अमेरिकन सिनेटने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लोकप्रिय बिग ब्युटीफुल विधेयकाला चर्चेसाठी मंजुरी दिली आहे. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या मतदानात, सिनेटने ५१-४९ मतांच्या फरकाने प्रक्रियात्मक ठराव मंजूर केला, ज्यामुळे सभागृहाला विधेयकावर चर्चा सुरू करण्याची परवानगी मिळाली.
रविवारी रात्री रशियाने युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला केला. रशियाने ४७७ ड्रोन आणि ६० क्षेपणास्त्रे डागली. रशियाने एम/केएन-२३ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला केला.
न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या डेमोक्रॅटिक प्रायमरीमध्ये भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांच्या ऐतिहासिक विजयानंतर, अमेरिकेत इस्लामोफोबिया आणि स्थलांतरितांविरोधी राजकारण पुन्हा एकदा तीव्र झाले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले की त्यांनी कॅनडासोबतची व्यापार चर्चा तात्काळ संपवली आहे. त्यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट केले की ते लवकरच कॅनडावर नवीन शुल्क जाहीर करतील.
इस्रायलशी १२ दिवसांच्या युद्धात मारल्या गेलेल्या ६० इराणी अधिकाऱ्यांचे अंत्यसंस्कार शनिवारी होणार आहेत. यामध्ये ३० लष्करी कमांडर आणि ११ अणुशास्त्रज्ञांचा समावेश आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी तेहरानमध्ये हजारो लोक जमले आहेत.
अमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक जेफ बेझोस (६१) यांनी त्यांची मंगेतर माजी पत्रकार लॉरेन सांचेझ (५५) हिच्याशी इटलीतील व्हेनिस येथे लग्न केले. शुक्रवारी रात्री उशिरा सॅन जॉर्जिओ माजोरे बेटावर हा विवाहसोहळा पार पडला.
अमेरिकेने कॅनडासोबतच्या व्यापारी वाटाघाटी रद्द केल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. कॅनडाने अमेरिकेच्या प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांवर कर लादल्याच्या निषेधार्थ आम्ही कॅनडासोबतच्या व्यापारी वाटाघाटी रद्द करत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. ट्रम्प म्हणाले की, एका आठवड्यात कॅनडाला त्यांच्या नवीन शुल्क दरांबद्दल माहिती मिळेल.
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या बाजूने एक महत्त्वाचा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश ट्रम्प यांच्या जन्म-आधारित नागरिकत्वाच्या आदेशावर देशभरात बंदी घालू शकत नाहीत.
भ्रष्टाचारविरोधी कार्यक्रमाचा भाग म्हणून चीनने शुक्रवारी तीन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना काढून टाकले. यामध्ये जनरल मियाओ हुआ, नौदल प्रमुख व्हाइस अॅडमिरल ली हंजुन आणि चायना नॅशनल न्यूक्लियर कॉर्पोरेशनचे उपप्रमुख अभियंता लिऊ शिपेंग यांचा समावेश आहे.
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी गुरुवारी सांगितले की, इस्रायल इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना संपवू इच्छित आहे. चॅनल १३ ला दिलेल्या मुलाखतीत काट्झ म्हणाले, “जर खामेनी आमच्या टप्प्यात असते तर आम्ही त्यांना मारले असते.”
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक मोठा खुलासा केला आहे. ख्वाजा आसिफ यांनी कबूल केले आहे की भारताबरोबरच्या युद्धादरम्यान पाकिस्तानला चीनकडून मदत मिळत होती. ख्वाजा म्हणाले की बीजिंग भारताबद्दलची माहिती इस्लामाबादला शेअर करते. युद्धादरम्यानही चीनने भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेशी संबंधित माहिती पाकिस्तानला शेअर केली.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी पुन्हा एकदा सांगितले की इराणने इस्रायलविरुद्धचे युद्ध जिंकले आहे. त्यांनी एक्स वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘खोटे बोलणाऱ्या इस्रायली सरकारवर विजय मिळवल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. इराणने आपल्या हल्ल्यांनी इस्रायलचा नाश केला आहे आणि तो चिरडला आहे.’
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग पुढील आठवड्यात ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाहीत. राष्ट्रपतींच्या व्यस्त वेळापत्रकाचा हवाला देत चीनने ब्राझीलला याची माहिती दिली आहे, असे वृत्त साउथ चायना मॉर्निंग पोस्ट (SCMP) ने दिले आहे.
इराण आणि इस्रायलमधील लष्करी संघर्षादरम्यान सुरू झालेले स्थलांतर थांबवण्यात येत असल्याचे मंगळवारी इराणमधील भारतीय दूतावासाने सांगितले, कारण दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाली आहे. स्थलांतरासाठी नवीन नावे नोंदणी करण्यासाठी उघडलेले डेस्क दूतावासाने बंद केले आहे.
बुधवारी नेदरलँड्समधील हेग येथे उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO) शिखर परिषदेचा दुसरा दिवस होता. येथे सदस्य देशांचे प्रमुख भेटले. ही बैठक नाटोच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या बैठकांपैकी एक मानली जात आहे. हे अशा वेळी होत आहे जेव्हा मध्य पूर्वेतील इराण-इस्रायल युद्धाच्या १२ दिवसांनंतर युद्धबंदी झाली आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी बुधवारी सांगितले की त्यांनी फेब्रुवारीमध्ये व्हाईट हाऊसच्या भेटीदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणवर हल्ला करण्याच्या योजनेबद्दल सांगितले होते.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय घेतले आहे.
इराणने कतार मधल्या अमेरिकी हवाई तळांवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने इराणला प्रतिहल्ला करून उत्तर दिले नाही. इराणने “बदला” घेतला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी एका एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, इस्रायल आणि इराण त्यांचे अंतिम अभियान पूर्ण करतील तेव्हापासून सुमारे ६ तासांनी ही युद्धबंदी लागू होईल.
इराणने अमेरिकेविरुद्ध मोठी प्रत्युत्तरात्मक कारवाई केली आहे. इराणने कतार आणि इराकमधील अमेरिकन एअरबेसवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यानंतर, भारतीय दूतावासाने कतारमधील भारतीय लोकांसाठी एक अडव्हाझरी जारी केली आहे.
मेरिकेने इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर अचूक हल्ले केले. पण इराणने कतार मधल्या अमेरिकन हवाई तळांवर हल्ले करून “बदला” घेतला.
इराण-इस्रायल युद्ध अधिकच भडकत असताना, इराणच्या संसदेनं घेतलेल्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि जागतिक अर्थव्यवस्थेत खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या अणुकेंद्रांवरील हल्ल्याला प्रत्युत्तर देत इराणने ‘हॉर्मूझ सामुद्रधुनी’ तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले असून, यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याची मागणी केल्याबद्दल पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या सैन्यावर सोशल मीडियावर तीव्र टीका होत आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी नॉर्वे येथील नोबेल शांतता पुरस्कार समितीला औपचारिकपणे पत्र पाठवले आहे, ज्यामध्ये अलिकडच्या भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान ‘निर्णायक राजनैतिक हस्तक्षेप’ केल्याबद्दल अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्काराची शिफारस करण्यात आली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षात भारताने आपला वैध अधिकार वापरून सिंधू जल करार स्थगित केला. त्यामुळे पाकिस्तानला भीषण जलटंचाईला सामोरे जावे लागले. तरी देखील पाकिस्तानने आपली राजकीय मस्ती सोडली नाही.
अमेरिकेने शनिवारी इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथील तीन प्रमुख अणु केंद्रांवर बी-२ स्टेल्थ बॉम्बर्स आणि क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यानंतर, इराणच्या अणुऊर्जा संघटनेने (एईओआय) रविवारी पहिले अधिकृत निवेदन जारी केले. एईओआयने म्हटले आहे की आमची सर्व अणु केंद्रे सुरक्षित आहेत. रेडिएशन लीक झालेले नाही आणि तपासात कोणतेही नुकसान झाल्याचे दिसून आले नाही.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App