नाशिक : पिंपरी चिंचवड मध्ये स्थानिक नेतृत्व एकवटून अजित पवारांना थेट “आवाज” टाकणाऱ्या भाजपा आमदार महेश लांडगे यांना घेण्यासाठी पवार कुटुंबाला एकवटावे लागले. एरवी पिंपरी – चिंचवडची निवडणूक एक हाती हाताळणाऱ्या अजित पवारांना पवार कुटुंबीयांची मदत घ्यावी लागली. त्यामुळे आधी आमदार रोहित पवार आणि आता खासदार सुनेत्रा पवार यांना पिंपरी – चिंचवड मध्ये लक्ष घालावे लागले. Sunetra Pawar
महेश लांडगे यांनी अजित पवार यांना घेरताना अजित पवारांच्या वर्चस्ववादी राजकारणाची पुरती पोलखल केली. पिंपरी चिंचवड मधले राजकारण साधून घेताना अजित पवारांनी कायमच स्थानिक नेतृत्वाला दाबले. राज्य पातळीवरचे नेतृत्व करण्याची क्षमता असणाऱ्या स्थानिक नेत्यांना कधीच संधी दिली नाही. त्या उलट स्थानिक नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांचा राजकारणाचा वापर अजित पवारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःचे नेतृत्व राज्य पातळीवर उभे करण्यासाठी वापरला असा आरोप महेश लांडगे यांनी प्रत्येक सभेत केला.
– महेश लांडगेंचे टीकास्त्र
त्यानंतर महेश लांडगे यांना अजित पवारांनी घेरले. त्याला मी मोठा केला. स्टॅंडिंग कमिटीचा चेअरमन केला आणि आता तो माझ्यावर उलटला, अशा एकेरी भाषेत अजितदादांनी महेश लांडगे यांना ठोकून काढले, पण महेश लांडगे बदले नाहीत. त्यांनी अजित पवारांना त्यांच्याच आक्रमक भाषेत प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. भोसरी पासून पिंपरी पर्यंत आणि पिंपरी पासून चिंचवड पर्यंत प्रत्येक जाहीर सभांमध्ये महेश लांडगे यांनी अजित पवारांच्या वर्चस्ववादी प्रवृत्तीची पोलखोल केली. चिंचवड, पिंपरी, भोसरी इथल्या स्थानिक नेतृत्वाला अजित पवारांनी संधी दिली नाही. त्या नेतृत्वाला मोठे केले नाही. पिंपरी – चिंचवडकरांनी कायम आपल्या दारात यावे आपल्याकडे येऊन पदे मागावीत आणि आपण त्यांना पदे द्यावीत अशीच त्यांची वर्तणूक राहिली, पण आता पिंपरी चिंचवडचे स्वाभिमानी नागरिक अजित पवारांचे वर्चस्व मानवणार नाहीत असे टीकास्त्र महेश लांडगे यांनी सोडले.
– सुनेत्रा पवारांची व्यूवहरचना
महेश लांडगे यांनी संपूर्ण पिंपरी चिंचवड महापालिका परिक्षेत्रात प्रचाराचा दणका उडवून दिल्यानंतर अजित पवारांना खऱ्या अर्थाने स्थानिक नेतृत्वाच्या संतापाची झळ पोहोचली. त्यामुळे आपली पिंपरी चिंचवड मधली उरली सुरली प्रतिष्ठा वाचविण्यासाठी अजित पवारांना आपल्याच कुटुंबीयांची मदत घ्यावी लागली. म्हणूनच रोहित पवार आणि सुनेत्रा पवार यांना अजित पवारांच्या बाजूने आक्रमकपणे बोलणे भाग पडले. सुनेत्रा पवार यांनी भोसरी मध्ये येऊन वेगवेगळ्या ठिकाणी चार तास कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आणि महेश लांडगे यांच्या विरोधात व्यूहरचना करण्याचा प्रयत्न केला.
आपणच प्रोत्साहन दिलेल्या कार्यकर्त्याचा स्वाभिमान दुखावल्यानंतर तो उसळला आणि त्यामुळे त्याला अटकाव करण्यासाठी अजितदादांना आपल्याच कुटुंबीयांची मदत घ्यावी लागली, असे चित्र निर्माण झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App