नाशिक : शरद पवारांच्या राज्यसभेच्या जागेसाठी नाईलाजाने पाठिंबा देणारी काँग्रेस विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणार का??, असा सवाल आज समोर आला.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिकाम्या झालेल्या नऊ जागांसाठी 12 मे रोजी निवडणूक घेण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. या नऊ जागांमध्ये उद्धव ठाकरेंच्या एका जागेचा समावेश आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेत पोहोचू शकणार का??, त्यांना काँग्रेस मदत करणार का??, असा सवाल समोर आला.
– मतांचा कोटा 28
विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. पण काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यापैकी कोणाकडेही 28 आमदार नाहीत. त्यामुळे यापैकी कुठलाही एक 28 मतांचा पोटा पूर्ण करू शकत नाही. अर्थातच त्यामुळे तिन्ही पक्षांना एकत्र राहण्याखेरीज दुसरा पर्याय सुद्धा नाही.
– फडणवीसांच्या डावपेचांमुळे पवारांना राज्यसभा दिसली
शिवाय विधान परिषदेच्या सध्याच्या निवडणुकीत राज्यसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीचे धागेदोरे पण गुंतलेत. कारण त्या राज्यसभेच्या निवडणुकीत उतरण्याची शरद पवारांनी इच्छा व्यक्त केल्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही पक्षांची गोची झाली. शिवसेनेची हक्काची जागा पवारांना द्यावी लागली. काँग्रेसची सुद्धा पवारांच्या मागे फरफट झाली. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार उभे राहणार असतील, तर सत्ताधारी महायुती सातवा उमेदवार देणार नाही, पण पवारांच्या ऐवजी दुसरा उमेदवार असेल, तर महायुती सातवा उमेदवार देईल, असा पेच टाकला होता. त्यामुळे शरद पवारांच्या खेरीज दुसऱ्या कुठल्याही उमेदवाराला पराभवाचा धोका पत्करावा लागला असता. तो धोका पत्करण्याची तयारी नसल्यानेच काँग्रेस आणि शिवसेना यांना शरद पवारांना पाठिंबा देणे भाग पडले होते.
– कोटा पूर्ण करण्यासाठी आमदारांना टिकवण्याचे आव्हान
पण त्याच वेळी शरद पवारांनी विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्याचा सुद्धा शब्द दिला होता. पण पवारांचा शब्द हा उद्धव ठाकरेंना विधान परिषदेत पोचविण्यासाठी पुरेसा करेल का याविषयी शंका आहे कारण उद्धव ठाकरेंचे वीस आमदार आणि शरद पवारांचे दहा आमदार अशी संख्या बेरीज जरी 30 होणार असली तरी या दोन्ही नेत्यांचे सर्वच्या सर्व आमदार एकत्र राहूनच मतदान करतील की नाही याविषयी दाट शंका व्यक्त केली जात आहे. शिवाय महायुतीने दहावा उमेदवार दिला, तर ठाकरे आणि पवारांच्याच पक्षांमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. शिवाय काँग्रेसने विधान परिषदेच्या जागेवर हक्क सांगून स्वतःचा उमेदवार दिला तर उद्धव ठाकरेंचे विधान परिषदेचे स्वप्न कायमचे विरून जाण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डावपेचांमुळे शरद पवार जरी राज्यसभेत बिनविरोध पोहचू शकले असले, तरी उद्धव ठाकरे विधान परिषदेत केवळ शरद पवारांच्या शब्दांच्या आधारे पोहचतील की नाही याविषयी राजकीय वर्तुळात दाट शंका व्यक्त होत आहे. शिवाय शरद पवारांच्या शब्दाविषयी सुद्धा कुणाला खात्री नसल्याने या शंकेच्या दाटपणात भर पडली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App