संवाद हा जगण्यासाठी सर्वांत महत्वाचा मानला जातो. जसा तो जगण्यासाठी मोलचा आहे त्याचप्रमाणे तो यश किंवा अपयशासाठीदेखील कारणीभूत असतो हे लक्षात घेतले तर बऱ्याच बाबी सोप्या होवून जातात. यश मिळवताना संवादाला अनन्यसाधारण महत्व असते हे लक्षात घेतले पाहिजे. मुळात संवाद हा चार प्रकारे असतो. दोन व्यक्तींमधला संवाद, एका व्यक्तीचा समूहाशी होणारा संवाद, समूहातील अनेक सदस्यांचा इतर अनेक सदस्यांशी होणारा संवाद आणि व्यक्तीचा स्वत:शीच होणारा संवाद, म्हणजे आत्मसंवाद. संशोधकांच्या म्हणण्यानुसार आपण सतत कुणाशी ना कुणाशी संवाद साधत असतो.The key to success in everyday life is self-communication
यात हावभाव करणे, फोन करणे, इंटरनेटच्या माध्यमातून चाट करणे किंवा इतरांशी प्रत्यक्ष बोलणे, हे सर्व प्रकार येतात. कधी आपण एकाच वेळी अनेकांशीही संवाद साधत असतो. शास्त्रज्ञांच्या मते मात्र या वेगवेगळ्या संवादाची गोळाबेरीज केली असता होणा-या एकूण संवादापेक्षा कितीतरी पट अधिक होत असतो तो आपला स्वत:शीच केलेला संवाद. शॅड हेल्मस्टेटर यांच्या म्हणण्यानुसार तर आपला ७७ टक्के संवाद स्वत:शीच होत असतो.
जागेपणी आपण स्वत:शी सतत बोलत असतो. आता हे वाचत असतानाही थांबून, क्षणभर डोळे मिटून, विचार केला तर आपल्या सहज लक्षात येते की आपण स्वत:शी आवाज न करता सतत बोलत असतो. कारण विचार करणे म्हणजे स्वत:शी बोलणेच असते. मात्र आपण या संवादला फार कमी लेखतो. आपण जेव्हा शांत बसत असतो तेव्हादेखीस आतल्या आता संवादाचे चक्र हे नेहमी सुरुच असते.
त्यामुळे आज सकाळी उठल्यानंतर आपल्या संवादाकडे लक्ष द्या. आपला आतला आवाज काय सांगतो त्याला योग्य प्रकारे प्रतिसाद देण्यास सुरुवात करा. कारण यातूनच मोठ्या प्रमाणात प्रगती होत असते. जे लोक प्रभावी किंवा सकारात्मक आत्मसंवाद करतात किंवा त्या संवादाचा योग्य प्रमाणात वापर करून घेतात त्यांना यश हे हमखास मिळते. किंबहुना यशस्वी लोकांच्या यशात या आत्मसंवादाचा तसेच विचारप्रक्रियेचा मोठा वाटा असतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App