थायलंडची राजधानी बँकॉकमधील एका बौद्ध मठातील सेक्स स्कँडल उघडकीस आला आहे. या खुलाशामुळे ९ बौद्ध भिक्षूंना मठातून हाकलून लावण्यात आले आहे, तर १०० कोटींहून अधिक रुपयांची खंडणी घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मेच्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानमधील ९ दहशतवादी कारखाने उद्ध्वस्त केले. परंतु, पाकिस्तानने पुन्हा या तळांची दुरुस्ती ‘ना-पाक’ सुरू केली आहे. अडीच महिन्यांनंतर हे काम केले जात आहे. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांद्वारे चालणाऱ्या मदरशांमध्ये विद्यार्थी परतले आहेत. या तळांवरील विध्वंसाची भरपाई करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर आणि शाहबाज सरकारने सरकारी तिजोरी उघडली आहे.
भारत-पाकिस्तान संघर्षाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी म्हटले – मला वाटते की प्रत्यक्षात भारत-पाकिस्तान संघर्षात पाच जेट विमाने पाडण्यात आली. त्याच वेळी, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी केल्याचा दावा केला.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा चीनने तीव्र निषेध केला आहे. शुक्रवारी बीजिंगमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान म्हणाले की, चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा ठामपणे विरोध करतो आणि २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो.
अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत ७०% ची मोठी घट झाली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांशी संबंधित धोरणांमुळे व्हिसा स्लॉट ब्लॉक झाल्यामुळे आणि व्हिसा नाकारण्यात अचानक वाढ झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.
उत्तर कोरियाने अचानक त्यांचे प्रसिद्ध वोनसन-काल्मा बीच रिसॉर्ट परदेशी पर्यटकांसाठी बंद केले आहे. या रिसॉर्टद्वारे परदेशी पर्यटकांना आकर्षित करून उत्तर कोरियाचे सरकार त्यांचे परकीय चलन साठा वाढवू इच्छित होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार कराराबाबत मोठा दावा केला आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की अमेरिकन उत्पादनांना लवकरच भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळेल. त्यांनी असा दावा केला आहे की इंडोनेशिया फॉर्म्युला करार भारतासोबतही केला जाईल. भारतातही अमेरिकन उत्पादनांवर शून्य शुल्क आकारले जाईल.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी म्हटले की, जर त्यांना काही झाले तर त्यासाठी लष्करप्रमुख असीम मुनीर जबाबदार असतील. इम्रान यांच्या पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) नुसार, इम्रान म्हणाले की, अलिकडच्या काळात तुरुंगात त्यांच्या आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांच्याशी होणारे गैरवर्तन वाढले आहे.
बुधवारी गाझा येथील खान युनूस येथील अन्न वितरण केंद्रात ४३ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी २१ जणांचा अन्न मिळवण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाला. तर १५ जणांचा चेंगराचेंगरीत चिरडून मृत्यू झाला. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की ही घटना गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशन (GHF) केंद्रात घडली. मंत्रालयाने इस्रायली सैन्य आणि अमेरिकेवर “जाणूनबुजून” भुकेल्या लोकांची कत्तल केल्याचा आरोप केला.
सुरक्षेतील त्रुटींमुळे मंगळवारी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान ‘व्हाइट हाऊस’ लॉकडाऊन करावे लागले. खरंतर, कोणीतरी व्हाइट हाऊसच्या सुरक्षा कुंपणावरून फोन फेकला होता.व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी माध्यमांना सांगितले – कोणीतरी फोन कुंपणावरून फेकून दिला होता. यानंतर लगेचच आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या.
रशियाशी ४० महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी मोठा राजकीय फेरबदल केला आहे. त्यांनी विद्यमान उपपंतप्रधान युलिया स्विरीडेंको यांना देशाचे नवे पंतप्रधान नियुक्त केले. दुसरीकडे, दीर्घकाळपर्यंत सीएम पदावर राहिलेल मावळते पीएम डेनिस शम्हाल यांना संरक्षणमंत्री केले आहे. मावळते
मंगळवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेतली. वृत्तसंस्था एएनआयनुसार, जयशंकर यांनी राष्ट्रपती जिनपिंग यांना भारत-चीन संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीची माहिती दिली.
रशिया युक्रेनशी युद्ध थांबायला तयार नाही. त्यामुळे तुम्ही रशियावर युद्ध थांबवण्यासाठी दबाव आणा. त्याला युद्धविराम चर्चेला सुरुवात करायला भाग पाडा अन्यथा रशियाशी व्यापार थांबवा
११ जुलै रोजी कॅनडामध्ये इस्कॉनच्या जगन्नाथ रथयात्रेवर काही लोकांनी छतावरून अंडी फेकली. या घटनेचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही घटना घडली जेव्हा भाविक रस्त्यावर नाचत आणि भजन गात होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, पुतिन दिवसा गोड बोलतात आणि रात्री सर्वांवर बॉम्ब टाकतात. आम्हाला हे आवडत नाही.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी बीजिंगमध्ये चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भारत-चीन संबंधांमध्ये अलिकडच्या काळात झालेल्या सुधारणांचा उल्लेख केला.
फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या (बॅस्टिल डे) एक दिवस आधी सोमवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रेंच सैनिकांना संबोधित केले. या दरम्यान त्यांनी सांगितले की, दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच स्वातंत्र्य इतक्या धोक्यात आहे.
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपानला उत्तर कोरियाला लक्ष्य करून कोणताही सुरक्षा युती किंवा लष्करी युती करू नये असा इशारा दिला आहे.लावरोव्ह उत्तर कोरियाच्या वोनसान शहरात होते. यादरम्यान त्यांनी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची भेट घेतली.
पाकिस्तानमधील विरोधी पक्ष, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) ने त्यांचे संस्थापक आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेसाठी देशव्यापी निषेधाची घोषणा केली आहे. शनिवारी पक्षाचे प्रमुख नेते लाहोरमध्ये पोहोचले, जिथून हे आंदोलन औपचारिकपणे सुरू झाले आहे.
गेल्या महिन्यात इराण आणि इस्रायलमध्ये १२ दिवसांचे युद्ध झाले. या काळात १६ जून रोजी इस्रायली हल्ल्यात इराणचे अध्यक्ष मसूद पाझ्श्कियान जखमी झाले. इराणी वृत्तसंस्था फार्सने ही माहिती दिली आहे.
कराचीत रामायणाचे सादरीकरण; पाकिस्तानी समाज सहिष्णू असल्याचे प्रदर्शन!!, हे सगळे नुकतेच पाकिस्तानातल्या सिंध प्रांताची राजधानी कराची मध्ये मौज नावाच्या नाटक मंडळीने रामायणातील काही प्रसंग नाट्यरूपाने सादर केले.
तैवानवरून चीनसोबत युद्ध झाल्यास अमेरिकेने ऑस्ट्रेलिया आणि जपानला त्यांची भूमिका मांडण्यास सांगितले.फायनान्शियल टाईम्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या पेंटागॉनचे संरक्षण उपसचिव एल्ब्रिज कोल्बी यांनी या मुद्द्यावर ऑस्ट्रेलियन आणि जपानी संरक्षण अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या आहेत.
पाकिस्तानातील कराची शहरात हिंदू महाकाव्य रामायणाचे सादरीकरण होत आहे आणि प्रेक्षकांकडून त्याला खूप दाद मिळत आहे. ‘मौज’ नावाचा एक नाट्यगट ११ ते १३ जुलै दरम्यान हे नाटक सादर करत आहे, असे वृत्त ‘डॉन’ने दिले आहे.
बांगलादेशची राजधानी ढाका येथे जमावाने केलेल्या मारहाणीची घटना समोर आली आहे. जिथे एका हिंदू भंगार व्यापाऱ्याला जमावाने मारहाण करून ठार मारले.९ जुलै रोजी हल्लेखोरांनी प्रथम व्यापारी लाल चंद सोहाग (३९) यांना विटा आणि दगडांनी मारहाण केली आणि नंतर मिटफोर्ड हॉस्पिटलजवळ त्यांचे डोके आणि शरीर क्रूरपणे ठेचले.
शुक्रवारी पाकिस्तानने पुन्हा एकदा ६ भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला. पाकिस्तानी माध्यम डॉननुसार, परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी पत्रकार परिषदेत भारताला लढाऊ विमाने गमावल्याची वस्तुस्थिती स्वीकारण्यास सांगितले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App