जगातील पहिला वाहिला मानवनिर्मित बर्फाचा बोगदा नुकताच सुरु झाला असून एक जूनपासूनच तो पर्यटकांना खुला करण्यात आला आहे. आयर्लंडमधील लांगीकुल येथे हिमशिखरांमध्ये हो आगळा वेगळा बोगदा बर्फांच्या जाड थरांमद्ये खोदण्यात आलेला आहे. हा बोगदा पाहणे आमि त्यातील जीवघेणा गारटा अनुभवणे म्हणजे खरोखरच रोमांचकारी अनुभव आहे. हा बोगदा पाहण्यासाठी आतापासूनच तोबा गर्दी होत आहे. The world’s first ice tunnel
हो मात्र हा बोगदा पाहणे सोपे नाही. त्यासाठी तुम्ही मनाने व सरीराने कणखर असायला पाहिजे. कारण हा बोगदा बर्फाच्या जाड जूड थराखाली म्हणजे बर्फाच्छादित हिमशिखऱाच्या चक्क तीस मीटर काळी खोदण्यात आला आहे. एका मोठ्या हिमशिखऱाच्या खाली असलेला हा बोगदा आरपार आहे. त्याची लांबी 550 मीटर म्हणजे साधारणेपणे अर्धा किलोमीटरपेक्षा थोडी जास्त आहे. जगातील सर्वांत वेगळा व बर्फाचा हा पहिलाच बोगदा आहे. त्यामुळे त्याचे महत्व अनन्यसाधारण असेच आहे.
पर्यटनाला चालना देण्याच्या हेतूने आणि बर्फाचा थर किती घट्ट असतो हे दाखवून देण्याच्या हेतूने हा सारा उपद्व्याप करण्यात आलेला आहे. या बोगद्यात गेला की तुम्हाला बर्फाचे थर एकमेकांवर कसे बसतात, त्यातून कसा घट्ट बर्फांचा पर्वत तयार होतो याची महती पटते. याची देही याची डोळा साक्षात बर्फाच्या खाली तीस मीटर जावून तो पाहणे म्हणजे रोमांचकारी अनुभव आहे यात शंका नाही. या बोगद्यात छान प्रकाशझोत सोडण्यात आले आहेत. त्यामुळे या शुभ्र व निळाशार बर्फाच्या बोगद्याच्या सौंदर्यात आणकी भर पडते.
बोगद्याच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला सन 2010 मध्ये सुरुवात करण्यात आली. हे कामच इतके अवघड होते की ते पूर्ण होण्यासाठी पाच वर्षांचा कालावदी लागणे यात काही नवल नाही. अखेर या वर्षीच्या सुरावतीला हा बोगदा पूर्ण झाला. एक जूनपासून तो पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. तेव्हापासून येथे लोकांची रीघ लागली आहे. आठ चाकी मोन्स्टर ट्रकवरुन या बोगद्याच्या सफरीची सुरुवात होते. या बोगद्यात एक तास सफर घटवून आणली जाते. बोगद्याच्या आता बसायला चांगले बाकही ठेवण्यात आले आहेत. तेथे पर्यटकांना पर्वताच्या आतील रचना याची देही याची डोळा अनुभवता येते.
तेथे बर्फाचे थर, आतील पाणी, दोन थऱांतील अंतर पहायला मिळते. पर्वत तयार कसा होतो हे लक्षात येते. लीड लाईटच्या प्रकाशात पर्यटक हा नजारा पाहून जाम खूष होतात. हिमशिखरांचा अभ्यास करणाऱ्यासांठी तर हा बोगदा म्हणजे माहितीचा खजिनाच उलगडून देणारा ठरणार आहे. त्यामुळे अशा विरद्यार्थांनी आतापासूनच तेथे रीघ लावली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App