वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सध्याच्या डिझेलची जागा घेऊ शकेल असे डिझेल शास्त्रज्ञांनी तयार केले आहे. विशेष म्हणजे हे डिझेल साखरेसारख्या गोड पदार्थापासून तयार करण्यात त्यांना यश आले आहे. स्टार्चपासून स्फोटके बनवण्यासाठी आंबवण्याची फार पूर्वी वापरली जाणारी मात्र सध्या प्रचलित नसलेली जी प्रक्रिया केली जाते त्या प्रक्रियेचा वापर करून हे गोड डिझेल बनवले जाऊ शकते असे इंग्लंडमधील बकर्ले येथील संशोधकांना आढळले आहे. इस्रायलचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रसायनशास्त्राचे अभ्यासक चेम वाइझमन यांना सुमारे शंभर वर्षापूर्वी एक आंबवण म्हणजेच फर्मेटेशन आढळले होते. या आंबवणापासून डिझेल तयार केले. आंबवण्याच्या जुन्या पद्धतीचा फेरवापर करून एक मिश्र उत्पादन तयार केले. हे डिझेल इथेनॉलच्या एक गॅलनपेक्षा जास्त ऊर्जा निर्माण करते. सध्या पेट्रोल आणि डिझेलबरोबरच इथेनॉलचा वापर मिश्र स्वरूपात पर्यायी इंधन म्हणून वाहनांमध्ये केला जात आहे. मात्र येत्या ५ ते १० वर्षामध्ये या नव्या डिझेलचा वापर व्यावसायिक तत्त्वावर केला जाऊ शकेल. Very sweet diesel will come for vehicles now
जीवाश्मांपासून तयार होणा-या डिझेल आणि पेट्रोलच्या इंधनापेक्षा हे इंधन जास्त महाग असले तरी गोड डिझेलच्या वापरामुळे तापमानवाढीला कारणीभूत असलेले वायू अतिशय कमी प्रमाणात उत्सर्जित होतात. गोड डिझेल बनवण्याच्या प्रक्रियेतून फक्त डिझेलच नाही तर रासायनिक प्रक्रियेपासून तयार होणा-या प्लॅस्टिकसारख्या अनेक वस्तूंची निर्मिती केली जाऊ शकते असे संशोधकांचे म्हणणे आहे. आंबवण्याच्या या प्रक्रियेद्वारे असि टोन, ब्युटेनॅल आणि इथेनाल तयार करता येते. संशोधकांनी याच पद्धतीचा वापर करून आंबवणातून असि्टोन आणि ब्युटेनॅल वेगळे करण्याची प्रक्रिया विकसित केली. रासायनिक क्रिया गतिमान करणाऱ्या कॅटालिस्टचा वापर केल्यावर आंबलेल्या या भागाचे रूपांतर मोठ्या साखळी पद्धतीच्या हायड्रोकार्बनमध्ये करतो. डिझेलमध्ये आढळणा-या हायड्रोकार्बनशी या हायड्रोकार्बनचे साम्य आहे. नवे डिझेल हे नेहमीच्या वापराच्या डिझेलसारखेच सामान्यपणे जळते. डिझेलबरोबर याचे साम्य असल्यामुळे त्याचे डिझेलबरोबर मिश्रण वाहनांसाठी वापरले जाऊ शकते. मक्याची साखर म्हणजेच ग्लुकोज व ऊसाची साखर म्हणजे सुक्रोज यांसारख्या पुन्हा वापरता येणाऱ्या घटकांपासून ही प्रक्रिया करणे शक्य आहेच. पण त्याचबरोबर गवत, वृक्ष किंवा शेतातील टाकाऊ पदार्थ यांचादेखील वापर या प्रक्रियेमध्ये शक्य आहे. त्यामुळे हे इंधन खूपच प्रभावी व पर्यावरणपूरक असणार आहे. अर्थात संध्या ते संधोऩाच्या पातळीवर असले तरी तंत्रज्ञानाचा सध्याचा अफाट वेग पाहता ते लवकर विकसीत होईल अशी आशा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App