नाशिक : Vice Presidential election : लाल संविधान, उभी दांडी, मलेशियातून केली खेळी; तरी विरोधकांची मते फुटली!!, असेच उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे वर्णन करावे लागेल. NDA आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली, INDI आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना फक्त 300 मते मिळाली. याचा अर्थ INDI आघाडीची 25 ते 30 मते फुटली.
INDI आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी राहुल गांधींचे लाल संविधान हातात घेऊन प्रचार केला. ते INDI आघाडीच्या सगळ्या नेत्यांच्या घरी जाऊन आले. वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरले. सगळ्या नेत्यांबरोबर फोटो सेशन केले. पण ते जिंकून येऊ शकले नाहीत. सत्ताधारी NDA आघाडीची मते फोडू शकले नाहीत. उलट विरोधी INDI आघाडीचीच मते फुटली. राहुल गांधींनी मलेशियातून केलेली खेळी वाया गेली. उभी दांडी आडवी झाली. INDI आघाडीच्या खासदारांनी मतपत्रिकेवर मारलेली उभी दांडी त्यांच्याच उमेदवाराला आडवी करून गेली.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये INDI आघाडीच्या नेत्यांनी म्हणे “लय भारी आयडिया” लढवली. हे मतदान EVM वर बटन दाबून नसून मतपत्रिकेवर होते. त्यामुळे बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावासमोर असलेल्या रकान्यात उभी दांडी मारून मतदान करायचे ठरविले. त्याप्रमाणे INDI आघाडीच्या खासदारांनी मतपत्रिकेवर रेड्डी यांच्या नावासमोर उभी दांडी मारली. ती मतपत्रिका पेटी टाकली. त्यानंतर मतांची मोजणी झाली. त्यावेळी उभ्या दांडीची मते विरोधकांच्या आघाडीच्या संख्याबळापेक्षा कमी ठरली. म्हणजेच उभी दांडी मारायची आयडिया आडवी झाली. विरोधकांचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी हे निवडणुकीत पडलेच, पण विरोधकांचे संख्याबळ टिकून राहिले नाही. ते घटले. बाहेर मतदान चोरीचा मोठा बवाल उभा करून मलेशियाला निघून गेलेला राहुल गांधींना विरोधकांच्या आघाडीच्या खासदारांची मते देखील आपल्या बाजूने वळवता आली नाहीत किंवा ती टिकवून धरता आली नाहीत.
#WATCH | Delhi: PC Mody, Secretary-General, Rajya Sabha says, "NDA nominee and Maharashtra Governor C.P. Radhakrishnan got 452 first preference votes. He has been elected as the Vice President of India… Opposition's vice-presidential candidate Justice Sudershan Reddy secured… pic.twitter.com/hW7dUY0yfi — ANI (@ANI) September 9, 2025
#WATCH | Delhi: PC Mody, Secretary-General, Rajya Sabha says, "NDA nominee and Maharashtra Governor C.P. Radhakrishnan got 452 first preference votes. He has been elected as the Vice President of India… Opposition's vice-presidential candidate Justice Sudershan Reddy secured… pic.twitter.com/hW7dUY0yfi
— ANI (@ANI) September 9, 2025
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीने विरोधकांची राजकीय बुद्धिमत्ता किती तोकडी आहे, हेच दाखवून दिले. मतदान चोरीचा बाहेर बवाल करून उपयोग नाही. प्रत्यक्ष निवडणुकीत रणनीती आखावी लागते आणि त्या रणनीतीनुसार काम करावे लागते याची माहिती अनुभवी विरोधकांना असली तरी प्रत्यक्षात त्यांनी रणनीतीनुसार काम केले नाही म्हणूनच INDI आघाडीची मते फुटली. हातात असलेली खासदारांची मते सुद्धा त्यांना वाचविता आली नाहीत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App