पृथ्वी आपल्याला दिसते टणक पण तिच्या आता सतत कोणती ना कोणती खळबळ सुरु असते. प्रस्तरभंगाजवळ अचानक झालेल्या या भूगर्भीय घसरण्याच्या प्रक्रियेमुळे भूकंप म्हणजेच धरणीकंप होतो. भूकंपादरम्यानच्या तीव्र भूगर्भांतर्गत हालचालींमुळे मोठ्या प्रमाणावर तणावपूर्ण ऊर्जा मुक्त होऊन बाहेर पडते आणि पृथ्वीच्या अंतर्गत तसेच पृष्ठभागालगत भूकंप लहरींच्या स्वरूपात पसरते. तसेच, हा एक भूकंप होऊन गेल्यानंतर पुन्हा खडकांच्या नवनिर्मित सीमारेषेंवर तणाव स्वरूपात ऊर्जा निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेला भूशास्त्रज्ञ प्रत्यास्थ प्रतिघात सिद्धान्त असे म्हणतात. प्रस्तरभंग प्रक्रियेमध्ये समाविष्ट असणारे भूभाग त्रिमितीय घन आकाराचे आणि अनेक दशक किमी. लांबीचे असू शकतात. जगभरात होणारे भूकंप प्रामुख्याने चार प्रकारात विभागले जातात. There are four types of earthquakes
जे भूकंप भूखंडांच्या सीमारेषेलगत होतात त्यांना आंतरभूपट्टीय भूकंप असे म्हणतात. उदा. भारतातील आसाम येथे १८९७ मध्ये झालेला भूकंप. जे भूकंप भूपट्टांच्या अंतर्गतच परंतु भूपट्टांच्या सीमारेषेपासून दूर अंतरावर होतात त्यांना भूपट्टांतर्गत भूकंप असे म्हणतात. या दोन्ही प्रकारच्या भूकंपांमध्ये भूगर्भीय हालचाल भूपट्टांच्या ऊर्ध्व आणि क्षितीज अशा दोन्ही दिशांमध्ये घडून येते त्याला नतिभ्रंश म्हणतात. तसेच पार्श्वीय दिशेने ही हालचाल झाल्यास त्याला नतिलंब भ्रंश असे संबोधले जाते. जगात विज्ञान व तंत्रज्ञान प्रचंड प्रगत झालेले आहे. मात्र तरीही अजून कोणाला भूकांपाचे अनुमान करणे शक्य झालेले नाही. सध्या अंतराळात फिरणारे उपग्रह पावसाची, वादळाची पूर्वकल्पना देतात. त्यानुसार आपल्याला त्याच्याशी चार हात करण्याची किंवा साधव होण्यासाठी पुरेशी पूर्वतयारी करण्याचा वेळ मिळतो. मात्र भूकंपाचे असे नाही. तो कधी होणार, कसा होणार, किती क्षमतेचा होणार याबाबत कोणतीच पूर्वसूचना मिळवणे मानवाला अद्याप जमलेले नाही. त्यामुळे भूकंपामुळे होणार नुकसान हे अन्य नैसर्गिक आपत्तींपेक्षा कैकपटीने जास्त असल्याचे मानले जाते. भूकंपाचे अनुमान करण्यासाठी संशोधक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App