U. P. Elections Results : सपने मे आता है, कृष्ण मेरे सपने मे आता है…!!

 

भगवान गोपाळ कृष्णाचे या कलियुगात नेमके काय चालले आहे…?? तो कोणा कोणाच्या स्वप्नात येऊन काय काय सांगतो आहे…?? हेच काही कळेनासे झाले आहे…!! स्वप्नात येणारा कृष्ण खरा आहे की पौंड्रक कृष्ण आहे हे सुद्धा कळेनासे झाले आहे…!!U. P. Elections Results: Comes in a dream, Krishna comes in my dream

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातल्या बड्या बड्या नेत्यांनी भगवान गोपाळ कृष्ण आपल्या स्वप्नात आल्याचा दावा केला आहे आजचा नवा दावा भाजपचे खासदार हरनाथ सिंह यादव यांनी केला आहे. या आधी 3 जानेवारी रोजी त्यांनी असाच दावा करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरेतून निवडणूक लढवावी, असे म्हटले होते.



त्यासाठी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्रही लिहिले होते. योगी आदित्यनाथ यांनी मथुरेतून निवडणूक लढवली नाही ते गोरखपुर मधुनच उभे राहिले तरीदेखील यादव यांनी उत्तर प्रदेशात योगीच जिंकणार असा दावा केला आहे.

दरम्यानच्या काळात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी देखील भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वप्नात येऊन समाजवादी पक्षाचे सरकार स्थापन होईल, असे सांगितल्याचा दावा केला होता…!! त्यांच्या दाव्याची त्या वेळी उत्तर प्रदेश संपूर्ण देशात जोरदार चर्चा झाली. सोशल मीडियातून त्यांच्या स्वप्नांची किल्ली देखील उडवण्यात आली.

आता आज पुन्हा एकदा तोच दावा खासदार हरनाथ सिंह यादव यांनी केला आहे. भगवान गोपाळ कृष्ण माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी योगी आदित्यनाथ हेच पुन्हा उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करतील, असे मला सांगितले, असे यादव म्हणाले. उत्तर प्रदेश मधला एक्झिट पोल हा 100% खरा आहे. भाजपला येथे प्रचंड बहुमत मिळणार आहे. अखिलेश यादव आणि बाकीचे विरोधी पक्षातले नेते काय बोलतात त्याला काही महत्त्व नाही. सत्य आमच्या बाजूने आहे. ते असत्याचे पक्षधर आहेत, असा दावा करून अखिलेश यादव यांना हरनाथ सिंह यादव यांनी टोला लगावला आहे.

पण भगवान श्रीकृष्ण नेमके कुणाच्या स्वप्नात येतात आणि काय काय सांगून जातात…??, याविषयी मात्र देशातल्या नागरिकांची उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या निमित्ताने जोरदार करमणूक होताना मात्र दिसते आहे.

आपल्या देशात भगवान शिव आणि नंदी दूध काय पितात!! त्याची अफवा केवढी मोठी पसरते देशातली जनता हातातले कामधंदे सोडून नंदी आणि शंकराला चमच्याने दुध पाजायला लागतात…!! शेवटी जनतेचेही बरोबरच आहे म्हणा…!! ते ज्या नेत्यांना फॉलो करतात त्या नेत्यांचे अनुकरण ते करतात. आता नेत्यांच्या स्वप्नांमध्ये भगवान श्रीकृष्ण येतात आणि त्यांना काय काय सांगून जातात…!! तर सर्वसामान्य जनतेचे भगवान शंकर आणि नंदी दूध प्यायला लागले तर त्यात आश्चर्य ते काय…!!??

करतात. आता नेत्यांच्या स्वप्नांमध्ये भगवान श्रीकृष्ण येतात आणि त्यांना काय काय सांगून जातात…!! तर सर्वसामान्य जनतेचे भगवान शंकर आणि नंदी दूध प्यायला लागले तर त्यात आश्चर्य ते काय…!!??

U. P. Elections Results: Comes in a dream, Krishna comes in my dream

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात