• Download App
    Nashik: Kalpana Kharat’s Anticipatory Bail Plea Rejected in Fraud Case भोंदू अशोक खरातच्या पत्नीच्या अडचणीत वाढ:; कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

    Kalpana Kharat : भोंदू अशोक खरातच्या पत्नीच्या अडचणीत वाढ:; कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

    Kalpana Kharat

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : Kalpana Kharat नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरात हिला मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. राहता सत्र न्यायालयाने कल्पना खरात हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. आज पार पडलेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंनी सुमारे सव्वा तास जोरदार युक्तिवाद झाला, मात्र सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला.Kalpana Kharat

    कल्पना खरातवर पती अशोक खरात याच्या कथित बेकायदेशीर कृत्यांमध्ये सक्रिय साथ दिल्याचा आरोप आहे. तपासात असे समोर आले आहे की, अनेक बँक व्यवहार आणि जमिनीच्या खरेदी-विक्रीत तिचा थेट सहभाग होता. शिर्डीतील एका शेतकऱ्याची जमीन खरेदी प्रकरणात मोठी फसवणूक केल्याचा गंभीर आरोप तिच्यावर आहे. या व्यवहारांतील पैसे कल्पनाच्या भावांच्या खात्यातून वळवण्यात आल्याचेही एसआयटी (SIT) तपासात उघड झाले आहे.Kalpana Kharat



    न्यायालयात काय झाला युक्तिवाद?

    कल्पना खरात ३१ मार्चपासून फरार असून, तिने वकिलामार्फत न्यायालयात आपली बाजू मांडली होती. आज तिच्या अटपूर्व जामिनावर राहता न्यायालयात सुनावाणी पार पडली. या सुनावणीदरम्यान कल्पना खरातचे वकील प्रशांत गिरी यांनी तिचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. प्रशांत गिरी यांनी असा युक्तिवाद केला की, कल्पना ही केवळ गृहिणी असून अशोक खरातच्या कथित गैरकृत्यांशी तिचा कोणताही थेट संबंध नाही. तिची सर्व बँक खाती अशोक खरातच हाताळत होते आणि व्यवहारांच्या कोणत्याही बैठकीत ती उपस्थित नव्हती, असा दावा करण्यात आला.

    मात्र, सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांनी हे सर्व मुद्दे खोडून काढले. आरोपी महिला जाणीवपूर्वक तपास यंत्रणेला सहकार्य करत नसल्याचा आणि ती देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता असल्याचा मुद्दा पोलिसांनी लावून धरला.

    पुढील कारवाई काय?

    कल्पना खरात देशाबाहेर पळून जाऊ नये, यासाठी पोलिसांनी यापूर्वीच तिच्याविरोधात ‘लूकआऊट नोटीस’ जारी केली आहे. तिचा जामीन अर्ज फेटाळल्या गेल्यामुळे आता पोलिस तिला कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी या प्रकरणात तिचा मुलगा हर्षवर्धन आणि तिच्या दोन भावांचीही कसून चौकशी केली आहे.

    अशोक खरातसोबत १९९३ मध्ये विवाह

    पोलिस तपासातून कल्पना खरातच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक बाबी समोर आल्या आहेत. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पाडळी येथील सुनीता शिंदे ही १९९३ मध्ये अशोक खरातशी विवाहबद्ध झाल्यानंतर ‘कल्पना खरात’ झाली. तिचे प्राथमिक शिक्षण पाडळीत, तर माध्यमिक शिक्षण ठाणगावमधील डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात झाले. दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार असलेल्या कल्पनाची सुरुवातीला केवळ पत्नी म्हणून असलेली तिची ओळख नंतर अशोक खरातच्या फसवणुकीच्या आणि बेनामी मालमत्तेच्या व्यवहारांमधील मुख्य भागीदारीत बदलली गेल्याचे निष्पन्न झाले आहे.

    Nashik: Kalpana Kharat’s Anticipatory Bail Plea Rejected in Fraud Case

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Girish Mahajan : गिरीश महाजनांची व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया; म्हणाले – सदर महिला नको त्या भाषेत बोलत होती, तिने पोलिसांशीही अरेरावी केली

    Manoj Jarange Patil : ‘मराठा-कुणबी’ स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा; मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा, मनोज जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    केंद्र सरकारच्या iGOT – ‘साधना सप्ताह 2026 मध्ये महाराष्ट्र अव्वल; साडेसहा लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा सहभाग