प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्यापेक्षा वेगळी असते. त्यामुळे त्याची जडणघडण, परीस्थितीदेखील वेगळी असते. त्या अनुरूप तो आपले स्वतःचे यश कशात आहे हे ठरवत असतो, मोजत असतो. खरे पाहिल्यास यशस्वी होणे म्हणजे ज्या पद्धतीने आयुष्य जगायचे ठरवले होते त्या पद्धतीने जगणे बस. सध्याच्या काळात मनासारखे जगायला मिळणे हे देखील काही कमी नाही. अशा प्रकारे जगता येणे हे देखील यश असते. तुम्ही तुमच्या आवडीचे काम, नोकरी करा. त्यात समाधानी रहा. त्यात रोज प्रगती करीत राहा एकदिवस यश नक्की मिळतेच. यासाठी कामाचे योग्य नियोजन करणे गरजच असते. मग त्याच्यामध्ये अडचणी असतील किंवा नसतील. Success is to live as you please
ऊन, वारा, पाऊस, रात्र, झोप ह्या गोष्टींकड़े फार पहात बसू नका. काही उद्योजक, बॉस किंवा दुकानदार आपल्यासमवेत काम करणाऱ्या कामगार लोकांना कधीसुद्धा वेडे वाकड़े बोलत नाहीत. त्यांना ते स्वतःच्या बरोबरिने वागवतात. कारण सध्यातरी ते आहेत म्हणूनच आपल यश आहे याची या सर्वांना माहिती असते. काही जण नेहमी आपली चूक दुसऱ्यावर ढकलण्यात आनंद मानतात. अशा लोकांना तात्कालिक फायदे जरूर होतात. मात्र ते कधीच य़श मिळवू शकत नाहीत. यशस्वी लोक मात्र चुकीची जबाबदारी नेहमी स्वतःवर घेतात. त्यासाठी दुसऱ्या कोणाला किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टीला दोष देत बसत नाही. आणि भूतकालाळा जास्त जोपासत बसत नाहीत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यशस्वी लोक घेतलेल्या निर्णयावर नेहमी ठाम राहतात. त्यासाठी कितीही कष्ट उचलण्याची त्यांची तयारी असते. एकदा निर्णय घेतला की त्यापासून ते सहसा मागे हटत नाहीत. वाटेत येणाऱ्या संकटांवर ते लीलया मात करीत पुढे वाटचाल करतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App