सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले की, नवीन वक्फ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर २० मे रोजी सुनावणी होईल. सरन्यायाधीश बीआर गवई आणि न्यायमूर्ती एजी मसीह म्हणाले की, केंद्र आणि याचिकाकर्त्याने सोमवार म्हणजे १९ मे पर्यंत त्यांचे प्रतिज्ञापत्र सादर करावे.
शरद पवार महायुतीसोबत असते तर आज राष्ट्रपती झाले असते. आताही त्यांचे स्वागतच आहे, असे महत्वपूर्ण विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी येथे बोलताना केले. राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकीकरणाची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर आठवले यांनी विधान केल्यामुळे त्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियावर लादलेले सर्व निर्बंध रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प म्हणाले की, या निर्णयामुळे सीरियाला पुन्हा प्रगती करण्याची संधी मिळेल.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी पाच दिवसांनंतर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीच्या आपल्या विधानापासून माघार घेतली. त्यांनी सांगितले की मी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी केली नाही, पण मी मदत केली आहे.
१२ मे रोजी कराचीमध्ये हजारो कट्टरपंथी नेते आणि दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या समर्थनार्थ एक रॅली काढली. या रॅलीत लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि अहले सुन्नत वाल जमात यांनी भाग घेतला होता. दोन्ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी संघटना म्हणून घोषित आहेत.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानचा भारताने एवढा दारुण पराभव केला की पाकिस्तान भित्र्या कुत्र्याप्रमाणे दोन पायांमध्ये शेपूट घालून अमेरिकेकडे शस्त्रसंधीसाठी धावला
भारतासोबतच्या अलिकडच्या लष्करी चकमकीत आणखी दोन पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. या संघर्षात आतापर्यंत एकूण १३ पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. ही माहिती पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंग इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने बुधवारी दिली.
बलुचिस्तानचे नेते मीर यार बलोच यांनी बुधवारी औपचारिकपणे पाकिस्तानपासून बलुचिस्तानचे स्वातंत्र्य घोषित केले, दशकांपासून चाललेला हिंसाचार, जबरदस्तीने बेपत्ता होणे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन हे याचे कारण असल्याचे सांगितले. त्यांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की बलुचिस्तानच्या लोकांनी त्यांचा राष्ट्रीय निर्णय घेतला आहे आणि जगाने आता गप्प बसू नये. म्हणूनच, त्यांनी भारतासह आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग-उन यांनी विशेष ऑपरेशन्सच्या संयुक्त सामरिक सरावाचे निरीक्षण केल्यानंतर सशस्त्र दलांना युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. बुधवारी, स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले की किम यांनी सशस्त्र दलांना सर्वात महत्त्वाच्या कामासाठी – युद्धासाठी पूर्ण तयारी करण्यास सांगितले आहे.
भारताने पाकिस्तानातल्या दहशतवादाविरुद्ध operation sindoor कारवाई मधून केलेल्या सगळ्या हल्ल्यांचे खोटे रिपोर्टिंग केल्याबद्दल चिनी सरकारी माध्यमे Xinhua आणि Global Times यांच्यावर आज भारताने बंदी घातली.
पाकिस्तानी लष्कराने कबूल केले आहे की भारतीय हल्ल्यात त्यांचे ११ सैनिक मृत्युमुखी पडले आहेत. शहीद झालेल्या सैनिकांमध्ये ६ लष्कराचे आणि ५ हवाई दलाचे आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील अणुयुद्ध थांबवल्याचे म्हटले आहे. सोमवारी त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना सांगितले की, अमेरिकेने दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी आणण्यास मदत केली आहे.
व्यापाराचे हत्यार वापरून अमेरिकेनेच भारत आणि पाकिस्तान मधले अणुयुद्ध थांबविले, अन्यथा लाखो लोक मेले असते
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रविवारी युक्रेनशी थेट चर्चेचा प्रस्ताव दिला. १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये युक्रेनशी चर्चा करू शकतात असे पुतिन म्हणाले.
पंतप्रधान शरीफ शनिवारी रात्री 11:30 वाजता म्हणाले की, भारताने हल्ला करून जी चूक केली, त्याची किंमत चुकवावी लागेल. काल रात्री संपूर्ण जगाने पाहिले की आपल्या सैन्याने आपल्यापेक्षा कितीतरी पटीने शक्तिशाली असलेल्या शत्रूला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. काही तास लागले. ते म्हणाले, ‘अल्लाहच्या कृपेने, आपल्या शहीदांनी वातावरणात असे वादळ निर्माण केले की शत्रू ओरडू लागला.’
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात ceasefire झाल्याचे जाहीर करून अवघे चार तास उलटले नाही, तोच पाकिस्तानने त्या शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
व्हॅटिकन सिटीमधील सिस्टिन चॅपलच्या चिमणीतून पांढऱ्या धुराचे लोट उठले आहेत. याचा अर्थ कॅथोलिक चर्चच्या कार्डिनल्सनी पुढील पोप निवडला आहे. गुरुवारी, वरिष्ठ कार्डिनल्सनी सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये घोषणा केली की अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट हे कॅथोलिक चर्चचे नवे पोप असतील आणि त्यांना पोप लिओ चौदावे म्हणून ओळखले जाईल. रॉबर्ट प्रीव्होस्ट हे पहिले अमेरिकन पोप आहेत.
भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्याला पाकिस्तानने युद्धाची कृती म्हटले आहे. पाकिस्तानने भारताकडून बदला घेण्याचा दावा केला आहे. ठिकाण आणि वेळ निवडल्यानंतर आपण हल्ला करू.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांना (UN) देण्यात येणारा १९ हजार कोटी रुपयांचा निधी रोखला आहे. यातील काही पैसे बायडेन प्रशासनाच्या कार्यकाळातील देखील आहेत.
जर्मनीच्या रूढीवादी ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन (सीडीयू) पक्षाचे नेते फ्रेडरिक मेर्ट्झ यांची मंगळवारी जर्मनीच्या चान्सलरपदी निवड झाली. दुसऱ्या फेरीच्या मतदानात त्यांना ३२५ मते मिळाली. गुप्त मतदानात त्यांना ६३० पैकी ३१६ मते हवी होती, परंतु पहिल्या फेरीत त्यांना फक्त ३१० मते मिळाली, तर त्यांच्या आघाडीकडे ३२८ जागा होत्या.
इस्रायली सैन्य गाझामधील लष्करी कारवाई आणखी तीव्र करेल. इस्रायलच्या युद्ध मंत्रिमंडळाने सोमवारी या निर्णयाला मान्यता दिली. यामध्ये गाझावर पूर्णपणे ‘ताबा मिळवण्याची आणि संपूर्ण परिसराचा ताबा घेण्याची योजना समाविष्ट आहे.
पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभेने भारताविरुद्ध निषेधाचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. कायदा मंत्री आझम नझीर तरार म्हणाले की, सध्या देशात राष्ट्रीय एकतेची गरज आहे. यावर आपल्याला सामूहिक संदेश देण्याची गरज आहे.
पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. रशियातील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी रशिया टुडेशी बोलताना म्हटले आहे की, जर भारतासोबत युद्ध झाले तर पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करेल.
जगप्रसिद्ध कंपनी बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरेन बफे यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर व्यावसायिक धोरणांवर टीका केली आहे. कंपनीच्या वार्षिक शेअरहोल्डर बैठकीत (एजीएम) ९४ वर्षीय बफेट यांनी ट्रम्प यांना सल्ला दिला की व्यवसायाला शस्त्र बनवू नये. जगाच्या इतर भागांवर दंडात्मक शुल्क लादणे ही एक मोठी चूक आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठाचा करमुक्त दर्जा रद्द करणार असल्याचे सांगितले. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट केले आणि लिहिले की ते यास पात्र आहेत. यापूर्वी, हार्वर्डचे २.२ अब्ज डॉलर्सचे निधी थांबवण्यात आले होते.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App