अजित पवारांचा घातपात ते बारामतीत पवार विरुद्ध पवार; रोहित पवारांचा एक राजकीय प्रवास!!
अजित पवारांचा घातपात ते बारामती पवार विरुद्ध पवार; रोहित पवारांचा एक राजकीय प्रवास!!, असेच वर्णन करणारी राजकीय घडामोड आज बारामतीतून समोर आली.
अजित पवारांचा घातपात ते बारामती पवार विरुद्ध पवार; रोहित पवारांचा एक राजकीय प्रवास!!, असेच वर्णन करणारी राजकीय घडामोड आज बारामतीतून समोर आली.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा घडामोडींचा टप्पा गाठत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. 2006 साली झालेल्या स्फोट प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून, सत्र न्यायालयाने यांच्याविरोधात निश्चित केलेले आरोप रद्द केले आहेत. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेला खटला आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर आरोपींना दिलासा मिळाला असून, प्रकरणातील तपास आणि पुराव्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी तब्बल ₹2,56,137.01 कोटींच्या 18 विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे 1 लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या पूरक आरोपपत्रानंतर आता या प्रकरणाला नवा कलाटणी मिळाली आहे. न्यायालयाने या प्रकरणात रोहित पवार यांना मोठा दिलासा दिल्याची माहिती समोर आली असून, त्यांनी स्वतः समाजमाध्यमांवर पोस्ट करत न्यायालयावर पूर्ण विश्वास असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
मुंबईच्या वरळी येथे महायुतीच्या आक्रोश मोर्चामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत एका सामान्य महिलेने भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळाले. यावरून विरोधकांनी सरकारवर विशेषतः भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता काल घडलेल्या प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्या महिलेची भाषा योग्य नव्हती, त्या वाट्टेल ते बोलत असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे.
मराठा समाजाच्या प्रश्नांवर ठोस तोडगा काढण्यासाठी आणि समाजाच्या सुख-दुःखाकडे पूर्णवेळ लक्ष देण्यासाठी राज्यात स्वतंत्र ‘मराठा आणि कुणबी’ मंत्रालय स्थापन करावे, अशी आग्रही मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. धाराशिव येथे भीम जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही मागणी केली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण उपसमितीच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरात हिला मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. राहता सत्र न्यायालयाने कल्पना खरात हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. आज पार पडलेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंनी सुमारे सव्वा तास जोरदार युक्तिवाद झाला, मात्र सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला.
केंद्र सरकारच्या ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत आयोजित ‘साधना सप्ताह २०२६ मध्ये राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावत नवा मानदंड प्रस्थापित केला असून या अध्ययन सप्ताहात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील या उपक्रमात सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत, या सर्वांच्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये सातारा जिल्ह्यात आयटी पार्क साठी जमीन मंजूर केली. त्याचबरोबर महाराष्ट्राचे बायोगॅस धोरण जाहीर केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी महिला आरक्षण व मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्यावरून भाजपवर कडाडून हल्ला चढवला. देशात काही राज्य कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवत आहेत. डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचनेमुळे या राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व कमी झाले असते. सरसंघचालक मुले जन्माला घालण्याचा सल्ला देत आहेत. पण त्यांना पोसणार कोण? आज सगळे देशोधडीला लागलेत. देश तुम्हाला नुसता बेकारांचा कारखाना करायचाय का, असे उद्धव ठाकरे म्हणालेत.
सध्या राज्यात पश्चिम विक्षोभाची (वादळ) स्थिती आहे. त्यातच अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. परिणामी, राज्यात उन्हाळ्यातच पावसाळी वातावरण तयार झाले आहे. हवामान खात्याने आज मंगळवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यात मेघगर्जनेसह ताशी 30-40 किमी वेगाने सोसाट्याचा वारा, गारपीट व हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीतील उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रवाहिनी यांच्या प्राचारार्थ असलेल्या सांगता सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. तसेच अजितदादांना मतदानातून श्रद्धांजली द्या, असे आवाहनही सुळे यांनी केले आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. बारामतीच्या ऐतिहासिक शारदा प्रांगणात विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली. यावेळी आपल्या पतीच्या आठवणींनी सुनेत्रा पवार यांना अनेकदा गहिवरून आले. मी माझे सर्वस्व हरपले, पण मी थांबणार नाही, खचणार नाही, मागे हटणार नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच येसुबाई जशा लढल्या, अहिल्याबाई होळकरांनी जसा कारभार चालवला आणि आपल्या लोकांना न्याय दिला, त्याच निष्ठेने मी तुमची सेवा करेल, असे आश्वासन बारामतीच्या जनतेला दिले.
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने एक ऐतिहासिक आणि भावूक घडामोड समोर आली आहे. १९६७ मध्ये लढवलेल्या पहिल्या निवडणुकीपासून आतापर्यंत कधीही आपला मतदानाचा हक्क न चुकवणाऱ्या शरद पवार यांना यंदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे मतदानापासून दूर राहावे लागणार आहे. ही माहिती स्वतः शरद पवार यांनी सोशल मीडियाद्वारे दिली असून, त्यांनी बारामतीकरांना सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आज नागरी सेवा दिनानिमित्त राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान आणि स्पर्धा सन 2025-26’च्या विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली.
सुप्रिया सुळे यांच्या भाषणात भावनांचा महापूर; पण मुख्यमंत्री येण्यापूर्वीच बारामतीतल्या स्टेजवरून गेल्या निघून!!, ही राजकीय घटना आज बारामतीत घडली.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि त्यांचे नातू रोहित पवार यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुढची पायरी आज गाठली.
बारामती पोटनिवडणुकीत आजच्या प्रचार सांगता सभेत पवार कुटुंबीयांचे शक्तिप्रदर्शन होत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर शक्तिप्रदर्शनाला चालना दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यावरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यांच्या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत घेत जोरदार प्रत्युत्तर दिले. “२०२३ मध्ये हे बिल मंजूर झाले आणि आता आपण २०२६ मध्ये आहोत. अडीच-तीन वर्षे उलटूनही महिलांना अद्याप ३३ टक्के आरक्षण का मिळाले नाही?” असा रोखठोक सवाल त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
नाशिक लैंगिक शोषण प्रकरणातील एक संशयित असणाऱ्या निदा खानवर टीसीएसने अखेर निलंबनाची कठोर कारवाई केली आहे. कंपनीने गत 9 एप्रिल रोजीच तिच्यावर ही कारवाई केली. पण आज ही बाब समोर आली आहे. दरम्यान, आज निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी 27 तारखेपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या एमआयएम नगरसेविका सहर शेख यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, गेल्या काही दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असलेल्या सहर शेख यांनी अखेर समोर येत आपली बाजू मांडली आहे. मुंब्रा पोलिस ठाण्यात पोलिसांशी चर्चा केल्यानंतर “करारा जवाब मिलेगा” असा इशारा देणाऱ्या सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत, आमची सर्व कागदपत्रे कायदेशीर आणि खरी असल्याचा दावा केला असून विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे.
संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी, प्रभावी अंमलबजावणी आणि समन्वयाच्या माध्यमातून या आपत्तीचे सौम्यीकरण करण्यात यावे. यासाठी सर्व विभागांनी तत्काळ उपाययोजना राबवाव्यात. पाण्याचे सुयोग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना गती आणि जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवन यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यावरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विरोधकांनी संसदेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून देशातील 70 कोटी महिलांचा विश्वासघात केला. त्यांनी या विधेयकाची भ्रूणहत्या केली. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे ही हत्या केल्यानंतर आनंदोत्सव साजरा करून त्यांनी भारतातील समाजसुधारकांच्या विचारांवर एकप्रकारे तांडवच केले, असे ते म्हणाले.
राजधानी मुंबईत मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण नेहमीच तापलेले असते, अशातच ज्या रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी लिहिता किंवा वाचता येत नाही, त्यांचे परवाने रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. येत्या 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, मराठीच्या आग्रहासाठी घेतलेल्या या भूमिकेला आता विरोधही सुरू झाला आहे. रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला असून, आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही या वादात उडी घेतल्याने हा पेच अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक मधल्या TCS कंपनीतल्या कॉर्पोरेट जिहादचा तपास समाधानकारक रित्या सुरू आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तपास आणि तथ्य शोध पथक नेमले. त्यांच्या येत्या १० दिवसांमध्ये रिपोर्ट आल्यानंतर पुढची कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी आज मुंबईत दिली.