अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर संतोष देशमुख प्रकरणात आरोप झाले. त्या पाठोपाठ भ्रष्टाचाराच्या आरोपांनी देखील त्यांना घेरले, पण नेमके त्याच वेळी त्यांना bell’s palsy नावाच्या आजारानेही ग्रासले. धनंजय मुंडे असे सर्व बाजूने अडचणीत सापडले
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि फडणवीस सरकारमधील कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर खळबळ उडाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने ईमेलद्वारे त्यांची गाडी उडवून देण्याची धमकी दिली आहे. ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी कारवाई केली आणि तपास सुरू केला.Eknath Shinde
संतोष देशमुख प्रकरण ते भ्रष्टाचाराचा चिखल यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे अडकले असतानाच राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे यांना फसवणूक केल्याबद्दल दोन वर्षांची शिक्षा झाली. राष्ट्रवादीच्या या भ्रष्टाचाराचा भाजप महायुतीच्या फडणवीस सरकारला फटका बसला
औरंगजेबावर मात केलेल्या आग्रा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक झाले, तर आईशप्पथ सांगतो ताजमहाल पाहायला येणाऱ्या पर्यटकांपेक्षा आग्र्यातील शिवस्मारक पाहायला शिवप्रेमी गर्दी करतील, असा आत्मविश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पक्षातील अनेक नेते आणि पदाधिकारी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत आहेत. यातच उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी पक्षाला घरचा आहेर देत मातोश्रीवर ताबा मिळवला असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पक्षाच्या वतीने आता त्यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटातील घडामोडींकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या प्रमुख उपस्थितीत जय शिवाजी-जय भारत पदयात्रेचा शुभारंभ पुणे येथे झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत उपस्थितांना संबोधित केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट होणार, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले आरोप जोरकसपणे फेटाळले आहेत. अंजली दमानिया यांचे आरोप निव्वळ हास्यास्पद, मीडिया ट्रायल करणे व अर्धवट बुद्धीचे प्रदर्शन आहे, असे ते म्हणालेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पुण्यातील आंबेगाव येथे ‘शिवसृष्टी’च्या द्वितीय चरणाचे लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत संबोधित केले.
महाराष्ट्रातले महायुती सरकार हे शासक नाही तर शिवछत्रपतींचे मावळे आहेत. शिवछत्रपतींच्या सगळ्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकार कटीबद्ध आहे या किल्ल्यांवरची सगळी अतिक्रमणे आम्ही काढून टाकणार आहोत
ष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माजी शिंदे पुरस्कार देऊन सन्मान केला, पण याच शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना 2019 मध्ये मुख्यमंत्री होऊ दिले नाही
डान्सबारसंबधात नवीन कायदा करण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. मंगळवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत डान्स बार कायदा सुधारणासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. सुप्रीम कोर्टाने सुचवलेल्या सूचनांनुसार कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे.
आता रडायचे नाही तर लढायचे दिवस आहेत. आपण पुढील काळात राज्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर देणार असून काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवायचा आहे.
महाराष्ट्रातील भाजप सरकारने अलिकडेच लव्ह जिहाद आणि सक्तीचे धर्मांतर यासारख्या प्रकरणांविरुद्ध कायदे करण्यासाठी ७ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. महाराष्ट्राचे डीजीपी संजय वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
संतोष देशमुख प्रकरणावरून मंत्रिपदाचा राजीनामा मागत खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांना घेरले तर बेगड्या पवारांची बेगडी लेक असे म्हणून लक्ष्मण हाकेंनी बाण सोडले!!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
अखेर “पवार संस्कारित” भावा बहिणीचे नैतिकतेच्या मुद्द्यावर एकमत; अजितदादांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे म्हणाल्या धनंजय मुंडेंचा राजीनामा आवश्यक!!, असे आज मस्साजोग मध्ये घडले.
उद्योग विभागाचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी कामगारांची थकीत देणी देण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले गेले.
मराठी भाषा विभागाची आढावा बैठक सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता तिचा प्रचार आणि प्रसार व्यापक प्रमाणात व्हावा, यासाठी करायच्या उपाययोजयाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी आता महिलांना निकषांच्या चाळण्याच चाळण्या पार कराव्या लागणार आहेत. यामुळे योजनेत होणाऱ्या उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी आता निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकार योजनेसाठीच्या निकषांची कठोर अंमलबजावणी करणार आहे.
महाराष्ट्राच्या जनतेने ज्यांना जाणता राजा म्हणून डोक्यावर घेतले होते, त्यांनी कायमच दुष्काळी भागाला पाणी देणे खर्चाच्या दृष्टीने व्यवहार्य नसल्याचे म्हटले होते. पण नुसत्या तुताऱ्या फुंकून दुष्काळी भागाला पाणी देता येत नाही. त्यासाठी काम करावे लागते. ते काम देवेंद्र फडणवीस यांचे सरकार करत आहे, अशा तिखट शब्दांचा प्रहार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर केला.
USAID ते कुदळवाडी; सेम पॅटर्नची रडारडी!! हे शीर्षक वाचून कदाचित “कन्फ्युज्ड” झाल्यासारखे वाटेल. USAID अर्थात अमेरिकेची मदत आणि कुदळवाडी यांचा संबंध काय??, तो कशासाठी जोडलाय??, असे सवाल अनेकांना पडतील. अनेकांना हा संबंध बादरायणी देखील वाटेल. पण तो तसा नाही याचा खुलासा पुढे वाचल्याबरोबर होईल.
ठेकेदार विकासकामे न करता फक्त बिले सादर करून पैसे उचलत आहेत, असा धक्कादायक आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. सातव्या वेतन आयोगाचे लाभ घेता पण जबाबदारी घेत नाही याबद्दल शासकीय अधिकाऱ्यांचीही त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सीसीआयने बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा उत्पादित माल घरातच राहणार नाही, याची काळजी राज्य शासन घेईल. या परिसराचे चित्र बदलण्यासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर मोठ्या प्रमाणावर बदल करून महाराष्ट्रात हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्या पाठोपाठ केंद्रीय पातळीवर देखील मोठे फेरबदल केले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App