जलचक्र हे जलावरणामध्ये पाण्याची, पाण्याच्या संयुगांची, हालचाल कोणत्या प्रक्रियांद्वारे होते याचे वर्णन करते. परंतु जलचक्रामध्ये फिरत राहणाऱ्या पाण्यापेक्षा खूप जास्त पाणी हे प्रदीर्घ काळापर्यंत साठा म्हणून आहे. पृथ्वीवरील महासागरांमध्ये हे पाणी साठवले गेले आहे. जगातील जलसाठ्यांपैकी सुमारे ९७ टक्के पाणीसाठा हा महासागरांमध्ये आहे. असाही अंदाज आहे की, बाष्पीभवन झालेल्या पाण्यापैकी ९० टक्के पाणी हे महासागरांवरून बाष्पीभवन झालेले आहे. तुलनेने थंड हवामान कालावधीत म्हणजे हिमयुगात अधिक हिमनद्या आणि हिम आच्छादने तयार होतात. What is the Earth’s water cycle?
जागतिक जलपुरवठ्यातील मोठा भाग हिम म्हणून राहतो आणि जलचक्रातील अन्य भागांना कमी पाणीपुरवठा होतो. तुलनेने अधिक उष्ण हवामान कालावधीत याउलट होते. मागच्या अतिथंड कालावधीत हिमनद्यांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या एक तृतीयांश भाग व्यापला होता. परिणामी, आता आहेत त्यापेक्षा महासागर १२२ मीटर जास्त खोल होते. मागील उष्ण कालावधीत साधारणपणे सव्वा लाख वर्षांपूर्वी महासागर आतापेक्षा ५.५ मीटर उंच पातळीवर होते. तीन दशलक्ष वर्षांपूर्वी महासागर आता आहेत त्यापेक्षा ५० मीटर अधिक उंच असण्याची शक्यता आहे. जलवायू परिवर्तनावरील समितीने २००७ मध्ये एक अहवाल तयार केला. हा अहवाल धोरण निश्चिती करणारांसाठी होता. या अहवालामध्ये विज्ञानाचा आधार घेऊन, जलचक्र हे एकविसाव्या शतकात अधिकाधिक तीव्र होणे चालूच राहणार असल्याचे व्यक्त केले आहे. याचा अर्थ सर्वदूर पर्जन्यवृष्टी वाढेल असा नाही.
उपोष्ण कटिबंधी भागात जे तुलनेने अधिक शुष्क आहेत, तेथे एकविसाव्या शतकात पर्जन्यवृष्टी कमी होत जाईल (उदा., कर्कवृत्त आणि मकर वृत्त). त्यामुळे दुष्काळाची संभाव्यता वाढेल. ही शुष्कता उपोष्ण कटिबंधाच्या ध्रुवांकडील भागात जोरदार असेल. (उदा., भूमध्य खोरे, दक्षिण आफ्रिका, दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण-पश्चिम अमेरिका) जे भाग सध्या पावसाळी भाग म्हणून ओळखले जातात अशा विषुववृत्तीय आणि वरच्या अक्षांशाकडील भागात वार्षिक पर्जन्यवृष्टीचा कल वाढता राहील. हे विस्तृत प्रमाणावरील परिणाम जवळजवळ सर्वच हवामान प्रतिमाने दर्शवितात. अनेक आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांनी, जलवायू परिवर्तनावरील आंतरशासकीय समितीसाठी केलेल्या अभ्यासात जवळजवळ सगळी प्रतिरूप प्रतिमाने विस्तृत प्रमाणावरील परिणाम असेच राहतील असे दर्शवितात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App