मोबाईल फोन आयताकृती अकराचाच का असतो. तो वर्तुळाकार, त्रिकोणी किंवा इतर कुठल्या आकाराचा का नसतो? सुरवातीला आपण जुन्या फोन्स बद्दल जाणून घेऊ, सर्वात जुने सेल फोन नैसर्गिकरित्या आयताकृती आकाराचे असायचे कारण त्यातल कीपॅड, डिस्प्ले, मायक्रोफोन, ऍन्टेना आणि स्पीकरला यासर्वांचे स्थान बघितले तर ते आयताकृती आकारातच नीट बसतात, म्हणून ते आयताकृती असायचे. Why aren’t smartphones round or triangular, just rectangular?
पण आत्ताच्या स्मार्टफोनचं आयताकृती असण्यामागे वेगळं लॉजिक आहे. त्रिकोणी किंवा वर्तुळाकार आकाराच्या तुलनेत आयताकृती आकाराची वस्तू हाताळण्यास सोपी असते. कल्पना करा जर आपले फोन गोलाकार किंवा त्रिकोणी आकाराचे असते तर त्यावर टाईप करताना ते कम्फर्टेबल असते? ते आपल्या पॉकेटमध्ये नीट ठेवता आले असते ? थोडं विचित्र वाटत ना. म्हणूनच तर आपले मोबाईल फोन्स हे आयताकृती असतात कारण ते हाताळण्यास सोपे आणि वापरण्यास फेक्सिबल असतात.
कदाचित आपण कधी आपल्या फोनच्या पैलूंकडे लक्ष दिल नसेल. पण याचा एक रेशो असतो, ज्यामुळे युजर मोबाईल हाताळत असताना त्याला स्क्रीन क्लॅरिटी आणि पिक्चर क्वालिटी मिळते. याचा उत्तम आणि स्टॅंडर्ड अस्पेक्ट रेशो १६.९ आहे. इतर आकारांपेक्षा अक्षरांची आणि वर्णांची सिमेट्री आयताकृती आकारांत जास्त चांगली बसते. तसेच यात स्क्वेअर पिक्सल्स व्यवस्थित बसतात ज्यामुळे कुठल्याही प्रकारची गॅप राहत नाही. पण जर आपण इतर आकारांचा विचार केला तर त्यात विनाकारण जागा वाया जाईल तसेच त्यात एकत्र पिक्सेल्स बसणार नाहीत आणि बसले तरी ते खूप विचत्र दिसतील.
इतर आकारांत अक्षर तसेच वर्ण यांना प्रॉपर जागा नसल्याने १०० टक्के जागेचा वापर देखील होणार नाही. गणितानुसार आयातीची परिमिती ही वर्तुळ किंवा त्रिकोणापेक्षा जास्त असते. मोबाईल फोन्स हे आपल्याला हाताळण्यासाठी सोपे असावे म्हणून वरील सर्व बाबींचा विचार करून त्यांना हा आयताकृती आकार देण्यात आला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App