• Download App
    Narendra Modi भारताचा जागतिक सन्मान : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा इस्रायलच्या 'स्पीकर ऑफ द नेसेट मेडल'ने गौरव!!

    भारताचा जागतिक सन्मान : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इजरायलच्या स्पीकर ऑफ द नेसेट मेडलने गौरव!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आत्तापर्यंत 27 देशांचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इजरायली संसदेने सुद्धा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव केला. युरोप, अमेरिका, आफ्रिका या खंडांमधल्या प्रमुख देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपापल्या देशांचे सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केले. त्यामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा गौरव आणि दबदबा वाढला.

    त्यापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्रायली संसदेचा (Knesset) सर्वोच्च सन्मान असलेले ‘स्पीकर ऑफ द नेसेट मेडल’ प्रदान करण्यात आले आहे. हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. हा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे.



    भारत–इस्रायल यांच्यातील धोरणात्मक भागीदारीला नव्या उंचीवर नेण्यासाठी तसेच विश्वास, नवोपक्रम, सुरक्षा आणि प्रगती यांवर आधारित द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी मा. पंतप्रधान मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाची ही दखल आहे. हे भारताच्या वाढत्या जागतिक प्रतिष्ठेचे आणि दोन्ही देशांतील अभेद्य मैत्रीचे द्योतक आहे. या गौरवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

    Narendra Modi. This is the highest honour of the Knesset.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    शिवसेना आणि तृणमूळ काँग्रेस मधून बाहेर पडलेल्या बंडखोर २६ खासदारांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची अधिमान्यता; बंडखोरीवर शिक्कामोर्तब!;

    Andhra Pradesh : आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचे 12 रुग्ण, 4 मृत्यू; जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याला पाठवले नमुने, शेजारील राज्य कर्नाटक सतर्कतेवर

    Plastic Currency Notes : देशात लवकरच प्लास्टिक नोटा चलनात येतील, आरबीआयIने निविदा जारी केली; ₹10 आणि ₹20 च्या नोटांपासून चाचणी सुरू होईल