Vijay Wadettiwar : भुजबळांच्या व्हिडिओवर वडेट्टीवारांचा पलटवार; ते ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवणाऱ्या फॅक्टरीत काम करतात- विजय वडेट्टीवार
मराठा समाजाच्या आरक्षणावरून आता ओबीसी नेत्यांची आपसातच जुंपली आहे. मराठ्यांना ओबीसी समाजाच्या कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी सर्वच ओबीसी नेत्यांचे एकमत आहे. असे असले तरी दुसरीकडे ते एकमेकांना टार्गेटही करीत आहेत. शुक्रवारी बीड येथे झालेल्या ओबीसीच्या मोर्चात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी विजय वडेट्टीवारांचा एक जुना व्हीडीओ दाखवला. त्याला शनिवारी पत्रकार परिषदेतून वडेट्टीवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.