संजय राऊतांनी राजगुरूनगरमध्ये येऊन राष्ट्रवादीच्या आमदाराला पाडण्याचा इशारा देणे हा शिवसेनेचा दमखम आहे हे खरे… पण बाळासाहेबांच्या एका इशाऱ्याने पेटून उठणारे शिवसैनिक संजय राऊतांच्या इशाऱ्याने पेटून उठतील?? शरद पवारांनी शिवसेनेतून फोडलेल्या गद्दारांना बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी पाणी पाजले होते. पण आज सिल्वर ओकच्या दारात शिवसेनेला नेऊन बांधणाऱ्या संजय राऊतांच्या आवाहनात तेवढा दमखम उरलाय…?? will shivsaniks listen proper warnig of shivsena MP sanjay raut?, will they act accordingly?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राजगुरूनगरमध्ये जाऊन व्यक्त केलेली अस्वस्थता काय खेडपुरती मर्यादित आहे का… त्यांना पुणे जिल्ह्यातले इंदापूर, पुरंदर, कोथरूड दिसत नाहीत का… हे विचारण्याची गरज आहे. पण तरीही ज्या स्टाईलने संजय राऊतांनी खेडमध्ये जाऊन दिलीप मोहितेंना पाडण्याचा इशारा दिलाय, त्याला दाद दिली पाहिजे. याला म्हणतात शिवसेना स्टाईल… ज्य़ा स्टाइलचा झटका शिवसैनिकांनी छगन भुजबळांना दिलाय… ज्या स्टाईलचा झटका त्यांनी नारायण राणेंनाही दिलाय… त्या स्टाइलचा झटका दिलीप मोहितेंना देण्याची भाषा संजय राऊतांनी केली आहे… पण आपण स्वतः शरद पवारांच्या नादी लागायचे, शिवसेनेला सिल्वर ओकच्या दारात नेऊन बांधायचे… आणि वर खेडमध्ये येऊन राष्ट्रवादीच्या आमदाराला पाडण्याचा इशारा द्यायचा… यातला “राजकीय इशारा” बाळासाहेबांचे शिवसैनिक कसा समजून घेतील??
यातून शिवसैनिकांना चेव चढणार आहे का… की त्यातून ते दिलीप मोहितेंना पाडण्यासाठी कंबर कसतील… हा कळीचा प्रश्न आहे. आणि एकेकाळी शिवसैनिक पेटून उठत होता हे खरेच आहे. बाळासाहेबांशी गद्दारी करणाऱ्यांच्या विरोधात तो पेटून उठून काम करीत होता. पण एक बाब इथे लक्षात घेतली पाहिजे, ज्या शिवसैनिकांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली होती. ते सगळे गद्दार शरद पवारांनी फोडले होते. किंबहुना शरद पवारांनी फोडले म्हणूनच ते शिवसैनिक गद्दार म्हणून गणले गेले… आणि त्यानंतर बाळासाहेबांच्या एका इशाऱ्यासरशी गद्दारांना शिवसैनिकांनी जिद्दीने एकत्र येऊन पाणी पाजले होते. त्या शिवसैनिकांची तशी आज हिंमत उरली आहे काय… बाळासाहेबांनी आपल्या ज्वलंत भाषणातून शिवसैनिकांना पेटविणे निराळे आणि संजय राऊतांनी शरद पवारांशी साटेलोटे करून पत्रकार परिषदेत दिलीप मोहितेंना पाडण्याचा इशारा देणे निराळे…!!
संजय राऊतांच्या इशाऱ्याने फारतर शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील सुखावले असतील, पण शिवसैनिक पेटून उठतील का हा खरा प्रश्न आहे. कारण पेटून उठविण्याचे काम तोच करू शकतो, ज्याच्या निष्ठा अभंग आणि पथ्थरासारख्या मजबूत असतात. बाळासाहेबांपाशी ज्वलंत हिंदुत्वाचे तारण होते. ते संजय राऊतांपाशी उरलेय…??… बाळासाहेबांचा शिवसैनिक नक्की प्रश्न विचारेल…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App