जगात सर्वाधिक वेगाने धावणारा प्राणी अशी चित्त्याची ओळख आहे. हे जवळपास सर्वांनाच ठावूक आहे. तो ताशी 104 किलोमीटर या कमाल वेगाने धावू शकतो. पण चित्ताच इतक्या वेगाने कसा धावू शकतो याबाबत कुतूहल कायमच असते. Why does the cheetah run the fastest in the world?
कारण जगाच्या पाठीवर हजारो वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. त्याचप्रमाणे चित्ता ज्या कॅट जातकुळीत येतो त्या फॅमिलीतही मांजर, वाघ, लांडगा असे वेगवेगळे प्राणी येतात. मात्र या सर्वांमध्ये चित्ता हाच सर्वाधिक वेगवान प्रामी असल्याचे मानले जाते. यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत.
चित्याच्या शरीराची ठेवण त्याला धावण्यासाठी उपयुक्त ठरते. पण या वरवरच्या निष्कर्षापेक्षा या वेगामागची अन्य सखोल कारणे आता समोर येत आहेत. चित्त्याच्या या वेगाचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न संशोधक करत असून, कानांच्या आतील वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे चित्ता प्रचंड वेगाने धावू शकतो, असा निष्कर्ष द अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीच्या संशोधकांनी नुकताच काढला आहे.
चित्ता आतील कानांमुळे तोल आणि शरीराचा ठेवण सांभाळू शकतो, असे या संशोधकांचे निरीक्षण आहे. त्यांनी चित्त्याच्या 21 कवट्यांची हाय रिझोल्युशन एक्स -रेद्वारे तपासणी केली. त्यामध्ये चित्त्याच्या कानाच्या आतील रचनेमध्ये उत्क्रांती होत गेल्याचेही संशोधकांना आढळले. संशोधकांनी चित्त्याच्या इतर 12 प्रजातींवरही संशोधन केले. त्यांनी चित्त्याच्या कानाच्या आतील रचनेची 3 डी व्हर्चुअल प्रतिमा तयार केली.
इतर प्राण्यांच्या तुलनेत चित्त्याच्या कानाची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून आधुनिक चित्त्यामध्ये कानाच्या आतील तीन अर्धवर्तुळाकार नलिकांपैकी दोन नलिकांची लांबी अधिक असल्याचे आढळले. त्यामुळे चित्त्याला शिकारीदरम्यान नजर स्थिर ठेवून कमाल वेगाने धावणे शक्यर होते असे या संशोधकांचे मत आहे. या संशोधनामुळे चित्त्याची अनेक रहस्ये जगासमोर येण्यास मदत होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App