जर भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध सुरू झाले तर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना ते थांबवण्यासाठी वेळ मिळणार नाही, अशी भीती पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी व्यक्त केली
बांगलादेशचा नोबेल पुरस्कार विजेता अर्थतज्ञ हिंसक राज्यकर्ता मोहम्मद युनूस याने लंडनमध्ये बसून ब्रिटिश सरकार आणि भारत सरकार यांच्या विरोधात बडबड केली.
सिंगापूर कंटेनर जहाजाच्या अपघातानंतर तैवान सरकारने भारतीय नौदल आणि तटीय रक्षकांचे मदत केल्याबद्दल आभार मानले आहेत. भारतातील तैवानने सोशल मीडियावर लिहिले – भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने केलेल्या जलद बचाव कार्याबद्दल तैवान सरकार कृतज्ञ आहे. बेपत्ता क्रू सदस्यांच्या सुरक्षित परतीची आणि जखमींच्या जलद बरे होण्याची आम्ही अपेक्षा व्यक्त करतो.
सीरिया सरकारने मंगळवारी पुरुष आणि महिलांसाठी एक नवीन ड्रेस कोड लागू केला. या अंतर्गत, महिलांना आता समुद्रकिनाऱ्यावर पूर्ण कपडे घालणे बंधनकारक असेल.
जागतिक दहशतवादाशी लढायची अमेरिकेची तोंडी भाषा; प्रत्यक्षात जिहादी जनरलला army day मध्ये पायघड्या!! असला प्रकार अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने केलाय.
बांगलादेशमध्ये राजकीय गोंधळ सुरू आहे. अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याबद्दल मोठा दावा केला, त्यांनी सांगितले की ते या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलले होते. यासोबतच त्यांनी असेही म्हटले की शेख हसीना यांनी भारतात राहून केलेल्या विधानांमुळे बांगलादेशात असंतोष पसरला.
टेस्लाचे प्रमुख एलोन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी मागितली आहे. बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट करून मस्क यांनी आपली चूक मान्य केली.
इस्रायलने स्वीडिश पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्गला त्यांच्या ताब्यातून स्वीडनला परत पाठवले आहे. ग्रेटाला फ्रान्सला जाण्यासाठी विमानाने पाठवण्यात आले आहे, जिथून हद्दपार केले जाईल.
सोमवार, ९ जून रोजी पाकिस्तानमध्ये आर्थिक सर्वेक्षण २०२४-२५ प्रसिद्ध करण्यात आले. ते अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब यांनी सादर केले. सर्वेक्षणानुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत पाकिस्तानचे कर्ज ७६००० अब्ज पाकिस्तानी रुपयांपर्यंत वाढले.
मंगळवारी सकाळी ऑस्ट्रियातील ग्राझ शहरातील एका हायस्कूलमध्ये गोळीबाराची घटना घडली. यामध्ये किमान ११ जणांचा मृत्यू झाला आणि २८ जण जखमी झाले. त्यापैकी किमान चार जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. काही जणांच्या डोक्यातही गोळ्या लागल्या आहेत.
इस्रायली सरकारवर असे गंभीर आरोप आहेत की त्यांनी गाझामध्ये हमासशी लढण्यासाठी पॅलेस्टिनी मिलिशियाला शस्त्रे पुरवली आहेत. गेल्या २ दशकांपासून हमासने गाझा ताब्यात घेतला आहे. सर्व प्रयत्न करूनही, इस्रायलला हमास पूर्णपणे संपवता आले नाही.
ऑस्ट्रियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर ग्राझमधील एका शाळेत गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे. ऑस्ट्रिया प्रेस एजन्सी एपीएच्या वृत्तानुसार, ग्राझ शहराच्या महापौरांनी सांगितले की या गोळीबारात ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
येथील नेवार्क विमानतळावर एका भारतीय विद्यार्थ्याला अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केले, हातकड्या घालून जमिनीवर पाडले आणि नंतर अमेरिकेतून हद्दपार केले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. हा व्हिडिओ प्रथम एका साक्षीदार आणि भारतीय-अमेरिकन उद्योजक कुणाल जैन यांनी रेकॉर्ड केला होता. यामध्ये अमेरिकन अधिकारी विद्यार्थ्याशी गुन्हेगारासारखे वागताना दिसत आहेत.
विवारी, कॅनडामध्ये खलिस्तानी समर्थकांनी पत्रकार मोचा बेझिरगनवर हल्ला केला. मोचा यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, हल्लेखोरांपैकी एक माणूस गेल्या एक वर्षापासून त्यांचा पाठलाग करत होता आणि त्यांच्या ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवून होता.
इस्रायलने स्वीडिश पर्यावरण कार्यकर्त्या आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या ग्रेटा थनबर्ग आणि त्यांच्या जहाजाला ताब्यात घेतले आहे. सोमवारी पहाटे ५ इस्रायली स्पीड बोटींनी जहाजाला वेढा घातला. त्यानंतर, सैनिक जहाजावर चढले आणि ताब्यात घेतले.
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पकडलेल्या ज्योती मल्होत्रासोबत पॉडकास्ट करणारा पाकिस्तानचा आयएसआय एजंट नासिर ढिल्लनचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तो कबूल करत आहे की ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतात बसलेल्या सूत्रांनी त्याला अनेक महत्त्वाची माहिती पाठवली होती.
अमेरिकेत १२ देशांच्या नागरिकांच्या प्रवेशावरील बंदी आजपासून लागू होईल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ जून रोजी याबाबतचा आदेश जारी केला होता, जो आज, ९ जूनपासून लागू होईल.
अमेरिकन काँग्रेस सदस्य ब्रॅड शेरमन यांनी बिलावल भुट्टो यांना जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे पूर्णपणे उच्चाटन करण्यास सांगितले आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानमधील धार्मिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावेत.
कोलंबियामध्ये राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी बोगोटा येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना एका व्यक्तीने त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. गोळी लागताच ते जमिनीवर कोसळे, त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ट्रम्प प्रशासनाने या हल्ल्याचा निषेध केला आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादानंतर, मस्क यांनी ५ जून रोजी सोशल मीडिया X वर एक पोल शेअर केला. या पोलमध्ये मस्क यांनी अमेरिकेत नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याबाबत मत मागितले होते. यावर ८०.४% लोकांनी हो असे उत्तर दिले होते.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी धमकी दिली आहे की त्यांचा देश जलयुद्धात भारताला पराभूत करेल. शनिवारी माध्यमांशी बोलताना आसिफ म्हणाले – चिनाब नदीतील पाण्याचा प्रवाह सामान्यपेक्षा खूपच कमी आहे, भारत जाणूनबुजून त्यावर नियंत्रण ठेवत आहे.
दक्षिण अमेरिकन देश कोलंबियामध्ये, राष्ट्रपती पदाचे उमेदवार मिगुएल उरीबे यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान गोळीबार करण्यात आला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. ही घटना स्थानिक वेळेनुसार शनिवारी संध्याकाळी घडली.
शुक्रवारी लॉस एंजेलिसमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्धच्या कारवाईदरम्यान झालेल्या गोंधळानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने शनिवारी लॉस एंजेलिसमध्ये २००० नॅशनल गार्ड सैनिक तैनात करण्याची घोषणा केली.
पाकिस्तानी शिष्टमंडळाने अमेरिकेत जाऊन पाकिस्तानी दंडात काढल्या बेटकुळ्या, पण सिंधूच्या पाण्यासाठी चार चार वेळा काढताहेत भारताच्या नाकदुऱ्या!!, अशी पाकिस्तानची अवस्था झालीय.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कर कपात आणि खर्च विधेयकावरून त्यांचे माजी सहकारी व प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क यांच्याशी झालेल्या वादात मागे हटण्यास तयार नाहीत. त्यांनी सांगितले की त्यांना त्यांचे संबंध सुधारण्याची कोणतीही इच्छा नाही. एवढंच नाहीतर येत्या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅट्सना मदत करण्याचा प्रयत्न केल्यास मस्क यांना गंभीर परिणाम भोगावे लागू शकते, असा सूचक इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App