मित्रहो नमस्कार,
डाॅ. शीतल आमटे- करजगी या हुशार, कर्तबगार, हरहुन्नरी मुलीने आत्महत्या केल्याची अत्यंत दुःखद बातमी माझ्या मुलीने कल्याणीने अमेरिकेहून फोन करून सांगितली. ते ऐकून काळजात चर्र झाले. विश्वासच बसेना. अनेक महिन्यांपासून टीव्हीवर बातम्या बघणं सोडून दिलेलं असल्यामुळे रिमोट शोधून बातम्या लावल्या. दुर्दैवाने बातमी खरीच होती.
शीतल आमटे ही माझी मुलगी, कल्याणीची चुलत जाऊ असल्यामुळे प्रासंगिक का होईना कल्याणीचे शीतलशी बोलणं व्हायचे. या बातमीने मन सुन्न झाले. काहीच सुचेना. नेमके काय झाले असेल असा विचार करत असतांना काही माहिती मिळाली. घरगुती ताणतणाव असल्याचे समजले. खरेतर आत्महत्येचे समर्थन करता येऊच शकत नाही. आजच्या शेकडो/हजारो मित्र असलेल्या virtual आभासी जगात किमान एकतरी मित्र/मैत्रीण/भाऊ/बहीण/आई/बाबा असावे; ज्यांच्याजवळ आपल्याला मन मोकळे करता आले पाहिजे, ताण हलका करता आला पाहिजे. आयुष्याहून मोठी गोष्ट नाहीये. मला नेहमी असे वाटते की मृत्यू प्रत्येकाला येणारच आहे परंतु मरने के लिए एक जायज वजह होनी चाहिए।
कितीही अडचणी असू देत, संकटे येऊ देत; देवावरची अपार श्रद्धा आणि मैत्रप्रेम आपल्याला संकटावर मात करण्याची शक्ती देतात. अनेक प्रसंगात आपण उत्तर शोधत असतो आणि काळाचा महिमा प्रश्नच शिल्लक ठेवत नाही. आज आपली मुले मोठी होत आहेत, प्रगती करताहेत परंतु घरातील मोठी मंडळी आणि मोठी झालेली मुले यांच्यात सुसंवाद होतांना दिसत नाही.
Generation gap वाढतोय. त्यात भर म्हणजे घरातील प्रत्येकजण आपल्या रूममध्ये मोबाईलवर आभासी जगात busy झालाय. याचे कारण काय तर जगाशी connected रहायलं हवे पण हे करतांना घरातला disconnect आपल्या लक्षात येतोय का? आपले प्रश्न कोणीच सोडवू शकत नाही असे वाटणेच खूप निराशाजनक आहे. खरेतर आपले प्रश्न सोडवणारा प्रश्नासोबतच आलेला असतो पण आपले दुर्लक्ष होते. आपल्याला Let Go करायला शिकले पाहिजे. आपल्या छोट्याशा आयुष्यात आनंदाला स्थान मिळायला हवे.
आपला जन्म आनंदाने जगण्यासाठी आहे आणि त्यासाठी खूप पैसा पाॅवर लागत नाही तर निखळ आनंदाचा झरा अवतीभोवतीच असतो तो समजण्याची दृष्टी असायला हवी. ती दृष्टी मोठ्यांनीच पुढच्या पीढीला संस्कृतीच्या रूपाने हस्तांतरीत करायला हवी. स्वयंपाकघरातला कुकर शिट्टी वाजवतो तसेच आपल्यालाही ताण वाढला की शिट्टी वाजवता आली पाहिजे. शिट्टी वाजली नाही तर कुकर हमखास फुटणारच. आपल्यानंतर आपल्यावर प्रेम करणा-यांचे काय होईल हा विचारही आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी पुरेसा ठरू शकतो.
आयुष्यात एक व्यक्ती जरी आपल्या समोर उभे राहून मनापासून म्हणाली
अगर मुझसे मोहोब्बत है,
मुझे सब अपने गम दे दो,
इन आँखों का हर एक आंसू,
मुझे मेरी कसम दे दो
तर एकही आत्महत्या होणार नाही.
-किशोर रहाटकर
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App