ष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माजी शिंदे पुरस्कार देऊन सन्मान केला, पण याच शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना 2019 मध्ये मुख्यमंत्री होऊ दिले नाही
डान्सबारसंबधात नवीन कायदा करण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. मंगळवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत डान्स बार कायदा सुधारणासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. सुप्रीम कोर्टाने सुचवलेल्या सूचनांनुसार कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे.
आता रडायचे नाही तर लढायचे दिवस आहेत. आपण पुढील काळात राज्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर देणार असून काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवायचा आहे.
महाराष्ट्रातील भाजप सरकारने अलिकडेच लव्ह जिहाद आणि सक्तीचे धर्मांतर यासारख्या प्रकरणांविरुद्ध कायदे करण्यासाठी ७ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. महाराष्ट्राचे डीजीपी संजय वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
संतोष देशमुख प्रकरणावरून मंत्रिपदाचा राजीनामा मागत खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांना घेरले तर बेगड्या पवारांची बेगडी लेक असे म्हणून लक्ष्मण हाकेंनी बाण सोडले!!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
अखेर “पवार संस्कारित” भावा बहिणीचे नैतिकतेच्या मुद्द्यावर एकमत; अजितदादांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे म्हणाल्या धनंजय मुंडेंचा राजीनामा आवश्यक!!, असे आज मस्साजोग मध्ये घडले.
उद्योग विभागाचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी कामगारांची थकीत देणी देण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले गेले.
मराठी भाषा विभागाची आढावा बैठक सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता तिचा प्रचार आणि प्रसार व्यापक प्रमाणात व्हावा, यासाठी करायच्या उपाययोजयाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी आता महिलांना निकषांच्या चाळण्याच चाळण्या पार कराव्या लागणार आहेत. यामुळे योजनेत होणाऱ्या उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी आता निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकार योजनेसाठीच्या निकषांची कठोर अंमलबजावणी करणार आहे.
महाराष्ट्राच्या जनतेने ज्यांना जाणता राजा म्हणून डोक्यावर घेतले होते, त्यांनी कायमच दुष्काळी भागाला पाणी देणे खर्चाच्या दृष्टीने व्यवहार्य नसल्याचे म्हटले होते. पण नुसत्या तुताऱ्या फुंकून दुष्काळी भागाला पाणी देता येत नाही. त्यासाठी काम करावे लागते. ते काम देवेंद्र फडणवीस यांचे सरकार करत आहे, अशा तिखट शब्दांचा प्रहार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर केला.
USAID ते कुदळवाडी; सेम पॅटर्नची रडारडी!! हे शीर्षक वाचून कदाचित “कन्फ्युज्ड” झाल्यासारखे वाटेल. USAID अर्थात अमेरिकेची मदत आणि कुदळवाडी यांचा संबंध काय??, तो कशासाठी जोडलाय??, असे सवाल अनेकांना पडतील. अनेकांना हा संबंध बादरायणी देखील वाटेल. पण तो तसा नाही याचा खुलासा पुढे वाचल्याबरोबर होईल.
ठेकेदार विकासकामे न करता फक्त बिले सादर करून पैसे उचलत आहेत, असा धक्कादायक आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. सातव्या वेतन आयोगाचे लाभ घेता पण जबाबदारी घेत नाही याबद्दल शासकीय अधिकाऱ्यांचीही त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सीसीआयने बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा उत्पादित माल घरातच राहणार नाही, याची काळजी राज्य शासन घेईल. या परिसराचे चित्र बदलण्यासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर मोठ्या प्रमाणावर बदल करून महाराष्ट्रात हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्या पाठोपाठ केंद्रीय पातळीवर देखील मोठे फेरबदल केले.
पोलीसांच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याच्या दृष्टीने देशातील सगळयात चांगला सायबर फ्लॅटफॉर्म राज्याने निर्माण केला आहे. केंद्र शासनाने १९४५ हा क्रमांक राज्याकरीता दिला असून तक्रारदाराला २४ तासाच्या आत कारवाई करुन अहवाल देण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जीबीएस हा आजार पाण्यामुळे झाल्याची चर्चा होती. मात्र, कोंबड्यांचे मांस खाऊन झाल्याचे पुढे येत आहे. पण लगेच आता तुम्ही कोंबड्या मारून जाळून टाकण्याची गरज नाही
भाजपचे आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरू असलेल्या राजकीय गदारोळात आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही उडी घेतली आहे. मला तेव्हाच लोकांनी समजावलं की तुम्ही धसांची बाजू घेऊ नका. ते कधीही पलटी मारतील, अशी टीका त्यांनी केली आहे.बीडच्या लोकांनी मला त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असं सांगितलं होतं, असेही राऊत म्हणाले.
राज्यात सुरेश देशमुख प्रकरण सुरू असताना भाजपचे आमदार सुरेश धस आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाली. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे बैठक झाली त्यावरून महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल झाला. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुरेश धस यांना मॅनेज होणार नसल्याचे सर्टिफिकेट दिले.
महायुती सरकारने मुलींसाठी मोफत शिक्षण योजना जाहीर केली. मात्र, त्याची शंभर टक्के अंमलबजावणी होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्याची दखल घेऊन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी शुक्रवारी पुण्यातील गरवारे कॉलेजला अचानक भेट देऊन मुलींना फीमाफी निर्णयाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. लवकरच राज्यातील १०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद महापालिका अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची एक कोअर कमिटी स्थापन केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट, मुंबई येथे दूरदृष्य प्रणालीद्वारे मृद व जलसंधारण अधिकारी गट-ब (अराजपत्रित) पदावर निवड झालेल्या राज्यभरातील 601 उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण केले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिताना संबोधित केले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद म्हणजे जणू ओसाड माळावरची जहागिरी असे आता त्याच पक्षाच्या नेत्यांना वाटू लागले आहे.
बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे खून प्रकरणी तपास करण्यासाठी विशेष पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे. एकूण ५ सदस्य असलेल्या या विशेष तपास पथकामध्ये १ पोलीस निरीक्षक आणि ४ पोलीस हवालदारांचा समावेश आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या पदासाठी काँग्रेसमधलीच चार बडी नावे समोर आली होती.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App