भारतातील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या अडचणी पुन्हा एकदा वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय संघटना FATF (फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स) पाकिस्तानला चौथ्यांदा ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची तयारी करत आहे.
इस्रायल-इराण संघर्षाने पश्चिम आशियातील तणाव शिगेला पोहोचला असताना, या संघर्षाचे परिणाम आता दक्षिण आशियातही जाणवू लागले आहेत. पाकिस्तानने गुरुवारी गंभीर चिंता व्यक्त करत म्हटले की, इराणची अस्थिरता ही संपूर्ण प्रादेशिक सुरक्षेसाठी घातक ठरू शकते. विशेषतः इराण-पाकिस्तान सीमावर्ती भागात अतिरेकी गट सक्रिय होण्याच्या शक्यतेने पाकिस्तान सरकार सतर्क झाले आहे.
इराण आणि इस्रायलमधील संघर्षादरम्यान, जगाच्या नजरा इराणच्या फोर्डो इंधन समृद्धी प्रकल्पावर खिळल्या आहेत. हा प्रकल्प इराणमधील एका पर्वतरांगात २९५ फूट खोलीवर म्हणजेच सुमारे ९० मीटर अंतरावर आहे.
कॅनडाच्या गुप्तहेर संस्थेने (CSIS) बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात भारतावर कॅनडात परकीय हस्तक्षेपाचा आरोप केला आहे. CSIS अहवालात म्हटले आहे की भारत “आंतरराष्ट्रीय दमन” (सीमापार दमन) मध्ये मुख्य भूमिका बजावतो.
इराण आणि इस्रायलच्या युद्धाला सात दिवस झाले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गुरुवारी सांगितले की, इराणमध्ये सर्वोच्च नेते खामेनी यांच्यासह कोणीही सुरक्षित नाही. आदल्या दिवशी त्यांनी म्हटले होते की, आम्ही इराणकडून इस्रायलवरील हल्ल्याची संपूर्ण किंमत वसूल करू.
इंडोनेशियातील माउंट लेवोटोबी लाकी लाकी येथील ज्वालामुखीचा बुधवारी पुन्हा उद्रेक झाला. त्यामुळे धुराचे आणि राखेचे ढग निर्माण झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी कॅनडाहून क्रोएशियामध्ये पोहोचले. राजधानी झाग्रेबमध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी मंत्रपठण करण्यात आले आणि भारतीय नृत्य सादर करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदी भारतीय समुदायाच्या लोकांशी भेटले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पुन्हा एकदा म्हटले की, त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संभाव्य युद्ध थांबवले. ट्रम्प म्हणाले की, मी युद्ध थांबवले. मला पाकिस्तान आवडतो. पंतप्रधान मोदी एक अद्भुत व्यक्ती आहेत. मी काल रात्री त्यांच्याशी बोललो. आम्ही भारतासोबत व्यापार करार करणार आहोत.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी बुधवारी दिलेल्या संदेशात म्हटले आहे की अमेरिकेने ऐकावे, आम्ही शरणागती पत्करणार नाही. खामेनी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा देत म्हटले आहे की, ‘जर अमेरिकन सैन्याने इस्रायलविरुद्धच्या युद्धात हस्तक्षेप केला तर त्याचे परिणाम वाईट होतील.’
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅनडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि कॅनडा यांच्या त्या संबंधांमध्ये नेमका काय बदल झाला हे दोन्ही देशांमध्ये नियमित राजदूत नेमण्याच्या निर्णयावरून पुढे आले
२४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केले, तेव्हापासून युद्ध सुरू आहे. गेल्या ४० महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धात युक्रेनला मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान सहन करावे लागत आहे.
पाकिस्तानात हिंदू द्वेषाचे विषारी भाषण केलेल्या असीम मुनीर याने अमेरिकेत जाऊन भारताला पाकिस्तानशी सभ्यतेने वागायला सांगितले. पाकिस्तानचा स्वयंघोषित फिल्ड मार्शल असीम मुनीर अमेरिकेच्या दौऱ्यावर गेला.
इराण आणि इस्रायलमधील युद्धादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला.. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे- आम्हाला माहिती आहे की इराणचा ‘सर्वोच्च नेता’ (खामेनी) कुठे लपला आहे. ते एक सोपे लक्ष्य आहे, पण ते सध्या तिथे सुरक्षित आहेत, कारण आम्ही सध्या मारणार नाही. अमेरिकेला नागरिक, सैनिकांवर क्षेपणास्त्रे डागायची नाहीत.
इराणने इस्रायलविरुद्ध अधिकृतपणे युद्ध घोषित केले आहे. इराणी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी बुधवारी ट्विटरवर लिहिले – युद्ध सुरू होत आहे. आम्ही दहशतवादी ज्यू राजवटीला कडक प्रत्युत्तर देऊ. आम्ही त्यांना कोणतीही दया दाखवणार नाही. या घोषणेनंतर इराणने इस्रायलवर २५ क्षेपणास्त्रे डागली.
सौ सोनार की, एक लोहार की या कहावतीचा प्रत्यय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅनडा दौऱ्यात आणून दिला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात 13 वेळा लुडबुड करायचा केलेला प्रयत्न पंतप्रधान मोदींनी एका झटक्यात उधळून लावला.
इराण आणि इस्रायलमधील तणाव आता उघड युद्धात रूपांतरित झाला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये लिहिले की युद्ध सुरू झाले आहे. इराण आणि इस्रायलमधील संघर्ष सहाव्या दिवशीही सुरू आहे. इराणने इस्रायलवर हल्ला केला आहे. प्रत्युत्तरादाखल इस्रायलने १२ ठिकाणी हल्ला केला.
इराणचा सर्वोच्च धार्मिक नेता आय्यतुल्लाह अली खामेनी याचा “सद्दाम हुसेन” करूनच थांबू अशी धमकी इजराइलने तेहरानवर तुफान बॉम्बफेक करतानाच दिली
इस्रायली हवाई दलाने तेहरानमधील इराण स्टेट ब्रॉडकास्टर एजन्सी आयआरआयबीच्या कार्यालयांवर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्याचे व्हिडिओ फुटेज देखील समोर आले आहे, ज्यामध्ये हल्ल्याचे दृश्य स्पष्टपणे दिसत आहे. या हल्ल्यानंतर आयआरआयबीचे प्रसारण खंडित करण्यात आले आणि स्टुडिओमध्ये प्रसारित होणारे अँकर सुरक्षित ठिकाणी पळून जाताना दिसले.
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकेवर इस्रायली आक्रमणाला पाठिंबा देण्याचा थेट आरोप केला आहे. ते म्हणाले की जर अमेरिकेला चर्चा पुन्हा सुरू करायची असेल तर त्यांनी प्रथम त्यांच्या मित्र इस्रायलच्या प्रादेशिक आक्रमकतेला थांबवावे. याशिवाय, इराणने कतार, सौदी अरेबिया आणि ओमानला ट्रम्प यांना तत्काळ युद्धबंदीसाठी इस्रायलवर दबाव आणण्यास सांगण्यास सांगितले.
इराण आणि इस्त्रायलमधील संघर्षाने गंभीर वळण घेतले असून, सोमवारी इस्त्रायली हवाई दलाने थेट तेहरानमधील इराणच्या सरकारी प्रसारमाध्यम आयआरआयबी (IRIB) च्या मुख्यालयावर बॉम्बहल्ला केला.
इजरायल आणि इराण यांच्या युद्धात आगाऊपणे उतरून इजरायला अणुबॉम्ब टाकण्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानने प्रत्यक्षात इराणची सीमा “सील” केली.
मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायलमधील तणाव गेल्या काही दिवसांपासून शिगेला पोहोचला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी (१६ जून २०२५) सांगितले
गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ट्रम्प यांच्या हत्येचे दोन प्रयत्न झाले होते, असा दावा त्यांनी केला
नायजेरियातील उत्तर-मध्य बेन्यू राज्यातील येलेवाटा शहरातील एका गावात किमान १०० जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. शेकडो जण जखमी झाले आहेत आणि डझनभर लोक अजूनही बेपत्ता आहेत.
इराणने पुन्हा एकदा इस्रायलवर डझनभर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. इस्रायली सैन्याने सांगितले की या हल्ल्यात कोणतेही मोठे नुकसान झाले नाही आणि क्षेपणास्त्रे हवेत पाडण्यात आली. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणला शांततेसाठी करार करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी आशा व्यक्त केली की हे दोन्ही कट्टर शत्रू “तडजोड करतील.”
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App