कोलंबियामध्ये राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी बोगोटा येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना एका व्यक्तीने त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. गोळी लागताच ते जमिनीवर कोसळे, त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ट्रम्प प्रशासनाने या हल्ल्याचा निषेध केला आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादानंतर, मस्क यांनी ५ जून रोजी सोशल मीडिया X वर एक पोल शेअर केला. या पोलमध्ये मस्क यांनी अमेरिकेत नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याबाबत मत मागितले होते. यावर ८०.४% लोकांनी हो असे उत्तर दिले होते.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी धमकी दिली आहे की त्यांचा देश जलयुद्धात भारताला पराभूत करेल. शनिवारी माध्यमांशी बोलताना आसिफ म्हणाले – चिनाब नदीतील पाण्याचा प्रवाह सामान्यपेक्षा खूपच कमी आहे, भारत जाणूनबुजून त्यावर नियंत्रण ठेवत आहे.
दक्षिण अमेरिकन देश कोलंबियामध्ये, राष्ट्रपती पदाचे उमेदवार मिगुएल उरीबे यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान गोळीबार करण्यात आला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. ही घटना स्थानिक वेळेनुसार शनिवारी संध्याकाळी घडली.
शुक्रवारी लॉस एंजेलिसमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्धच्या कारवाईदरम्यान झालेल्या गोंधळानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने शनिवारी लॉस एंजेलिसमध्ये २००० नॅशनल गार्ड सैनिक तैनात करण्याची घोषणा केली.
पाकिस्तानी शिष्टमंडळाने अमेरिकेत जाऊन पाकिस्तानी दंडात काढल्या बेटकुळ्या, पण सिंधूच्या पाण्यासाठी चार चार वेळा काढताहेत भारताच्या नाकदुऱ्या!!, अशी पाकिस्तानची अवस्था झालीय.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कर कपात आणि खर्च विधेयकावरून त्यांचे माजी सहकारी व प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क यांच्याशी झालेल्या वादात मागे हटण्यास तयार नाहीत. त्यांनी सांगितले की त्यांना त्यांचे संबंध सुधारण्याची कोणतीही इच्छा नाही. एवढंच नाहीतर येत्या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅट्सना मदत करण्याचा प्रयत्न केल्यास मस्क यांना गंभीर परिणाम भोगावे लागू शकते, असा सूचक इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.
बांगलादेशमध्ये एप्रिल २०२६ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. अंतरिम सरकारमधील मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी शुक्रवारी संध्याकाळी याची घोषणा केली.
गाझामध्ये युद्धबंदी लागू करण्याच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) ठरावाला अमेरिकेने व्हिटो केला आहे. बुधवारी UNSC मध्ये यासाठी मतदान झाले ज्यामध्ये १५ पैकी १४ देशांनी गाझामध्ये युद्धबंदीच्या बाजूने मतदान केले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क रिपब्लिकन कर विधेयकावरून समोरासमोर आले आहेत. त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाल्याचे दिसून येते. डोनाल्ड ट्रम्प यांनी कर विधेयकावर नाराजी व्यक्त केली तेव्हा मस्क यांनी असे उत्तर दिले, की जर ते नसते तर डोनाल्ड ट्रम्प निवडणूक जिंकले नसते.
गेल्या अनेक दशकांपासून अमेरिका हा जागतिक वैज्ञानिक प्रतिभेचा आश्रयस्थान मानला जात आहे. पण आता तो आपली चमक गमावत आहे. ८० वर्षांत प्रथमच, हा देश अशा ‘ब्रेन ड्रेन’चा सामना करत आहे.
पाकिस्तानच्या एका अधिकृत कागदपत्रातून असे दिसून आले आहे की ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानमधील अनेक ठिकाणांवर हल्ले केले होते, ज्यांचा उल्लेख भारतीय हवाई दल किंवा लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केलेला नाही.
जगभरातील देशांवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादल्यानंतर आणि देशातून बेकायदेशीर स्थलांतरितांना हाकलून लावल्यानंतर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता १२ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. यासह, या देशांतील लोक आता अमेरिकेत प्रवास करू शकणार नाहीत. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी काही देशांवर प्रवास बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ नाही.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि डिपफेक तंत्रज्ञानामुळे महिलांच्या प्रतिमेचा कसा गैरवापर होऊ शकतो, हे समजावून देण्यासाठी न्यूझीलंडच्या महिला खासदार लॉरा मॅक्लर यांनी एक धक्कादायक पाऊल उचलले. त्यांनी संसदेत स्वतःचा एआय-निर्मित न्यूड फोटो दाखवून एआयच्या वापरातून निर्माण होणाऱ्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले.
इलॉन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आहेत आणि यावेळी कारण आहे त्यांनी आणलेले नवीन चॅटिंग फीचर XChat. अमेरिकेच्या राजकारणात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून दूरावा आल्यानंतर, मस्क यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक नवीन चॅटिंग फीचर लाँच केले आहे.
बांगलादेशच्या मध्यवर्ती बँकेने रविवारी १,०००, ५० आणि २० टकाच्या नवीन नोटा जारी केल्या. या नोट्समधून देशाचे संस्थापक राष्ट्रपती शेख मुजीबुर्रहमान यांचे चित्र काढून टाकण्यात आले आहे.
पाण्याअभावी पाकिस्तानमधील शेतकऱ्यांना पिके पेरण्यात अडचणी येत आहेत. पाकिस्तानच्या सिंधू नदी प्रणाली प्राधिकरणाचा (IRSA) अंदाज आहे की देशातील सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांचा प्रवाह २१% ने कमी झाला आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील मंगला आणि तरबेला या प्रमुख धरणांमध्ये ५०% पेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे.
बांगलादेशमधील आर्थिक आणि राजकीय उलथापालथी दरम्यान, आज (१ जून २०२५) बांगलादेश सरकारकडून एक मोठा निर्णय घेतला गेला आहे. हा निर्णय बांगलादेशातील हिंदूसाठी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल.
बांगलादेशात नोबेल पुरस्कार विजेता हिंसक राज्यकर्ता मोहम्मद युनूस याने आपली सत्तेवरची पकड मजबूत करताना वेगवेगळे हातखंडे वापरले.
संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा देखरेखीखाली असलेल्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) एका गोपनीय अहवालात म्हटले आहे की इराणने शुद्ध युरेनियमचा साठा 60% ने वाढवला आहे. हे युरेनियम शस्त्रांसाठी वापरण्याच्या अगदी जवळ असल्याचे मानले जाते. एजन्सीने इराणला सहकार्य वाढवण्याचे आणि त्यांचे धोरण बदलण्याचे आवाहन केले आहे.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या आरोपांखाली खटला सुरू झाला आहे. रविवारी बांगलादेशातील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण (ICT) येथे औपचारिकपणे आरोप दाखल करण्यात आले.
युक्रेनने ४० रशियन लढाऊ विमाने नष्ट केल्याचा दावा केला आहे. युक्रेनियन वेबसाइट कीव इंडिपेंडेंटने वृत्त दिले आहे की, रविवारी युक्रेनियन ड्रोनने ओलेन्या आणि बेलाया या दोन रशियन हवाई तळांना लक्ष्य केले. यामध्ये A-50, TU-95 आणि TU-22 सारखे धोरणात्मक बॉम्बर नष्ट करण्यात आले.
हा हल्ला युक्रेनच्या सैन्याने आतापर्यंत केलेला सर्वात मोठा हल्ला होता, असा दावा करण्यात आला आहे. Ukraine attack विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युक्रेनने रशियाच्या ओलेन्या […]
आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्यासाठी चीनने शुक्रवारी एक नवीन संघटना स्थापन केली. त्याचे नाव इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मेडिएशन (IOMed) आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) आणि कायमस्वरूपी लवाद न्यायालय यांसारख्या संस्थांना पर्याय म्हणून ती सादर केली गेली आहे.
अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ म्हणाले की, जर चीनने तैवानवर जबरदस्तीने कब्जा करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा इंडो-पॅसिफिक प्रदेश आणि संपूर्ण जगावर खूप वाईट परिणाम होईल. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सिंगापूरमध्ये सुरू असलेल्या शांग्री-ला संवादात हेगसेथ म्हणाले की, चीन आशियातील शक्ती संतुलन बिघडवण्याच्या तयारीत आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App