INDI आघाडीच्या बैठका आणि नुसताच गाजावाजा, पण NDA आघाडीचे मात्र सुरू आहे, “सुमडीत कोंबडी” कापा!!, असे म्हणायचे वेळ सध्याच्या दोन्ही आघाड्यांच्या राजकीय हालचालींनी आली आहे.
काँग्रेस प्रणित INDI आघाडी स्थिर उभी राहण्याआधीच लडखडायला लागली आहे. तिच्यात कुठलेच पक्ष टिकेनासेच झाले आहेत. ना बंगालमध्ये ममता काँग्रेसला अजून जागा द्यायला राजी आहेत, ना महाराष्ट्रातले जागावाटप अजून निश्चित होत आहे. अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात 80 पैकी 17 जागांवर काँग्रेसची बोळवण करून कशीबशी INDI आघाडी तिथे टिकवली. तामिळनाडूत द्रविड मुन्नेत्र कळघम राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर पूर्णपणे अडचणीत आल्यावर काँग्रेसला 39 पैकी 4 जागा देऊन बोळवण करण्याच्या बेतात आहे. त्यामुळे तिथे INDI आघाडी टिकण्याची शक्यता आहे.
INDI आघाडीच्या बड्या बड्या 5 स्टार हॉटेलांमध्ये जेवढ्या बैठका झाल्या, तेवढ्या राज्यांमध्ये त्यांचे साधे समझोते देखील झाले नाहीत. कारण INDI आघाडीच्या बैठका 5 शहरांमध्ये झाल्या, पण 5 राज्यांमध्ये INDI आघाडी टिकली किंवा उभी राहिली, असे घडले नाही.
उलट हिमाचल मधले काँग्रेसचे सरकार कोसळ्याच्या बेतात आले आहे. तेलंगणात काँग्रेसची सत्ता आली, पण तिथले मुख्यमंत्री रेवंत रेड्डी पंतप्रधान नरेंद्र मोदींना “मोठा भाऊ” म्हणून बसले आणि “गुजरात मॉडेल”ची त्यांनी प्रशंसा केली. दुसरीकडे आंध्र प्रदेशात काँग्रेसने मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या घरात फूट पाडली त्यांची बहीण वाय. एस. शर्मिला यांचा वेगळा पक्ष गुंडाळून त्यांने थेट काँग्रेस पक्षात घेऊन त्यांच्याकडेच आंध्र काँग्रेसचे नेतृत्व संपवले, पण आंध्रातली ही फोडाफोडी काँग्रेसला फारशी पचली नाही.
कारण त्या निमित्ताने आंध्राचे जुने राज्यकर्ते चंद्राबाबू नायडू सावध झाले आणि त्यांनी पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीची अर्थात NDA ची वाट धरली. शिवाय ते आंध्रात एकटेच NDA मध्ये शिरले नाहीत, तर त्यांनी आपल्या समवेत अभिनेते पवन कल्याण यांची जनसेना पक्षही आणला. त्यामुळे आंध्रात काँग्रेस रेड्डी घराण्यात फोडाफोडी करून बेरजेचे राजकारण करायला गेली, INDI आघाडी मजबूत करायला गेली, पण मोदी – शाहांच्या भाजपने तिथे “सुमडीत कोंबडी” कापून चंद्राबाबू आणि पवन कल्याण यांना NDA च्या गोटात आणले.
ओडिशात तर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल हा पक्ष थेट भाजपमध्येच विलीन करण्याच्या चर्चांनी जोर पकडला आहे. तिथे बिजू जनता दल भाजपमध्ये विलीन होवो किंवा न होवो, तो काँग्रेसशी समझोता करणार नाही, एवढे मात्र निश्चित आहे. त्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष लाभ भाजप प्रणित NDA लाच होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी परवाच जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते. श्रीनगरच्या बक्षी स्टेडियम मध्ये काश्मीर खोऱ्यातल्या हजारो युवकांशी त्यांनी प्रत्यक्ष आणि व्हर्चुअल संवाद साधला. त्यात त्यांनी थेट राजकारण कुठले केले नाही, पण जम्मू – काश्मीरमध्ये मोदींच्या एका दौऱ्याने “सुमडीत कोंबडी” कापली गेली. अब्दुल्ला आणि मुफ्ती यांच्या परिवारांमध्ये दरार आली. गुपकार आघाडी संपुष्टात आली. फारूक अब्दुल्लांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची स्तुती केली. ते केवळ भाजपचे पंतप्रधान नाहीत, तर ते संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत अशी मखलाशी केली. त्यामुळे अखिलेश यादव राहुल गांधी यांच्यासारखे नेते दुखावले. मेहबूबा मुफ्ती यांची चिडचिड झाली. आतापर्यंत फारूक अब्दुल्ला छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सांगत होते, पण आघाडी तोडण्याची एवढी मोठी गोष्ट त्यांनी आपल्यासाठी कानावरही घातली नाही, असे मेहबूबा मुक्ती म्हणाल्या. पण चिडचिड करण्यापलीकडे कुठलीच राजकीय हालचाल त्यांना करता आली नाही. कारण मोदींच्या एका दौऱ्याने तिथे “सुमडीत कोंबडी” कापली गेली होती.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA ची एकच मोठी बैठक पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी घेतली. त्याला 38 पक्ष हजर ठेवले होते. त्यानंतर त्यांनी NDA ची एकही बैठक आघाडीची घेतलेली नाही, पण म्हणून त्यांनी त्यांचे राजकारण थांबवले असे अजिबात घडले नाही.
195 विरुद्ध 39
उलट राहुल गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरे हे INDI आघाडीचे नेते रोज बातम्यांमध्ये राहिले. त्यांची अद्वातद्वा वक्तव्य बातम्यांचा आणि चर्चेचा विषय झाली. त्यातून INDI आघाडीचा फार मोठा गाजावाजा होत राहिला. पण प्रत्यक्षात त्यांचे जागा वाटपाचे समजते प्रत्येक राज्यांमध्ये अडून राहिले. त्याउलट प्रत्यक्षात भाजपने 195 उमेदवार जाहीर करून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली आणि त्याच काळात शांतपणे हालचाली करून आंध्र प्रदेश जम्मू काश्मीर ओडिशा यासारख्या राज्यांमध्ये “सुमडीत कोंबडी” कापून नवे मित्र पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत NDA मध्ये आणले. यातून त्यांनी काँग्रेसला इंडिया आघाडीतच अलग – थलग पाडले आणि प्रादेशिक पक्षांना सुरुंग लावले. भाजपच्या 195 उमेदवारांच्या बदल्यात काँग्रेस पहिल्या टप्प्यात फक्त 39 उमेदवारच जाहीर करू शकले यातच खरी “सुमडीत कोंबडी” कोणाची कापली गेली, याची सत्यता बाहेर आली!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App