इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी बुधवारी सांगितले की त्यांनी फेब्रुवारीमध्ये व्हाईट हाऊसच्या भेटीदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणवर हल्ला करण्याच्या योजनेबद्दल सांगितले होते.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय घेतले आहे.
इराणने कतार मधल्या अमेरिकी हवाई तळांवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने इराणला प्रतिहल्ला करून उत्तर दिले नाही. इराणने “बदला” घेतला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी एका एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, इस्रायल आणि इराण त्यांचे अंतिम अभियान पूर्ण करतील तेव्हापासून सुमारे ६ तासांनी ही युद्धबंदी लागू होईल.
इराणने अमेरिकेविरुद्ध मोठी प्रत्युत्तरात्मक कारवाई केली आहे. इराणने कतार आणि इराकमधील अमेरिकन एअरबेसवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यानंतर, भारतीय दूतावासाने कतारमधील भारतीय लोकांसाठी एक अडव्हाझरी जारी केली आहे.
मेरिकेने इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर अचूक हल्ले केले. पण इराणने कतार मधल्या अमेरिकन हवाई तळांवर हल्ले करून “बदला” घेतला.
इराण-इस्रायल युद्ध अधिकच भडकत असताना, इराणच्या संसदेनं घेतलेल्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि जागतिक अर्थव्यवस्थेत खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या अणुकेंद्रांवरील हल्ल्याला प्रत्युत्तर देत इराणने ‘हॉर्मूझ सामुद्रधुनी’ तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले असून, यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याची मागणी केल्याबद्दल पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या सैन्यावर सोशल मीडियावर तीव्र टीका होत आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी नॉर्वे येथील नोबेल शांतता पुरस्कार समितीला औपचारिकपणे पत्र पाठवले आहे, ज्यामध्ये अलिकडच्या भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान ‘निर्णायक राजनैतिक हस्तक्षेप’ केल्याबद्दल अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्काराची शिफारस करण्यात आली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षात भारताने आपला वैध अधिकार वापरून सिंधू जल करार स्थगित केला. त्यामुळे पाकिस्तानला भीषण जलटंचाईला सामोरे जावे लागले. तरी देखील पाकिस्तानने आपली राजकीय मस्ती सोडली नाही.
अमेरिकेने शनिवारी इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथील तीन प्रमुख अणु केंद्रांवर बी-२ स्टेल्थ बॉम्बर्स आणि क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यानंतर, इराणच्या अणुऊर्जा संघटनेने (एईओआय) रविवारी पहिले अधिकृत निवेदन जारी केले. एईओआयने म्हटले आहे की आमची सर्व अणु केंद्रे सुरक्षित आहेत. रेडिएशन लीक झालेले नाही आणि तपासात कोणतेही नुकसान झाल्याचे दिसून आले नाही.
ब्राझीलच्या दक्षिणेकडील सांता कॅटरिना राज्यात उडणाऱ्या एका हॉट एअर बलुनला आग लागली. त्यानंतर, तो बलुन थेट आकाशातून खाली पडला. ज्यात आठ जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही दुर्घटना शनिवारी घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यासंबंधीचे फुटेज प्रसिद्ध झाले आहे. यामध्ये आग लागलेल्या हॉट एअर बलूनमधून धूर निघताना दिसत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अपघातातून १३ जण वाचले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दहशतवादी देशाच्या शिफारशीवर, ट्रम्पचा दावा नोबेलवर!!, असे अमेरिकेच्याही इतिहासातले रसातळाचे राजकारण आज घडले. अमेरिकेनेच शस्त्रास्त्रे देऊन पोसलेलेल्या पाकिस्तान सारख्या मंडलिक राष्ट्राने अमेरिकेच्या अध्यक्षाला नोबेल पुरस्कार मिळावा यासाठी शिफारस पत्र दिले. आणि ते मिळवणारे डोनाल्ड ट्रम्प हे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
इस्रायलने इराणच्या इस्फहान अणुऊर्जा केंद्र आणि क्षेपणास्त्र ठिकाणावर मोठा हल्ला केला आहे. यासोबतच, इस्रायली सुरक्षा दलांनी (आयडीएफ) इराणी रिवोल्यूशनरी गार्ड्सचे (आयआरजीसी) कुद्स फोर्समधील पॅलेस्टिनी विभागाचे प्रमुख सईद इजादी यांनाही ठार केलं आहे.
आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या रगड्यात आपल्या देशाचे तुकडे होतील, याची खात्री दहशतवादी देश पाकिस्तानला पटत चालली आहे
७ मे रोजी रात्री ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारताने अचूक स्ट्राईक करून पाकिस्तान आणि पीओकेमधील अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यामध्ये लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांचे अड्डे समाविष्ट होते. पण आता, पाकिस्तानी सैन्य ते पुन्हा दुरुस्त करत आहे.
इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेला संघर्ष हा केवळ लष्करी संघर्ष नाही तर तो आता आर्थिक संकटातही रूपांतरित होत आहे. इस्रायलचे माजी संरक्षण सल्लागार ब्रिगेडियर जनरल (निवृत्त) रामेम अमिनच यांच्या मते, युद्ध लढण्यासाठी इस्रायल दररोज ७२५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ६,००० कोटी रुपये) खर्च करत आहे.
भारतातील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या अडचणी पुन्हा एकदा वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय संघटना FATF (फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स) पाकिस्तानला चौथ्यांदा ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची तयारी करत आहे.
इस्रायल-इराण संघर्षाने पश्चिम आशियातील तणाव शिगेला पोहोचला असताना, या संघर्षाचे परिणाम आता दक्षिण आशियातही जाणवू लागले आहेत. पाकिस्तानने गुरुवारी गंभीर चिंता व्यक्त करत म्हटले की, इराणची अस्थिरता ही संपूर्ण प्रादेशिक सुरक्षेसाठी घातक ठरू शकते. विशेषतः इराण-पाकिस्तान सीमावर्ती भागात अतिरेकी गट सक्रिय होण्याच्या शक्यतेने पाकिस्तान सरकार सतर्क झाले आहे.
इराण आणि इस्रायलमधील संघर्षादरम्यान, जगाच्या नजरा इराणच्या फोर्डो इंधन समृद्धी प्रकल्पावर खिळल्या आहेत. हा प्रकल्प इराणमधील एका पर्वतरांगात २९५ फूट खोलीवर म्हणजेच सुमारे ९० मीटर अंतरावर आहे.
कॅनडाच्या गुप्तहेर संस्थेने (CSIS) बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात भारतावर कॅनडात परकीय हस्तक्षेपाचा आरोप केला आहे. CSIS अहवालात म्हटले आहे की भारत “आंतरराष्ट्रीय दमन” (सीमापार दमन) मध्ये मुख्य भूमिका बजावतो.
इराण आणि इस्रायलच्या युद्धाला सात दिवस झाले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गुरुवारी सांगितले की, इराणमध्ये सर्वोच्च नेते खामेनी यांच्यासह कोणीही सुरक्षित नाही. आदल्या दिवशी त्यांनी म्हटले होते की, आम्ही इराणकडून इस्रायलवरील हल्ल्याची संपूर्ण किंमत वसूल करू.
इंडोनेशियातील माउंट लेवोटोबी लाकी लाकी येथील ज्वालामुखीचा बुधवारी पुन्हा उद्रेक झाला. त्यामुळे धुराचे आणि राखेचे ढग निर्माण झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी कॅनडाहून क्रोएशियामध्ये पोहोचले. राजधानी झाग्रेबमध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी मंत्रपठण करण्यात आले आणि भारतीय नृत्य सादर करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदी भारतीय समुदायाच्या लोकांशी भेटले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पुन्हा एकदा म्हटले की, त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संभाव्य युद्ध थांबवले. ट्रम्प म्हणाले की, मी युद्ध थांबवले. मला पाकिस्तान आवडतो. पंतप्रधान मोदी एक अद्भुत व्यक्ती आहेत. मी काल रात्री त्यांच्याशी बोललो. आम्ही भारतासोबत व्यापार करार करणार आहोत.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी बुधवारी दिलेल्या संदेशात म्हटले आहे की अमेरिकेने ऐकावे, आम्ही शरणागती पत्करणार नाही. खामेनी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा देत म्हटले आहे की, ‘जर अमेरिकन सैन्याने इस्रायलविरुद्धच्या युद्धात हस्तक्षेप केला तर त्याचे परिणाम वाईट होतील.’
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App