Between the lines : दोनाचे झाले चार, तरी होतील का 145 पार??


महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतले मतदान पार पडण्याआधी अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निवडणुकीनंतरच्या समीकरणाच्या बाता करू लागले आहेत. कोणत्याही स्थितीमध्ये सत्तेच्या खुर्च्यांवर बसायचे. खुर्च्यांवरून उतरायचेच नाही. या मनःस्थितीतून त्यांनी अशा चर्चा सुरू केल्या आहेत आणि त्या चर्चांना राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीच्या राजकीय इतिहासाचा देखील आधार आहे. कारण पवारांनी जी राष्ट्रवादी नावाची प्रवृत्ती निर्माण केली, तिची संजीवनी किंवा तिचा ऑक्सिजन सत्तेमध्येच आहे. सत्तेखेरीज ही राष्ट्रवादी नावाची प्रवृत्ती राहूच शकत नाही, तिची घुसमट होते. म्हणूनच बाकी कोणत्याही पक्षांपेक्षा राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीच्या नेत्यांनी म्हणजेच नवाब मलिक आणि दिलीप वळसे पाटलांनी निवडणुकीनंतरच्या समीकरणांच्या चर्चेचे पिल्लू महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात सोडून दिले आहे. Will 4 regional parties be able to come together for power in maharashtra??

याचा अर्थच पवारांच्या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीला कोणत्याही स्थितीत महाराष्ट्रातली सत्तेची वळचण सोडायची नाही, हे सिद्ध होते.

अशा स्थितीत निवडणुकीनंतरच्या समीकरणांमध्ये काय काय शक्यता असू शकतात??, याचा थोडा बारकाईने आढावा घेतला, तर एक बाब लक्षात येते आणि ती शीर्षकात उल्लेखित केली आहे, ती म्हणजे, दोनाचे झाले चार, तरी होतील का 145 पार??, ही आहे.

महाराष्ट्र मध्ये आता शिवसेना आणि राष्ट्रवादी नावाचे दोनच प्रादेशिक पक्ष उरलेले नाहीत, तर ते चार पक्ष झाले आहेत. विशिष्ट राजकीय परिस्थितीनुसार हे चार पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पण अशी एकमेकांसमोर उभे ठाकण्याची स्थिती कायमच राहील, असे मानायचे काही कारण नाही. राजकीय परिस्थिती बदलली, महाराष्ट्रातल्या नद्यांमधून “राजकीय पाणी” वाहून गेले, तर कदाचित एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले हे दोनाचे चार झालेले प्रादेशिक पक्ष सत्तेच्या खुर्चीसाठी एकत्र येऊ शकतात का??, याचा विचार जर राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीने केला असेल, तर आश्चर्य वाटायला नको.


Sanju Samson : संजू सॅमसनने डर्बनमध्ये शतक झळकावून इतिहास रचला


– चार प्रादेशिकांची आघाडी

महाराष्ट्रामध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांना वगळून चार प्रादेशिक पक्षांची आघाडी 145 चा आकडा निवडणुकीनंतर गाठू शकणार असेल, तर हे पक्ष एकत्र यायला देखील मागे पुढे पाहणार नाहीत. सत्तेसाठी ते वाटेल त्या तडजोडी करतील. कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ती खासियत आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ती नव्याने निर्माण झालेली खासियत आहे. या खासियती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उतरणे कठीण नाही. कारण शेवटी सत्तेच्या खुर्चीचा जोड फेव्हिकॉल पेक्षा मजबूत असतो, हे उघड सत्य आहे.

– यातल्या ट्विस्टची गोष्ट

पण यात देखील एक ट्विस्ट आहे. चार प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन त्यांना राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसला बाजूला काढून टाकणे शक्य आहे. कारण काँग्रेस आज केंद्रात सत्तेवर नाही. पण भाजपच्या बाबतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हे कितपत शक्य होईल??, याविषयी दाट संशय आहे. कारण एकनाथ शिंदे असोत किंवा अजित पवार असोत, हे त्यांच्या “टर्म्स अँड कंडिशन्स”वर भाजप बरोबर आलेले नाहीत, तर भाजपने केंद्रीय सत्तेच्या बळावर आपल्या “टम्स अँड कंडिशन्स”वर शिंदे आणि अजितदादा आपल्याबरोबर घेतले आहे. निवडणुकीनंतर भले महाराष्ट्रातले कॉम्बिनेशन चार प्रादेशिक पक्षांच्या आकड्यांनी जुळले, तरी केंद्रातली सत्ता हे आकड्यांचे समीकरण जुळत असताना हातावर हात धरून बसेल किंवा ती बदलेल, ही शक्यताच फारच दुरापास्त आहे. …आणि जर केंद्रातली सत्ता बदलणार नसेल, तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या नेत्यांवरची केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईची टांगती तलवार दूर होण्याची शक्यता नाही. ही शक्यता स्वतः पवारांनीच बोलून दाखवली आहे. इथेच 145 या आकड्याच्या पलीकडचे “राजकीय सत्य” दडले आहे!!

Will 4 regional parties be able to come together for power in maharashtra??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात