मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या अध्यक्षतेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्यातील प्रमुख खाणपट्टे सुरू होऊन राज्याला महसूल प्राप्त होणे यासाठी बैठक संपन्न झाली.
महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे ‘पॉवर हाऊस’सोबतच तंत्रज्ञान आणि करमणुकीचे हब असल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.
महाराष्ट्रात आता शासन सेवा अधिक सुलभ आणि लोकाभिमुख करण्यासाठी मेटा प्लॅटफॉर्मच्या मदतीने “आपले सरकार” पोर्टलवरील ५०० हून अधिक सेवा थेट व्हॉट्सअँपवर उपलब्ध होणार आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा विरोधी पक्षनेते पदावर दावा; पण राष्ट्रवादीची शॅडो कॅबिनेट नेमून पवारांनी काढली हवा!!, असे म्हणायची वेळ शरद पवारांनी साधलेल्या “पॉलिटिकल टाइमिंग” मुळे आली आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व दणका बसल्यानंतर शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस राजकीय दृष्ट्या कोमात गेली होती. आता ती कोमातून बाहेर आली असून शरद पवारांनी “शॅडो कॅबिनेट” नेमून पक्षाचा विस्तार करायचा निर्णय घेतला आहे.
बॉलीवूड मधले जिहादी नॅरेटिव्ह होत चालले उद्ध्वस्त म्हणून जॉन अब्राहमला झाले दुःख. त्याने बॉलीवूडचे सिनेमे आता धर्मनिरपेक्ष राहिले नसल्याचा काढला निष्कर्ष!!
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर एक धमकीचा संदेश पाठवण्यात आला आहे. धमकीची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मुंबई वाहतूक पोलिसांना एका पाकिस्तानी नंबरवरून व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला आहे. धमकी मिळताच पोलीस सतर्क झाले आहेत आणि तपास सुरू करण्यात आला आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्तात्रय गाडे याचे राष्ट्रवादी कनेक्शन आढळले, पण त्याविषयी चकार शब्द न उच्चारता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या एका वक्तव्याला “स्कॅनर” लावला.
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी मध्यरात्री त्याच्या शिरूर तालुक्यातल्या गुनाट गावात जाऊन अटक केली.
स्वारगेट येथे बसमध्ये तरुणीवर बलात्काराच्या प्रकरणात गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. ते म्हणाले की, तरुणीने आरडाओरड, विरोध केलाच नाही म्हणून आरोपीला गुन्हा करता आला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेची माहिती देणाऱ्याला १ लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे, तर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्व नव्या एसटी बसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची घोषणा केली.
मस्साजोग (ता.केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून हत्या झाली होती. या घटनेनंतर ८१ व्या दिवशी सीआयडी व एसआयटीने गुरुवारी १ हजार पानांचे दोषारोपपत्र बीडच्या विशेष मकोका न्यायालयात दाखल केले. यात आतापर्यंत ८ आरोपींना अटक झालेली असून कृष्णा आंधळे फरार आहे.
स्वारगेट बसस्टँड परिसरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली. शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून बेड्या ठोकण्यात आल्या. दत्तात्रय गाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे.
गोदावरी आरतीचे स्वरूप अधिक भव्य करून काशी, प्रयागराज, अयोध्या या तीर्थक्षेत्रांसारखे नाशिकचे ब्रँडिंग आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्याचा निर्धार रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र शासन आणि दक्षिण कोरियाच्या एच एस ह्युसंग ऍडव्हान्स्ड मटेरिअल्स कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नाक यांग सीआँग यांच्यामध्ये बुटीबोरी, नागपूर येथे ॲडव्हान्स्ड मटेरियल्स उत्पादनासंदर्भात १७४० कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेच्या गौरवार्थ कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ गुरुवारी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते.
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं गुरुवारी मुंबईत आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनस्वी शुभेच्छा दिल्या.
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेने विरोध केला नाही असे सांगत तिच्यावर संशय व्यक्त करणारे वक्तव्य गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी केल्याचा आरोप करत विरोधक त्यांच्यावर तुटून पडले आहेत.
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून .मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र शासन आणि दक्षिण कोरियाच्या एच एस ह्युसंग ऍडव्हान्स्ड मटेरिअल्स कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नाक यांग सीआँग यांच्यामध्ये बुटीबोरी, नागपूर येथे ॲडव्हान्स्ड मटेरियल्स उत्पादनासंदर्भात १७४० रुपये कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला. Nagpur
कुलाबा येथील डिफेन्स क्लबमध्ये झालेल्या ७८ कोटी रुपयांच्या आर्थिक अनियमिततेविरुद्ध भारतीय नौदलाने पोलिस तक्रार दाखल केली आहे. युनायटेड सर्व्हिसेस क्लब (यूएसआय) मध्ये झालेल्या घोटाळ्यात संरक्षण विभागाशी संबंधित एका महिलेचा सहभाग असल्याचे संकेत आहेत.
स्वारगेट पासून देवळ्यापर्यंत गुन्हेगारांचे कनेक्शन राष्ट्रवादीशी पण फडणवीस यांच्या गृहमंत्रालयाला आरोपीच्या पिंजऱ्यात ढकलण्याची घाई!! हे विचित्र चित्र महाराष्ट्रात दिसून आले.
: पुण्यातील स्वारगेट बस स्थानक उभ्या असलेल्या शिवशाही बस मध्ये तरुणीवर बलात्कार करून तिला धमकावलेला आरोपी दत्तात्रय गाडे याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कनेक्शन उघड्यावर आले. त्याचा फोटो माजी आमदाराच्या बॅनरवर आढळला आणि खुद्द दत्तात्रय च्या व्हाट्सअप डीपीवर विद्यमान आमदाराचा फोटो आढळला.
पुण्यात स्वारगेट बस स्थानकामध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वारगेट बस स्थानकामध्ये आंदोलन केले.
त्र्यंबकेश्वर येथे सन 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यांसाठी वेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा बैठकीत दिल्या. तसेच हा सिंहस्थ कुंभ ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा, यासाठीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
पुण्यातील स्वारगेट डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याच्या धक्कादायक घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) स्वतःहून दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांनी या प्रकरणी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना पत्र लिहून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App