यपद्धतीवर पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, दौंड आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांंनी थेट खासदार संजय राऊत यांच्याकडे तक्रार केली. राऊत यांच्या सूचनेवरून सुषमा अंधारे यांनी ही बाब जाहीर केली. त्यामुळे सुप्रियांनी सावध पवित्रा घेत नाराजांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.
आज नक्षलवादी विचार संपुष्टात येऊन बंदुका हातात घेणारे मुख्य प्रवाहात येत आहेत. परंतु, हा विचार शहर आणि महाविद्यालयांमध्ये कसा नेता येईल, संविधान आणि संस्थांच्या विरोधात बंड कसे करता येईल, असा प्रयत्न सुरू आहे,
सुप्रियाताई सुषमा आक्कांच्या “हक्काच्या” म्हणून ठाकरेंच्या शिवसैनिकांनी तलवारी म्यानच करायच्या!!, अशी अवस्था ठाकरेंच्या शिवसैनिकांवर पुणे जिल्ह्यात आली.
आज महाराष्ट्रात मंत्रिमंडळाची बैठक झाली ज्यामध्ये GBS वर अतिशय गांभीर्याने चर्चा करण्यात आली. या बैठकीबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, या प्रकरणी राज्य सरकारने एसओपी तयार केला आहे. जीबीएसची प्रकरणे फक्त पुणे आणि सोलापूरमध्ये नोंदवली गेली आहेत.GBS
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत महाराष्ट्रातील ठाणे येथील भिवंडी शहरातील एका महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित होते. तिरंगा फडकवल्यानंतर केलेल्या भाषणात ते म्हणाले- बंधुभाव हाच खरा धर्म आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनीही संविधान देताना आपल्या भाषणात हे स्पष्ट केले आहे.
महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्ष वेगवेगळे लढणार असल्याची चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता नवा फॉर्मुला मांडला आहे. मुंबईत स्वबळावर पण महाराष्ट्रात इतरत्र आघाडी करून महापालिका निवडणूक लढणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी उद्धव ठाकरे याना भक्कम साथ दिली. धाराशिव जिल्ह्यात या दोघांनी ठाकरे गटाची पताका उंच ठेवली. मात्र आता हे दोन वाघ पळविण्याचा घाट शिंदे गटाने घातला आहे.
नाशिक हा एकेकाळी मनसे आणि राज ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र या बालेकिल्ल्याला आता नाराजीने तडे गेले आहेत. दस्तुरखुद्द राज ठाकरे यांच्यावर स्थानिक पातळीवरील पक्षांतर्गत कलह पाहून दौरा आटोपता घेण्याची वेळ आली
मनोज जरांगे हे त्यांचा लढा लढत आहेत, त्यांच्या उपोषणाबद्दल माझ्या मनात सन्मान आहे. संविधानिक चौकटीत बसवून त्यांच्या, कोणाच्याही लढ्याला न्याय मिळावा हीच माझी भूमिका आहे. त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी आंदोलनाला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App