राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पवारांना लागतोय कुठला ना कुठला टेकू; म्हणून तर दिल्लीत दोन्ही डगरींवर पाय ठेवू!!
राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पवारांना लागतोय कुठला ना कुठला टेकू; म्हणून तर दिल्लीत दोन्ही डगरींवर पाय ठेवू!!, असला प्रकार समोर आलाय.
राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पवारांना लागतोय कुठला ना कुठला टेकू; म्हणून तर दिल्लीत दोन्ही डगरींवर पाय ठेवू!!, असला प्रकार समोर आलाय.
दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होतच नाही त्यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि भाजपचा खोडा आहे तो निघता निघत नाही, हे लक्षात आल्यावर शरद पवारांच्या गटाने वेगळाच “डाव” टाकला. रोहित पवारांच्या दिल्ली दौऱ्यात त्यांनी घेतलेल्या भेटीगाठींमधून तो समोर आला.
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. नाशिक आणि नगरच्या कांद्याला आता मॉरिशसची बाजारपेठ उपलब्ध झाली असून, सुमारे १ लाख टनांहून अधिक कांदा निर्यात होणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत दिली.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून “डबल गेम” समोर आली. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी काल एकाच वेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली, पण ही भेट कशासाठी होती??, याची कारणे मात्र दोघांनी वेगवेगळी दिली.
२०२२ ते २०२४ या तीन वर्षांत रस्ते अपघातांमुळे बृहन्मुंबई वीजपुरवठा आणि परिवहन उपक्रम बेस्ट आणि सेवा कंत्राटदार कंपन्यांच्या एकूण ५८ चालकांना बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली.
मे महिन्यापूर्वी विधान परिषदेतील ९ जागांसाठी निवडणूक होत आहे. विधानसभेतील आमदार त्यात मतदान करतील. काँग्रेस आणि शरद पवार गटही आपल्याला प्रत्येकी एक जागा मिळावी असा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महायुती आणि मविआचे संख्याबळ लक्षात घेता महायुतीचे ७, मविआचे २ जण निवडून येऊ शकतात. मात्र, यात उद्धव ठाकरेंना बिनविरोधपणे आमदार व्हायचे असेल तर त्यांना शिंदेसेनेचा पाठिंबा लागेल.
सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या खात्यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. त्यांनी यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार थकीत असलेला फरक लवकरच मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 40 % हिस्स्यानुसार 56.10 कोटी रुपये त्वरित महामंडळाला दिली जाणार आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. महापालिका हिस्स्याची थकीत रक्कम ‘पीएमपीएमएल’कडे वितरीत करण्यात येणार आहे. भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट वरून ही माहिती दिली.
मनसेचा आजचा वर्धापन दिन राज ठाकरे यांनी रायगडावर जाऊन साजरा केला. आजच्याच दिवशी त्यांच्या पक्षाला मराठवाड्यातल्या एका पंचायत समितीत सत्ता मिळाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे ‘महाराष्ट्राच्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा (ULB) ग्रीन म्युनिसिपल बाँड’ या नाशिक महानगरपालिकेच्या पब्लिक इश्यूचे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये घंटानादाद्वारे लिस्टिंग केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 20 वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळीच रायगडावर पोहोचलेत. ते तिथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही होत्या. हे कुटुंब सकाळी 8 च्या सुमारास रायगडाच्या पायथ्याशी पोहोचले. तेथून ते रोप वेच्या माध्यमातून गडावर पोहोचले. राज ठाकरे छत्रपतींचे दर्शन घेतल्यानंतर मनसेच्या सदस्य नोंदणीच्या कार्यक्रमाला सुरुवातही करणार आहेत. ही नोंदणी उद्यापासून राज्यभर सुरू होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्राचा हेवा वाटावा असा भूतकाळ पुन्हा वर्तमान व भविष्यात यावा, अशी कामना राज यांनी व्यक्त केली आहे.
अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी रोहित पवारांनी केलेल्या आरोपांची प्रफुल्ल पटेल यांनी साधी दखलही घेतली नाही.
ठाकरे आणि पवारांच्या मागे काँग्रेसची फरफट; 14 खासदार आणि 16 आमदार असूनही काँग्रेसला नाही किंमत!!,
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या शंकांना आता राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अजितदादांच्या अपघाताचे कोणीही गलिच्छ राजकारण करू नये, आपल्या राजकीय फायद्यासाठी चुकीचे विधाने करणे थांबवावे, अशा शब्दांत महाजन यांनी नाव न घेता रोहित पवारांवर निशाणा साधला.
येत्या जून महिन्यापासून मुलींना शाळेतच स्वसंरक्षणाचे धडे मिळणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केली. यावेळी त्यांनी कमवा व शिका योजनेतून विद्यार्थ्यांना दरमहा 2 हजार मानधन देण्याचीही घोषणा केली. त्यांच्या या घोषणेचा राज्यभरातील विद्यार्थ्यांना लाभ होण्याची शक्यता आहे.
इराण विरुद्ध इस्त्रायल – अमेरिका युद्धामुळे राज्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरकसपणे फेटाळून लावला आहे. राज्यात कुठेही इंधनाचा तुटवडा नाही. माध्यमांनी काही शहरांत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याचे वृत्त दिले. त्यामुळे पेट्रोल पंपांवर विनाकारण मोठ्या रांगा लागल्या. प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार भविष्यातील स्थितीचा सामना करण्यास सक्षम आहे, असे ते म्हणालेत.
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह तुतारीच्या अनावरणासाठी तब्बल 40 वर्षांनी रायगडावर गेले होते. मनसे प्रमुख राज ठाकरे उद्या 9 मार्च 2016 रोजी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त रायगडावर जाणार आहेत. राज ठाकरे यांनी स्वतःच सोशल मीडिया पोस्ट मधून हे जाहीर केले.
जोपर्यंत दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचे वारे वाहून तसे घडून येण्याची शक्यता होती, तोपर्यंत रोहित पवारांना प्रफुल्ल पटेलांमधला “स्वार्थ” दिसला नव्हता, पण विलीनीकरणाची शक्यता मावळल्या बरोबर रोहित पवारांना प्रफुल्ल पटेलांमधल्या “स्वार्थाचा साक्षात्कार” झाला!!
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचे पडसाद अद्याप उमटत असून, आमदार रोहित पवार यांनी आता या प्रकरणात माजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री प्रफुल पटेल यांना लक्ष्य केले आहे. “अजितदादांच्या अपघाताला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला आपण गेला होतात का?” असा थेट आणि खळबळजनक सवाल रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रफुल पटेलांना विचारला आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी महिलांची सुरक्षा, हक्क आणि आत्मनिर्भरता या विषयांवर मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
अमेरिका, इजराइल विरुद्ध इराण संघर्षामुळे जागतिक बाजारावर मोठा परिणाम झालाय. या परिस्थितीचा फटका भारतातील इंधन आणि गॅस पुरवठ्यावरही जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने भारतीय ग्राहकांना दिलासादायक अशी बातमी दिली असून पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता नसल्याचा निर्वाळा दिला.
ईडीने आज, म्हणजेच 6 मार्च रोजी, उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले. ही कारवाई मुंबई आणि हैदराबादमध्ये 10 ते 12 ठिकाणी एकाच वेळी करण्यात आली. मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांवरून ईडीच्या 15 पथकांनी हे छापे टाकले आहेत.
अमेरिका, इजराइल विरुद्ध इराण संघर्षामुळे जागतिक बाजारावर मोठा परिणाम झालाय. या परिस्थितीचा फटका भारतातील इंधन आणि गॅस पुरवठ्यावरही जाणवत आहे.वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅस पुरवठा साखळीवर दबाव निर्माण झाला आहे.
दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होत नाही, तर बात सोडा; सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी आतून पोखरा!!, हाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा फंडा असल्याची राजकीय वस्तुस्थिती आता समोर आलीय.